HOME   महत्वाच्या घडामोडी

ताडोबात मोबाईलला बंदी, अमेरिकेचे रोमिओ हेलिकॉप्टर्स, दुष्काळी भागातील परिक्षा शुल्क माफ, क्रेनने उचलणार पूल, तृप्ती न सांगताच जाणार मंदिरात......१८ नोव्हेंबर २०१८


ताडोबात मोबाईलला बंदी, अमेरिकेचे रोमिओ हेलिकॉप्टर्स, दुष्काळी भागातील परिक्षा शुल्क माफ, क्रेनने उचलणार पूल, तृप्ती न सांगताच जाणार मंदिरात......१८ नोव्हेंबर २०१८

* अवनी वाघिणीचे दोन्ही बछडे सुरक्षित, वनविभागाच्या कॅमेर्‍याने टिपले
* नाशिकमध्ये भाव मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटोची झाडे उपटून फेकली, केवळ रुपया ते दीड रुपया
* शिवडी ते एलिफंटा रोप वे तयार करण्याची प्रक्रिया, चार महिन्यात होईल तयार
* रोप वे जाणार समुद्रावरुन, भारतातील सर्वात मोठा आठ किलोमीटरचा रोप वे
* मराठा आरक्षण द्या पण ओबीसींच्या आरक्षणाला हात लावू नका- छगन भुजबळ
* आपला राजीनामा घ्या, शिवसेना नगरसेवक हर्षवर्धन जाधव यांनी छापली जाहिरात
* लातुरात एमआयएम अली पक्षानं काढली मोटारसायकल रॅली
* ताडोबा अभयारण्यात एक डिसेंबरपासून मोबाईलवर पूर्णत: बंदी
* आज मराठा आरक्षणाचा अहवाल मंत्रीमंडळासमोर मांडला जाणार
* भारत अमेरिककडून खरेदी करणार ‘रोमिओ’ हेलीकॉप्टर्स
* अहमदनगरातील देवीच्या मंदिरात्दागिने आणि रोख रकमेची चोरी
* कांद्याचे भाव पडल्याने शेतकर्‍यांनी बंद पाडला बाजार
* परभणीतील १२ बेशिस्त पोलिसांना केले निलंबित
* मुंबईतील अतिशय जुना पत्री पूल महाकाय क्रेनने उचलून बाजुला ठेउन नष्ट करणार
* मराठा आंदोलकांचे उपोषण मागे
* उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येत करणार शक्ती प्रदर्शन, जोरदार तयारी सुरु
* संघ काढणार २५ नोव्हेंबर पासून हुंकार रॅली
* दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय
* वन व महसूल विभागाने जाहीर केलेल्या २६८ महसुली मंडळातील विद्यार्थ्यांनाही सवलत
* राज्य सरकारने दुष्काळ निवारणासाठी निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्यावा- शरद पवार
* मराठा समाजाला आरक्षणाला विरोध नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये- छगन भुजबळ
* पुढच्या वेळी घोषणा न करताच शबरीमला जाणार- तृप्ती देसाई
* मुंबईत नितीन गडकरींनी केले मरिना आणि रोप वे प्रकल्पांचे उद्घाटन
* दाभोलकर हत्या- सचिन अंदुरे, शरद कळस्करवर दोषारोप पत्र दाखल करण्यास ४५ दिवसांची मुदत
* गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर मराठा आंदोलकांचे उपोषण मागे
* मुस्लिम आरक्षणासाठी आत्महत्या करु द्या- औरंगाबाद मुस्लिम अवामी कमिटी अध्यक्षांची मागणी
* अल्पवयीन नातीवर बलात्कार करणारा भोंदू बाबा पिंपरी-चिंचवडमध्ये गजाआड
* काँग्रेसचे स्टार प्रचारक नवज्योत सिंग सिद्धू यांना सुरक्षा द्या- काँग्रेस
* काँग्रेसने गांधी घराण्याबाहेरचे १५ अध्यक्ष दिलेत- पी. चिदंबरम
* काँग्रेसने गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करून दाखवावा- पंतप्रधानांचे होते आव्हान
* हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार- राधाकृष्ण विखे पाटील
* आरक्षण अहवाल सभागृहात सादर होण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांचे जल्लोष करण्याचे वक्तव्य
* जाहिरात श्रेत्रातील मोठे नाव असलेले अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन
'सर्फ', 'चेरी ब्लॉसम', 'लिरील गर्ल', 'हमारा बजाज', 'फेअर अँड लव्हली' जाहिराती पदमसी यांच्या
* मध्य प्रदेश निवडणुक- भाजपचा 'दृष्टीपत्र' जाहीरनामा, देणार विद्यार्थ्यांना मोफ़त स्कूटी
* टीका रोखण्यासाठी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी केली जनसंपर्क यंत्रणा
* गुंतवणूकदारांनी केली झुकेरबर्गना चेअरमनपदावरून हटवण्याची मागणी- 'न्यूयॉर्क टाइम्स'
* महिला टी-२० विश्वचषक- भारताचा ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय
* कोरियातील सॉफ्ट टेनिस स्पर्धेसाठी औरंगाबादच्या श्रावणी हारदेची निवड


Comments

Top