HOME   महत्वाच्या घडामोडी

लातुरचे ३०० शिवसैनिक अयोध्येला रवाना, ठाकरे सहपरिवार अयोध्येकडे, समाजसेवक लोहियांचे निधन, अयोध्येत लष्कर तैनात करण्याची मागणी, २३५ शेतकर्‍यांच्या आत्महत्या......२४ नोव्हेंबर २०१८


लातुरचे ३०० शिवसैनिक अयोध्येला रवाना, ठाकरे सहपरिवार अयोध्येकडे, समाजसेवक लोहियांचे निधन, अयोध्येत लष्कर तैनात करण्याची मागणी, २३५ शेतकर्‍यांच्या आत्महत्या......२४ नोव्हेंबर २०१८

* लातुरचे ३०० शिवसैनिक अयोध्येला रवाना
* लातूर शहरातून ५० शिवसैनिक व्हाया नांदेड अयोध्येत
* अयोध्येत सीआरपीएफच्या तुकड्या तैनात
* हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपा आणि सेनेची युती शक्य
* लातुरातून शिवसैनिक जगदंबेची आरती करुन अयोध्येकडे रवाना
* मानवलोक संस्थेचे सर्वेसर्वा ज्येष्ठ समाजसेवक डॉ. द्वारकादास लोहिया यांचे वृध्दापकाळाने निधन
* उध्दव ठाकरे आदित्य ठाकरेंना घेऊन आज आयोध्येत दाखल होणार
* राज्यभरातून हजारो शिवसैनिक अयोध्येकडे रवाना, कडक सुरक्षा तैनात
* लातूरचे शिवसैनिक नांदेडमार्गे अयोध्येकडे रवाना
* राम मंदिराच्या मुद्द्याचा जनतेवर भुलणार नाही- शरद पवार
* राम मंदिरासाठी अध्यादेश काढा शिवसेनेची केंद्राकडे मागणी
* अयोध्येत अनेक हिंदुत्ववादी संघटना एकत्र येणार
* राज्यात दुष्काळ असताना राम मंदिरावर खर्च कशाला- कॉंग्रेस
* सबंध देशात भाजपविरोधी एकच आघाडी उभारणी अशक्य, राज्यानुसार अशा आघाड्या उभारणार
* अयोध्येत लष्कर तैनात करावं, अखिलेष यादव यादव यांची मागणी
* अयोध्येत शिवसेनेला व्यापार्‍याकडून होणारा विरोध मावळला, शिवसेना मंत्र्यांनी काढली समजूत
* कॉंग्रेसचाच पंतप्रधान राम मंदिर उभारणार सीपी जोशींचे विधान, मागितली माफी
* कर्नाटकच्या एका राव नावाच्या भक्तानं विठुरायाला अर्पण केला २५ लाखांचा चंद्रहार
* गडचिरोलीत तस्कराला अटक, तीन खवले मांजर जप्त
* राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाहिला टी २० सामना
* पुण्यात हेल्मेट सक्तीला थंडा प्रतिसाद
* रत्नागिरीत सापडला ७० किलो वजनाचा मासा
* मराठा आरक्षणाबाबत सरकार फसवणूक करतंय- शरद पवार
* नांदेडमध्ये महिलांनी केले परमिट रुम उध्वस्त
* राम जन्मभूमीप्रकरणी लखनौ विशेष न्यायालयाचे शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांना समन्स, २८ नोव्हेंबरला सुनावणी
* लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी, चाळीस जागेचा सुटला तिढा - शरद पवार
* रविवारी मुंबईत निघणार 'संविधान जागर यात्रा'
* जैतापूर प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण पूर्ण- ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रकल्पाला शिवसेनेचा होता विरोध
* अवघ्या सतरा मिनिटांत बाबरी मशीद पाडली, राममंदिरासाठी कायदा करायला आणखी किती वेळ हवा?- संजय राऊत
* राममंदिर उभारणीला विरोध करणाऱ्यांना देशात फिरणे मुश्किल होईल- संजय राऊत
* सप्टेंबर महिन्यात राज्यभरात २३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या- चंद्रकांत पाटील, लेखी उत्तरात
* सेन्सॉर बोर्डावरील महिला सल्लागाराला खंडणी मागून शरीरसुखाची मागणी करणारा 'अलबत्या गलबत्या' नाटकातील सागर सातपुतेवर गुन्हा
* भिवंडीत बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करताना तरुणीवर बलात्कार करणारा पोलिस उपनिरीक्षक गजाआड
* प्रेमानंद गजवी यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
* नैसर्गिक आपत्तींचा इशारा वेळेआधी मिळण्यासाठी भारतीय हवामान विभागाने विकसित केलं नवं तंत्रज्ञान
* 'मेक इन इंडिया' अंतर्गत मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तुंची होणार निर्मिती
* देशाच्या परकीय चलनाच्या राखीव साठ्यात ५६.९० कोटी डॉलरची वाढ
* राहुल गांधींना शेतकऱ्यांचा कळवळा आहे तर त्यांनी शेतात बैल जुंपले आहेत का?- अमित शाह
* सणांच्या काळात वाहनांची विक्री घटली ११ टक्क्यांनी
* महिला टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट- उपांत्य फेरीत भारतावर ०८ विकेटनी मात करत इंग्लंड अंतिम फेरीत
* फ्रान्समधील स्वयंसेवी संस्थेच्या तक्रारीनंतर फ्रान्समध्येही राफेल डीलची होणार चौकशी


Comments

Top