HOME   महत्वाच्या घडामोडी

अवनी वाघिणीवरुन पेटले राजकारण, ठाकरे-निरुपम यांची वादात उडी, दानवेंच्या सभेतून गोटेंना बाहेर काढले, पुण्यात १५० इलेक्ट्रीक बसेस, घाणेकर चित्रपटाला प्राईम टाईम......११ नोव्हेंबर २०१८


अवनी वाघिणीवरुन पेटले राजकारण, ठाकरे-निरुपम यांची वादात उडी, दानवेंच्या सभेतून गोटेंना बाहेर काढले, पुण्यात १५० इलेक्ट्रीक बसेस, घाणेकर चित्रपटाला प्राईम टाईम......११ नोव्हेंबर २०१८

* अवनी वाघिणीची शिकार करणारे चौकशी समितीवर कसे? उध्दव ठाकरे यांचा सवाल
* साखर कारखान्याने अटी मान्य केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली आणि कोल्हापुरातलं चक्का जाम आंदोलन स्थगित
* ऊस दर जाहीर न करता कारखाने सुरु करणार्‍यांविरुध्द स्वाभिमानीचे आंदोलन सुरुच
* नियमबाह्य फटाके वाजवल्याने मुंबई आणि ठाण्यात शेकडोंवर गुन्हा अटकेची कारवाई
* नोटाबंदीनुळं देशाचं नुकसान रिझर्व बॅंकेचे माजी अध्यक्ष रघुरामन राजन यांचा दावा
* सलग सुट्यांमुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी, तीन लाखजणांनी घेतलं दर्शन
* धुळ्यात पोलिसावर हल्ला करणार्‍या गुंडाचा भाजपात प्रवेश
* आज पेट्रोलच्या भावात १६ तर डिझेलच्या दरात १३ पैशांनी कपात
* नांदेडच्या उमरी तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याने स्वत: सरण रचून केली आत्महत्या
* धुळ्यात आ. अनिल गोटे यांचा दानवेंच्या सभेत घुसून बोलण्याचा प्रयत्न, पोलिसांनी काढले बाहेर
* अवनी हत्येप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पदावरुन हटवा, संजय निरुपम यांची मागणी
* दिवाळीत औरंगाबादेत फटाके बाजार आणि कापड बाजारात पन्नास टक्के घट
* पुण्यात प्रायोगिक तत्वावर धावली इलेक्ट्रीक बस, आणखी १५० बसेस येणार
* सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा पाहण्यासाठी काल २७ हजार पर्यटकांची गर्दी
* सकल मराठा समाजाचे आझाद मैदानावर दहा दिवसांपासून उपोषण सुरु
* काशिनाथ घाणेकर चित्रपटाला मल्टीफ्लेक्स थिएटर आजपासून मिळणार प्राईम टाईम
* चला हवा येऊ द्या, मालिकेवर आग्री समाजाचा आक्षेप, अवमान झाल्याचा आरोप
* सेनेसोबत आमचे प्रेम प्रकट असल्यानेच आम्ही वारंवार युतीसाठी हात पुढे करतो, त्यांचे प्रेम छुपे- मुख्यमंत्री
* औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे, सेनेच्या नामकरण मागणीला अर्थ नाही
* अवनी वाघीणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळेच ठार करण्याशिवाय पर्याय नव्हता- मुख्यमंत्री
* मनेका गांधी वन्यप्राणी चळवळीच्या कार्यकर्त्या त्यामुळे त्यांची भावना समजू शकतो- मुख्यमंत्री
* दारुबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारुची तस्करी करणाऱ्या आठ महिलांना दारुसाठ्यासह अटक
* सिंचन घोटाळयात अजित पवारांसंदर्भात लवकरच प्रतिज्ञापत्र दाखल करणार- मुख्यमंत्री
* शनिशिंगणापूर येथे गुरुवारी मराठा महासंघ व मराठा शेतकरी महासंघाचे शेतकरी वारकरी संमेलन, मुख्यमंत्री राहणार उपस्थित
* नागपूर येथे २५ नोव्हेंबर रोजी होणार श्रीराम जन्मभूमी करिता जन संकल्प सभा, काढणार हुंकार रॅली
* अवनीला मारण्याचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले नाहीत- वन विभाग
* अवनी मृत्यूप्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात असणार्‍यांनी उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याच्या वल्गना करू नयेत- नीलम गोऱ्हे
* अवनी वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेल्यांचे नातेवाईक सरकारकडे मागणार जगण्याचा अधिकार
* अवनीच्या मृत्यूप्रकरणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राजीनाम्यासाठी नागपुरात यूथ काँग्रेसची निदर्शने
* चंद्रपूर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
* जायकवाडी धरणात पोहचले ०३.९ टीएमसी पाणी, मार्गावरील बंधाऱ्यात अडवले पाणी
* आजपासून पेण ते पनवेल मार्गावर डिझेलऐवजी लोकल आणि मेलच्या डब्यांचा संयोग साधलेल्या मेमू डब्यांची सेवा सुरू
* डोंबिवलीत विनापरवाना बँकेप्रमाणे ठेवी गोळा करून ठेवीदारांना १५ कोटीचा गंडा, 'प्रथमेश ज्वेलर्स'च्या मालकावर गुन्हा
* ठाणे रेल्वे स्थानकात विनयभंग करणार्‍याला तरुणीने प्रवाशांच्या मदतीने दिला चोप
* नौदल नोकरीसाठी तरुणांना बोगस नियुक्तीपत्रे देणारा नौदलाचा निवृत्त कॅप्टन गजाआड, विशाखापट्टणमला बोगस डिफेन्स अॅकॅडमी काढल्याचे उघड
* छत्तीसगड विधानसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी १२ नोव्हेंबरला मतदान
* अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मार्गात काँग्रेसचा खोडा- योगी आदित्यनाथ
* आग्रा शहराचं अग्रवाल असं नामकरण करा- भाजप नेत्यांची मागणी
* मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना दरवर्षीऐवजी दोन वर्षांनी एकदा फिटनेस सर्टिफिकेट चाचणी करण्याची सवलत
* महिला टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा- आज भारताचा पाकिस्तानबरोबर सामना


Comments

Top