HOME   महत्वाच्या घडामोडी

मुख्यमंत्री औरंगाबादेत, अंबाबाईच्या महोत्सवा्ला तोफांची सलामी, भारनिमन लागू, एसटीची भाड्वाढ, नानाला नोटीस.....१० ऑक्टोबर २०१८


मुख्यमंत्री औरंगाबादेत, अंबाबाईच्या महोत्सवा्ला तोफांची सलामी, भारनिमन लागू, एसटीची भाड्वाढ, नानाला नोटीस.....१० ऑक्टोबर २०१८

* लातुरातील मटक्यावर आळा घाला, आर्य्न सेनेचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
* मटक्याच्या विरोधात जिल्हाव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा
* मुख्यमंत्री आज औरंगाबादेत, घेणार दुष्काळाचा आढावा
* कोल्हापुरच्या अंबाबाईच्या शारदीय नवरत्रोत्सवाला दोन तोफांच्या सलामीने सुरुवात
* आज घटस्थापना, देवींची मंदिरं सजली, नवरात्राची तजोरदार तयारी
* कोळशाच्या तुटवड्यामुळे आजपासून राज्यात भारनिमन लागू
* प्लास्टीक पिशवी आढळल्यास दुकानदाराचा परवाना रद्द होणार
* एस्टी दिवाळीत प्रवाशी भाडेवाढ करणार
* सरकारच्या भविष्य निर्वाह निधीत वाढ
* आज मंत्रीमंडळाची बैठक
* मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड सादर केले
* तनुश्री दत्ताच्या तक्रारीवरुन महिला आयोगाने नाना पाटेकर यांना दिली नोटीस
* शिर्डीच्या साई मंदिरावर नवे संचालक नेमा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
* डहाणूत सापडला ११ फुटी अजगर
* पेट्रोलचे दर तसेच, डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ
* राज्यातील २०१ तालुक्यांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस, पालकमंत्री आणि त्या त्या जिल्ह्यातील मंत्र्यांना दौरे करण्याचे आदेश
* केंद्र सरकारने दुष्काळाचे निकष बदलल्याने राज्यासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदतनिधी मिळविण्याचे मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान
* अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत २९ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे केंद्र सरकारला उच्च न्यायालयाचे निर्देश
* राज्यात दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी ५० हजार मदत द्या, सरकार झोपेचे सोंग घेत आहे- अजित पवार
* दिवाळी सुट्टीसाठी राज्य परिवहन महामंडळाची सरसकट १० टक्के भाडेवाढ, ०१ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर भाडेवाढ लागू
* दुकानात एखादी जरी प्लास्टिकची पिशवी आढळल्यास दुकानाचा परवाना होणार रद्द, दुकानाला ठोकणार टाळं - रामदास कदम
* उदयन राजे भाजपच्या वाटेवर, भेटले मुख्यमंत्र्यांना
* फडणवीस सरकारचा कारभार पंचागावर सुरू, दुष्काळ जाहीर करण्यासाठी ३१ ऑक्टोबरचा मुहूर्त निवडला- अशोक चव्हाण
* नागपुरात ट्रॅव्हल्स आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन ०५ ठार, २९ जखमी, डंपर जाळण्याचा जमावाचा प्रयत्न
* मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये विशेष लसीकरण मोहीम
* शिर्डीच्या साई संस्थानमध्ये नवे विश्वस्त मंडळ सहा आठवड्यांत नियुक्त करा- हायकोर्टाचे आदेश
* नागरी सुविधा केंद्र आणि महा ई-सेवा केंद्रांनी दर्शनी भागात प्रमाणपत्रांच्या आवश्यक कागदपत्रांचा फ़लक लावावा- पुणे जिल्हाधिकारी
* औरंगाबादमध्ये नवरात्रौत्सवासाठी तीन हजार पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या तैनात
* इंदापूरमधील उजनी धरणात मिळाला ४२ किलोचा कटला जातीचा मासा
* महाराष्ट्र टाइम्सचे माजी वरिष्ठ सहाय्यक संपादक सुहास फडके यांचं आअल्पशा आजारानं निधन
* नालासोपाऱ्यात भाजप पदाधिकारी रुपाली चव्हाण यांची हत्या, इस्त्रीचे चटके आणि शॉक दिल्याची माहिती उघड
* बिहारींच्या रक्षणासाठी गुजरातला जाणार , असेल दम तर मला मारहाण करुन दाखवा – पप्पू यादव
* नोटाबंदी आणि जीएसटी लागू करून नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली- राहुल गांधी
* शबरीमला मंदिर महिलांच्या प्रवेशाविरोधातील याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
* नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे बिल गेट्स यांनी केले कौतुक
* तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांविरोधात लेख छापल्याने पत्रकार नक्कीरन गोपाल यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल
* काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर परप्रांतीयांना धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल, भाषणाचा संबंध गुजरात हिंसाचाराशी जोडल्यामुळे काँग्रेसची कोंडी
* छत्तीसगडमध्ये भिलाई स्टील प्लान्टमध्ये स्फोट, ०९ जण ठार, ११ जण गंभीर
* एसबीआयला गेल्या सहा महिन्यात १,३२९ प्रकरणात ०५ हजार ५५५ कोटींचा चुना लागल्याची माहिती आरटीआयमधून उघड
* किर्लोस्कर सीस्टीम्स लिमिटेडच्या मानसी किर्लोस्कर यांची संयुक्त राष्ट्राच्या भारतातील पहिल्या 'यंग बिझनेस चॅम्पियन' म्हणून नियुक्ती
* दोन-चार लाखासाठी महिला पुरुषांवर आरोप करत आहेत, " मी टू " मोहीम केवळ ब्लॅकमेलिंगसाठीच- भाजप खासदार उदित राज
* बंगालच्या खाडीत उच्च दाबाचा पट्टा, 'तितली' वादळाचा ओदिशा आणि आंध्रप्रदेशला धोका
* राम मंदिर उभारण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेले महंत परमहंस दास यांचे उपोषण मागे
* भारताची १६ वर्षीय नेमबाज मनू भास्करने ऑलिम्पिकमध्ये पटकावले सुवर्णपदक


Comments

Top