* लातूर जिल्ह्यासाठी सहा सोलार उर्जा प्रकल्पांना मंजुरी
* भूकंपग्रस्तांना मिळालेली घरे आता होणार त्यांच्या मालकीची
* मराठा समाजाच्या आरक्षण विधेयकावर आज होणार राज्यपालांची स्वाक्षरी
* सोमवारी निघणार अध्यादेश, न्यायालयात आव्हान दिले जाऊ नये म्हणून कायदेशीर तयारी
* दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद झाल्याने वेगळी चर्चा सुरु
* इस्रोच्या निरीक्षण ग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
* मराठा आरक्षसाठी बलिदान देणार्या कार्यकर्त्यांना उदगीरमधे श्रद्धांजली
* पृथ्वी शॉला चेंडू झेलताना पायाला दुखापत, सामन्यातून बाहेर
* मराठा आरक्षण टिकवण्यासाठी वकिलांची फौज तयार
* स्वच्छ गंगा योजनेसाठी जर्मनी भारताला देणार सहा हजार कोटी
* आदिवासींच्या आरक्षणाला धक्का नाही, धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लवकरच मार्गी लावू- मुख्यमंत्री
* इम्रान खान यांनी पुन्हा ठेवला भारतापुढे मैत्रीचा प्रस्ताव
* नाहरकत प्रमाणपत्रासाठी साठ हजार रुपयांची लाच स्विकारताना औरादच्या ग्रामसेवक आणि उपसरपंचाला अटक
* इतर आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण, कायदेशीर अभ्यासानंतर आरक्षण दिल्याने टिकाऊ- मुख्यमंत्री
* मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मानले सर्वपक्षीयांचे आभार
* पोलिंसावरील हल्ल्यांमध्ये वाढ हा गृहखात्याचा पराभव, असेच चित्र राहिल्यास राज्याचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही- सामनाचा अग्रलेख
* राज्यात पोलीस सुरक्षित नसतील तर जनता सुरक्षित कशी राहील?
* मराठा आरक्षण एकमताने मंजूर झाल्याचा आनंद- आदित्य ठाकरे
* मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाल्यावर उद्धव ठाकरे भेटले आझाद मैदानावरील मराठा आंदोलकांना, आंदोलकांचं उपोषण मागे
* आरक्षणाच्या निर्णयात प्रत्येकाचा वाटा, कुणी एकानं त्याचं श्रेय घेणं चुकीचं, श्रेय घेण्याआधी आरक्षणाची अंमलबजावणी करा- अजित पवार
* मलाही जल्लोषाचा फेटा बांधता आला असता, पण आरक्षणासाठी जीवन संपवणाऱ्या ४० तरुणांचं बलिदान माझ्या डोळ्यांपुढं- अजित पवार
* अजितदादा आम्ही तुमच्याकडूनच राजकारण शिकलो, काहीही झालं तरी आरक्षण देणारच- चंद्रकांत पाटील
* नाराज होऊन निघून गेल्याचे वृत्त चुकीचे, नाराज नाही तर सदस्य नसल्यामुळे मराठा उपसमितीच्या बैठकीसाठी थांबले नाही- पंकजा मुंडे
* भिगवण आणि वडशिंगे दरम्यानच्या देखभाल दुरुस्तीसाठी पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ०३ डिसेंबर ते ०१ जानेवारी कालावधीसाठी रद्द
* कन्नड रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी बी. जयश्री यांना तन्वीर तर अतुल पेठे यांचा नाट्यधर्मी पुरस्कार- डॉ. लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानची घोषणा
* गुन्हेगाराला तडीपार करताना त्याची कारणे उपलब्ध करून देणे आवश्यक- नागपूर खंडपीठ
* विदर्भ पक्षीमित्र संमेलन १२ व १३ जानेवारी रोजी होणार चंद्रपुरात
* पंढरपूर येथे चंद्रभागा तीरावरील दत्त घाटावरच्या मंदिरात चांदीच्या मुखवट्यांची चोरी
* अहमदनगर येथील पु.ना. गाडगीळ ज्वेलर्समधून ०१ लाख २० हजारांचा ऐवज लुटला
* जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्यास ०७ वर्षांची सक्तमजुरी
* पानसरे हत्या प्रकरणातील अमोल काळेला १३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
* नीटचे फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना एक आठवड्याची मुदतवाढ देण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश
* महर्षि कर्वे यांच्या पुतळ्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
* तुकाराम मुंढे यांची बदली रद्द व्हावी म्हणून अंजली दमानिया दाखल करणार याचिका
* गोरेगाव येथील चित्रनगरीत चित्रपट 'झिरो'च्या सेटवर आग, शाहरुखान सुखरुप
* वाईतील सीरियल किलर डॉक्टरला हलविले येरवडा कारागृहात
* अयोध्या नको, कर्जमाफी हवी अशी घोषणाबाजी करीत देशभरातून हजारो शेतकरी दिल्लीत दाखल
* देशभरातील ०१ लाख शेतकऱ्यांचा आज मोर्चा धडकणार संसदेवर, दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केली चहापाण्याची सोय
* भारत, जपान आणि अमेरिका या तीन देशांच्या जी-२० शिखर परिषदेसाठी पंतप्रधान अर्जेटिनात दाखल
* प्रीपेड सेवा वापरणाऱ्या मोबाइल ग्राहकांकडे आवश्यक शिल्लक असेल तर सेवा बंद करता येणार नाही- दूरसंचार नियामक 'ट्राय'
* सोहराबुद्दीन चकमक खरी दाखवण्यासाठी दबाव आणला- राजस्थानचे पोलिस निरीक्षक अब्दुल रेहमान
* सीबीआय संचालकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे तसेच सीबीआयच्या सर्व प्रकरणांवर देखरेख करण्याचे अधिकार- केंद्र सरकारचा युक्तिवाद
* २०१८ हे सर्वात उष्ण वर्ष असल्याचा वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशनचा अहवाल
* मध्य प्रदेशात मतदानाच्या दिवशी जन्मलेल्या बाळाचं नाव ठेवलं 'मतदान'
* दुबईहून मुंबईला येण्यासाठी समुद्राच्या पाण्याखाली होणार रेल्वेचे जाळे
Comments