HOME   महत्वाच्या घडामोडी

७५ रुपयांचं नाणं, मराठा आरक्षण आज होणार सादर, मुंबईत पाणी कपात, कल्याण जिल्हा, देसाई आज शबरीमला मंदिरात, अंधांना आरक्षण द्या......१५ नोव्हेंबर २०१८


७५ रुपयांचं नाणं, मराठा आरक्षण आज होणार सादर, मुंबईत पाणी कपात, कल्याण जिल्हा, देसाई आज शबरीमला मंदिरात, अंधांना आरक्षण द्या......१५ नोव्हेंबर २०१८

* पेट्रोल १४ तर डिझेल ११ पैशांनी स्वस्त
* ओला उबेर टॅक्सीचालक पुन्हा १७ नोव्हेंबर रोजी जाणार संपावर
* मराठा आरक्षणाचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज सादर होणार
* या महिन्य़ाच्या आखेरपर्यंत मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेऊ- मुख्यमंत्री
* मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकरीत स्वतंत्रपणे दहा टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याची शिफारस
* ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का न लावता आरक्षण देता येईल- राज्य मागासवर्गीय आयोग
* कुणबी मराठा वगळून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देता येईल
* मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर १४ दिवसांपासून सुरुच
* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसची तीन दिवस बैठक
* मुंबईत आजपासून १० टक्के पाणीकपात, पाणी साठा झाला १५ टक्क्यांनी कमी
* नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ लवकरच येणार ७५ रुपयांचं नाणं
* स्वतंत्र कल्याण जिल्हा जाहिर करा, स्थानिक आमदारांची मागणी
* जीएसएलव्ही २९ सर्वात जड उपग्रह झेपावला
* जीएसएटी-२९ मुळं दळणवळण उपग्रहामुळे जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील संपर्क यंत्रणा बळकट होणार- इस्रो
* नीरव मोदी परकीय बॅंकांचं कर्ज फेडणार
* तृप्ती देसाई आज शबरीमला मंदीरात जाणार
* अंध व्यक्तींना नोकरीत आरक्षण देण्याची सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश
* अश्विनी बिद्रे पोलिस अधिकार्‍याच्या हत्येचा तपास वर्षभरात पूर्ण करा- न्यायालयाचा आदेश
* दहावीचा अभ्यासक्रम बदलला, भाषा आणि समाजशास्राची तोंडी परीक्षा रद्द, शिक्षण विभाग घेणार सराव परीक्षा
* उद्धव ठाकरे २४ नोव्हेंबरला अयोध्येत शरयू नदीवर रामाची आरती करणार त्याचवेळी राज्यातही होणार रामाची आरती
* दुष्काळामुळे पुणे शहरात येणाऱ्या कुटुंबांना मिळणार रेशन
* संघ प्रणित भाजप सरकार ही देशावरील मोठी आपत्ती- जोगेंद्र कवाडे
* समृद्धी महामार्गाऐवजी बाळासाहेबांचे नाव सदाशीव पेठेला द्या, ठाकरे पेठ म्हणा, विदर्भासाठी सेनेने काही केले का? - श्रीहरी अणे
* भीमा कोरेगाव हिंसाचार: चौकशी आयोगासमोर शरद दाभाडेंची उलट तपासणी
* रस्त्यावर थुंकणाऱ्या, अस्वच्छता करणाऱ्या २८६ व्यक्तींकडून पुणे महापालिकेने केला ६५ हजार दंड वसूल
* औरंगाबाद जिल्ह्यात मराठा संवाद यात्रा काढण्याचा मराठा क्रांती मोर्चाचा निर्णय
* सेनेचे आमदार तानाजी सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी पंढरपुरात राजू शेट्टींच्या प्रतिकात्मक पुतळ्याची काढली गाढवावरुन धिंड काढली
* मराठवाड्यातील विरोधी पक्षाचा दुष्काळ दौरा फक्त इलेक्शन स्टंट- संभाजी पाटील निलंगेकर
* लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने २१ नोव्हेंबरला आझाद मैदानात २० हजार शेतकऱ्यांचा मोर्चा
* उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या ९६ प्राध्यापकांना पुन्हा घेतले कामावर
* संसदेचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर ते ०८ जानेवारी
* राफेल खरेदी व्यवहार याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून
* गुजरातमधील गीर अभयारण्याबाहेरील संरक्षित श्रेत्रात कॅमेरानं टिपले १९ सिंह
* भाजप खासदार हरीशचंद्र मीणा आणि आमदार हबीबुर रहमान काँग्रेसमध्ये दाखल
* महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एक जानेवारी २०१९ पासून सार्वजनिक वाहनांमध्ये जीपीएस आणि आपातकालीन बटणाचा समावेश


Comments

Top