HOME   महत्वाच्या घडामोडी

बाळासाहेबांचा स्मृतीदिन, जानेवारीत सातवा आयोग, मुंबईत दोन तरंगती हॉटेल्स, नाना महिला आयोगासमोर, शिल्पाचा साईंना सोन्याचा मुकूट......१७ नोव्हेंबर २०१८


बाळासाहेबांचा स्मृतीदिन, जानेवारीत सातवा आयोग, मुंबईत दोन तरंगती हॉटेल्स, नाना महिला आयोगासमोर, शिल्पाचा साईंना सोन्याचा मुकूट......१७ नोव्हेंबर २०१८

* बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यास आज मुख्यमंत्री येणार शिवाजी पार्कवर
* पंकज भुजबळ यांनी भायखळा मतदारसंघात बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त लावला अभिवादनाचा फलक
* बेळगावमध्ये 'शिवाजी महाराज की जय' म्हणणार्‍या विद्यार्थ्याला शिक्षकाची मारहाण
* झिम्बाब्वेत बसला आग, ४२ प्रवाशांचा म्रूत्यू
* सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अहवाल महिनाअखेपर्यंत होणार सादर
* जानेवारी २०१९ पासून राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ
* राम मंदीर न झाल्यास देशातील धार्मिक वातावरण बिघडेल- रामदेवबाबा
* विठ्ठल उमाप पुरस्कारांची घोषणा
* मुंबईत आज दोन तरंगत्या रेस्टॉरंटचे उद्घाटन
* मीटू प्रकरणी नाना पाटेकारांनी महिला आयोगासमोर मांडली बाजू
* तनुश्री दत्ताने मात्र वकिलामार्फत महिला आयोगाला पाठवले पत्र
* अभिनेत्री शिल्पा शेट्टीने साईबाबांना अर्पण केला सोन्याचा मुकूट
* मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही- मराठा क्रांती मोर्चा
* शिर्डी साई संस्थान मंदिराचे प्रमुख राजेंद्र जगतापांविरोधात विनयभंगाचा गुन्हा
* विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात धडकणाऱ्या मोर्चांना परवानगी नाकारत थेट आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
* पेट्रोल १९ तर डिझेल २० पैशांनी स्वस्त
* ओला उबेर टॅक्सीचालकांचा बेमुदत संप आजपासून
* राजीव सातवही लोकसभा लढण्यास अनुत्सुक
* प्रसार माध्यमांवर सेन्सॉरशीप लावता येणार नाही- केंद्र सरकार
* बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन
* नाशिकात हेल्मेट न घालणार्‍या महिला पोलिसाला दंड
* अवनी वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी समितीची स्थापना काही बदल केले
* चिपळूणमध्ये सापळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू
* औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाची संवाद यात्रा
* राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण केल्याप्रकरणी जालना-औरंगाबाद मार्गावर रास्ता रोको
* भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर
* बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी महिलेने स्वत:ची चिता रचून केली आत्महत्या
* राज्याचा पाहिलाच 'एकात्मिक राज्य जल आराखडा' तयार, राज्यातील सहा नदीखोऱ्यांतील भूजलाचा आणि भूपृष्ठावरील पाणी वापराचा विचार
* महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सांगोल्यात जलपूजन
* भिमा कोरेगाव प्रकरणाची पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये
* पुणे-नांदेड पॅसेंजर रेल्वेत चोरी केलेल्या आरोपीला दोन महिने सक्तमजुरी
* पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचे काम लवकरच सुरू करणार- मुख्यमंत्री
* आरपीएफच्या १० हजार पदांसाठी देशभरातून ९५ लाख अर्ज दाखल
* सीबीआयने जप्त केलेल्या पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाशी संबंध नाही- बचाव पक्षाचा दावा
* पश्चिम बंगालमध्ये सीबीआयला छापे मारण्यासाठी अथवा तपासासाठी घ्यावी लागणार ममता सरकारची पूर्वपरवानगी


Comments

Top