* आज पेट्रोल १८ तर डिझेल ३१ पैशांनी वाढले
* मेट्रो-३ च्या परिसरात शिवसेनेचे आमदार तुकाराम कातेंवर तलवारीने हल्ला, काते थोडक्यात बचावले, सुरक्षारक्षकासह अन्य दोघे गंभीर जखमी
* हाऊसफुल्ल ०४ मधून नाना पाटेकर बहार, अक्षयकुमारने घेतला होता आक्षेप
* पाकिस्तानच्या अर्थिक सुधारणेसाठी ०८ अब्ज डॉलर्सची गरज
* सध्या खुल्या प्रवर्गातील पदांची भरती करणार- मुख्यमंत्री
* इंटरनेट पुरवणार्या यंत्रणेत दुरुस्तीची कामे स्रुरु, काही काळ सेवा बंद राहण्याची शक्यता
* जितेंद्र आवाड यांनी उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
* कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीत ५०-५० जागांची मागणी
* कल्याणच्या कॅनरा बॅंकेच्या व्यवस्थापकाला बोलण्यात गुंतवून सहा लाख लांबले
* अहमदाबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं ३१ ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी करणार अनावरण
* यंदा शाळकरी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या कमी
* राज्यात ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून होणार सुरू, साडेनऊशे लाख टन ऊस गाळप होण्याची शक्यता
* मंत्रालयात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, सक्तीने सेवानिवृत्त केल्याचा आरोप
* राज्यात स्वाइन फ़्ल्युमुळे १९९ जणांचा मृत्यू, लस घेण्याबाबत खुद्द डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येच उदासीनता
* दिवाळीत शिधापत्रिका धारकांना एक किलो साखर देणार, राज्याला भेसळमुक्त करण्यासाठी मोकानुसार कारवाई- गिरीश बापट
* आगामी निवडणुकांमध्ये भाजप सत्तेत येईल असा विश्वास संघास वाटत नाही, संघ नरेंद्र मोदींना बकरा बनवतोय- प्रकाश आंबेडकर
* सुप्रीम कोर्टानेच राफेल व्यवहाराची माहिती मागितल्याने सरकारची गोची झालीआहे- सामनाचा अग्रलेख
* राफेल प्रकरणात लपवण्यासारखे आता काहीच उरले नाही, राफेलचे नाणे खणखणीत नाही, इकडचे तिकडचे सांगण्यापेक्षा राफेलच्या किंमतीवरच बोला
* म्हाडाच्या लॉटरीतील घरांच्या किंमती २५ ते ३० टक्क्यांनी असणार कमी
* विक्रीअभावी पडून असलेली २४४१ घरे पोलिसांना देण्याचा म्हाडाचा विचार
* डेक्कन क्वीन व पंचवटी एक्सप्रेसमध्ये १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिनापासून फिरते ग्रंथालय
* काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी दुग्ध विकास व पशु संवर्धन मंत्री आनंदराव देवकते यांचे वृद्धापकाळाने निधन
* इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. झाकिर नाईक यांच्या मुंबईतील पाच मालमत्ता जप्त करण्याचे आदेश
* मुंबईत औषधविक्रेत्यांना बनावट औषध निरीक्षकांच्या दूरध्वनीवरुन धमक्या, कारवाई टाळण्यासाठी रक्कम बँकेत जमा करण्याची मागणी
* पुण्यात कालवा फुटण्याचे मुख्य कारण कालव्यालगत वसलेल्या झोपड्या, त्यांचा कचरा, घाण आणि उंदीर- कृष्णा खोरे विकास महामंडळ
* डेबिट आणि क्रेडिट कार्डचा डेटा चोरून देश आणि परदेशातील नागरीकांना कोट्यवधींचा गंडा घालणारे सहाजण मुंबई पोलिसांच्या जाळ्य़ात
* राज्यातील ४७ टक्के नागरिकांनी वर्षभरात लाच दिली- 'ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया'चे सर्वेक्षण, देशात लाच देणाऱ्यांचा आकडा ५६ टक्के
* नाशिक जिल्ह्यात रावण दहनाला आदिवसी संघटनांचा विरोध, अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्याचा इशारा
* नंदूरबारमधून ०२ कोटी ४० लाख लुटणारे पाच जण गुजरातमध्ये पकडले
* लोकलमधील वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून डबल डेकर ट्रेन सुरू करण्याचा विचार का करत नाही?- उच्च न्यायालय
* स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेतील सर्व्हरवर सायबर हल्ला, १४३ कोटींची लूट झाल्याची माहिती
* 'मी टू' प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायाधीश आणि कायदेतज्ज्ञांची समिती नेमणार- महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी
* संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेवर भारताचा विजय, मानवाधिकार केवळ घोषणा नव्हे तर तो संस्काराचा एक भाग व्हावा- नरेंद्र मोदी
* २०१९ पूर्वीच राम मंदिर उभारणीस सुरुवात करा, तीन तलाक, एससी- एसटी अॅक्टसाठी कायदा होतो, राम मंदिरासाठी का नाही?- संजय राऊत
* राम मंदिरप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयच मान्य केला पाहिजे- दिग्विजय सिंह
* शीख महिलांना हेल्मेट सक्ती करू नका- केंद्रीय गृहमंत्रालय
Comments