* शरद पवार निवडणूक लढणार नाहीत, पण अजून बरंच काही घडायचंय- अजित पवार
* मध्यप्रदेश, रजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरममध्ये विधासभा निवडणुका जाहीर
* सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अन्यथा हजारो शेतकरी आत्महत्या करतील- अशोक चव्हाण
* राजस्थानात शेतकर्यांना मोफत वीज देऊ, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचं आश्वासन
* कर्नाटकात माकडाने चालवली बस, चालक निलंबित
* पेट्रोल १४ पैशांनी तर डिझेल ३१ पैशांनी महागले
* अभिनेत्री प्रियंका चोप्रा आता व्यवसायात उडी, दोन कंपन्यात सहभाग
* जबलपूरमध्ये राहूल गांधी यांच्या रोड शो वेळी मंदिरात लागली आग
* पार्थ पवारांच्या उमेदवारीला विरोध
* भाजपाविरोधात सगळ्याच विरोधी पक्षांनी एकत्र यावं- राजू शेट्टी
* मुंबईत फेरीवाल्यांसाठी दहा हजार जागा तयार, रस्त्याच्या बाजुला खुणा करुन देणार
* किसान सभेचे नेते अजित नवलेंना सोलापुरात पोलिस अधिकार्यांकडून धक्काबुक्की
* तुळजाभवानी मंदिरावर आकर्षक रोषणाई, २५ हजार बल्ब्सचा वापर
* नागपुरात दारुची तस्करी करणार्या इसमाला रेल्वेत अटक, त्याच्या कपड्यात सापडल्या ६० बाटल्या
* कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरात मद्यपान आणि करुन येण्यास बंदी
* नाशकातील डेंग्यूला नागरिकच जबाबदार- आयुक्त मुंढे
* कायदा होत नाही तोवर पदोन्नतीतील आरक्षण बेकायदा, सरकारने केलेली १५४ पोलिसांची पदोन्नती मॅटने ठरविली बेकायदा
* एसटी कर्मचाऱ्यांच्या महाविद्यालयीन मुला-मुलींना उच्चशिक्षणासाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना- दिवाकर रावते
* पुणे होर्डिंगचा सांगाडा पडून चार जणांच्या मृत्यूप्रकरणी दोन अभियंत्यांना ११ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
* राज्यातील जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये औषधाचा तीव्र तुटवडा
* रायगड, नांदेड, नागपूर, सातारा, सांगली, जळगाव आणि औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालयांत औषधांची टंचाई
* पवार कुटुंबीयांनीच सगळ्या जागा लढविल्या तर राष्ट्रवादीची बांधणी करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचे?- शरद पवार
* अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार, शरद पवार यास अनुकूल नसल्याचे चित्र
* सालगडय़ाच्या मुलाशी लग्न केल्याने मंगळवेढ्यात मुलीची हत्या करणारे वडील आणि सावत्र आई गजाआड
* केंद्र सरकारने फसव्या घोषणा दिल्या, एकही आश्वासन पूर्ण केले नाही, आमची सत्ता आल्यानंतरच राज्य प्रथम क्रमांकाचे होईल- सुप्रिया सुळे
* देगलूर तालुक्यात प्रेमी युगुलाची तलावात उडी मारून आत्महत्या
* तुळजाभवानी मंदिराला इजा पोहचवू नये, पुजार्यांना त्रास देवू नये, मंदिराचे नुकसान करू नये- सापडली पाचशे वर्षांपूर्वीची आदिलशाही सनद
* पुणे येथील रिअल इस्टेट व्यावसायिकाला सोशल मीडियावरील मैत्रिणीने घातला ४७ लाखाला गंडा
* डेंग्यूच्या डासांमुळे विदर्भात तापाची लाट
* नवी मुंबईत भेसळ पनीर तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा, कारखान्याचा परवाना रद्द
* मेट्रो सात साठी आरे दुग्ध वसाहतीमधील ०८ हजार चौरस मीटरचा भूखंड हस्तांतरीत करण्याचा निर्णय
* मुंबईकर ऑक्टोबर हिटमुळे संसर्गजन्य तापांसह विविध प्रकारच्या आजारांनी हैराण
* मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन एक नोव्हेंबरपासून जोडणार 'बायोमेट्रिक' हजेरीला, एक तास उशीर झाल्यास अर्ध्या दिवसाची वेतनकपात
* रुपयाच्या घसरणीमुळे दिवाळीत सोने पोहचणार ३५ हजारांवर
* मध्य प्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगड आणि मिझोराममध्ये निवडणुका जाहीर, ११ डिसेंबरला मतमोजणी
* मध्य प्रदेशातील प्रत्येक शेतकऱ्याला युरिया मिळाल्याचे श्रेय भाजप सरकारला जाते- अमित शहा
Comments