* रामदेवबाबांची पतंजली कपडेही विकणार, दिल्लीत त्यांनी केले शोरुमचे उदघाटन
* मुंबईचा कचरा अंबरनाथमध्ये, गावकर्यांचा विरोध
* आज आणि उद्या राज्यात पावसाची शक्यता
* इंदापुरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रदीप निंबाळकर यांची आत्महत्या
* चार दिवसांपूर्वीच झाली होती अध्यक्षपदी निवड
* अयोध्येत राम मंदीर शरयू नदी किनारी मोठ्या प्रमाणावर सुरेख रोषणाई
* पेट्रोल १४ तर डिझेल १० पैशांनी स्वस्त
* दिवाळीत अनेक दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन
* वन्यजीव रक्षणाबाबत सरकार संवेदनशील, अवनी वाघिणीच्या मृत्युची होणार चौकशी - मुख्यमंत्री
* फराळाचे सर्वच पदार्थ खूप आवडतात, प्रत्येक दिवाळीत पाच किलो वजन वाढायचे, आता फराळ लपून खातो- मुख्यमंत्री
* आरोपपत्र दाखल करताना राज्याची मंजुरी न घेतल्याने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन संचालक देवेंद्र शिर्केसह चारजण दोषमुक्त
* मराठवाड्यातील बोंडअळीबाधित शेतकऱ्यांना मिळाला अनुदानाचा अंतिम हप्ता
* संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन शुक्रवारी नाशिकमध्ये अत्याधुनिक वज्र आणि होवेत्झर तोफा लष्कराला करणार हस्तांतरीत
* वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अवनी वाघीणला ठार करण्याविरोधात नागपुरात युवा काँग्रेस व वन्यजीव प्रेमींचे आंदोलन
* राज्यात ४९ लाख ५० हजार शेतकरी कर्जमाफी लाभार्थीच्या यादीत, आतापर्यंत २१ हजार कोटींचे वितरण- देवेंद्र फडणवीस
* नागपुरात दरोडेखोरांनी लुटले ७९ किलो केस
* येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णाची कर्मचाऱ्यांना मारहाण, रुग्णाने दारू प्यायल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे
* धनत्रयोदशीच्या दिवशी कोकणचा राजा हापूस आला बाजारात
‘* गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झाल्याने तो आयसीयूत, लोकसभा निवडणुकीनंतरच येईल शुद्धीवर- राज ठाकरे यांचे व्यंगचित्र
* दिवाळीच्या सणांमध्ये या आठवड्यात चार दिवस बँकांना सुट्या, मंगळवार आणि शुक्रवार दोनच दिवस बँका सुरू
* पाच जणांचे प्राण घेणाऱ्या कल्याण येथील विहीरीत सडलेला गाळ आणि कचऱ्यातून मिथेन वायू निर्माण झाल्याचे उघड
* राज्याचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार जयंत सावरकर यांना तर अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत जीवनगौरव विनायक थोरात यांना जाहीर
* लक्ष्मी पूजन करण्यासाठी बुधवारी सायंकाळी ०६.०२ मिनिटांपासून रात्री ०८.३५ मिनिटापर्यंत मुहूर्त- दा. कृ. सोमण
* ई स्टोअरवरून विकल्या जाणाऱ्या पाच वस्तूंमध्ये एक वस्तू बनावट- सर्वेक्षण
* 'झिरो' सिनेमावरुन वाद; शाहरुख खानविरोधात अकाली दलाच्या आमदाराची पोलिसांत तक्रार
* विद्यापीठांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी आता पीएच.डी पदवी बंधनकारक
* देशातील सर्वच प्रमुख रेल्वेस्थानकांवर फ़डकणार तिरंगा
Comments