* सरकारने विधानसभेत मांडला मराठा आरक्षणाचा कृती आराखडा (एटीआर), १६ टक्क्यांची शिफारस
* सुभाष देशमुखांच्या मुलावर गुन्हा दाखल, पाच कोटींचं अनुदान लाटल्याचा आरोप
* सरकार मराठा आरक्षणाच्या अहवालातील शिफारसी सरकार का सांगत नाही, सबंध राज्याला अंधारात का ठेवता?- अजित पवार
* मराठा समाजाला आरक्ष्ण किती टक्के मिळणार हे का सांगत नाही- अजित पवार
* आरक्षण प्रश्नावर अधिवेशनाचा कालावधी न पुरल्यास कालावधी वाढवू, पण याच अधिवेशनात ठोस निर्णय घेऊ- चंद्रकांत पाटील
* अजित पवारांकडूनच राजकारण शिकलो- चंद्रकांत पाटील
* मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा भाजपाचा खटाटोप, पोस्टरबाजी आणि जल्लोष करण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना
* मराठा आरक्षण उप समितीची बैठक सुरु, पंकजा मुंडे बैठकीतून बाहेर, चंद्रकांत पाटलांनी केला समजूत घालण्याचा प्रयत्न
* पंकजा मुंडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
* मराठा आरक्षणासाठी विरोधी आमदारांचे विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन; मराठा, मुस्लीम आणि धनगर आमदार एकत्र
* मराठा आरक्षण अहवाल आज विधानसभेत मांडणार
* शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे २१ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा- अखिल भारतीय किसान संघर्ष समिती
* देशभरातील लाखो शेतकरी आज आणि उद्या दिल्लीत दाखल करणार आंदोलन
* ५२ टक्के ओबीसींना पुरेसे आरक्षण दिलेले नाही, ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे आज 'आक्रोश धरणे आंदोलन'
* सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला मराठा समाज आरक्षणासाठी पात्र, अपवादात्मक परिस्थितीत राज्य सरकार आरक्षण देऊ शकेल
* महिलांच्या संरक्षणासाठी पॅनिक बटन चेन उपलब्ध करून देण्याचा विचार- गृह राज्यमंत्री दीपक केसरकर
* मदतीसाठी पॅनिक बटन दाबल्यानंतर पोलिसांना कळणार महिलांचे लोकेशन, ०१ हजार किंमतीच्या चेनवर सबसिडी देण्याचा विचार
* गिरणी कामगारांना घरे देण्याबाबत राज्य सरकारला १७ डिसेंबरपर्यंत 'डेडलाइन' त्यानंतर कोणत्याही क्षणी आंदोलन
* राज्यातील विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची पाहणी करण्याचा निर्णय, पहिली ते बारावीपर्यंतच्या ५० शाळांची पाहणी होणार
* नाणार प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाला स्थगिती, स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची ताबडतोब घेणार दखल - मुख्यमंत्री
* निवडणुकीच्या काळात अजित पवार यांना अडकवण्याचा प्रयत्न- छगन भुजबळ
* रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याच्या समजुतीमुळे मुंबईतील कौसा, मुंब्रा भागांत पालकांचा विरोध
* जानेवारीत यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा खर्च दुष्काळामुळे कमी करण्याचे साहित्यिकांचे आवाहन
* वाय-फायसाठी ३८ ठिकाणी खोदकाम करण्यास स्मार्ट सिटी कंपनीला पुणे पालिकेने नाकारली परवानगी
* पुणे येथे बनावट नोटा देऊन खरेदी करणार्या तरुणाला चार वर्ष सक्तमजुरी आणि ०२ हजारची शिक्षा
* ३० हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून अनुदान जाहीर
* राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी, मुलासह शिवसेनेत प्रवेश
* सिंचन घोटाळा खटला चालवण्यास न्या. रावी देशपांडे यांचा नकार
* बाजार समिती विधेयक मागे, राज्य सरकारची विधान परिषदेत घोषणा
* पत्रकार अलोक देशपांडे यांना नाणारवासीयांना भेटण्यास मनाई करणाऱ्या आणि गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांची चौकशी होणार- मुख्यमंत्री
* शरद पवार यांना महात्मा फुले समता पुरस्कार प्रदान
* मनुवादाचा विचार संपवायचा असेल तर फुले दाम्पत्याचा विचार पुढे न्यावा लागेल- शरद पवार
* नाशिकच्या काळाराम मंदिरात शिवसैनिकांनी केला शरयू तीर्थ जलाभिषेक
* औरंगाबादच्या व्हिडिओकॉन समुहाच्या वीस हजार कोटींच्या कर्ज वसुलीसाठी धूत बंधुंच्या पर्सनल गॅरंटीचा उपयोग करा- बॅंकांची मागणी
* नागपुरच्या बिशप कॉटन स्कूलचे ०१.४० कोटी हडपले, माजी मुख्याध्यापिकेसह तिघांविरुद्ध गुन्हा
* भारत देश पंतप्रधान मोदींच्या वडिलांचा किंवा त्यांच्या आजोबांच्या मालकीचा नाही- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव
* अनुकंपा तत्त्वावरील नोकरीच्या बाबतीत मुलगा-मुलगी भेद केला जाऊ शकत नाही- उच्च न्यायालय
* पॅन कार्डचे सुधारित नियम-
* अडीच लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे व्यवहार करणाऱ्यांना पॅन कार्ड अनिवार्य
* संचालक, व्यवस्थापकीय संचालक, भागीदार, ट्रस्टी, लेखक, संस्थापक, कर्ता, सीईओ यांना पॅनकार्ड बंधनकारक
* ३१ मे २०१९ पर्यंत पॅनकार्डसाठी अर्ज करणे अनिवार्य
* निवासी संस्थांसाठीही पॅन कार्ड आवश्यक
* संस्थेची उलाढाल ०५ लाखांपेक्षा अधिक नसेल तरी पॅनकार्ड क्रमांक द्यावा लागणार
* अर्जादाराची आई एकल माता असेल तर वडिलांचं नाव नमूद न करण्याची सवलत
* मानसिक आणि शारीरिक छळ करणार्या मुले-मुलींना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार मिळणार ज्येष्ठ नागरिकांना
* यूपीएससीच्या अध्यक्षपदी अरविंद सक्सेना यांची नियुक्ती
* निर्भया फंडला केंद्र सरकारकडून ३२१.६९ कोटींचा निधी जाहीर
* 'अॅमेझॉन'ने पटकावला देशांतर्गत बाजारपेठेतील अव्वल क्रमांकाची ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मान
Comments