* मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज उत्तरभारतीयांच्या मंचावर
* माहिती देण्यास टाळाटाळ मुंबई विद्यापिठाला २५ हजारांचा दंड
* पाण्याअभावी औरंगपूरच्या शेतकर्याने जमीनदोस्त केली ४५० डाळिंबाची झाडे
* ड्रोन वापरावरील निर्बंध शिथील
* आरक्षणासाठी आत्महत्या करणार्याच्या कुटुंबातील एकाला मिळणार एसटीत नोकरी
* लातुरचे खा. सुनील गायकवाड यांना भारत गौरव पुरस्कार
* लातुरच्या थोरमोटे लॉन्सवर महसूल कर्मचारी संघटनेचे आज राज्यस्तरीय अधिवेशन
* लष्कराच्या एअर बलूनचं अमरावतीत इमर्जन्सी लॅंडींग, सर्व २० जवान सुखरुप
* शाळेच्या फीसाठी उदगिरात सात वर्षाच्या विद्यार्थ्यास डांबून ठेवले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
* कळंबमध्ये पाच लाखांच्या गुटख्याची होळी
* औरंगाबाद येथे आज विश्व हिंदू परिषदेतर्फे हुंकार सभा
* खाजगी उद्योगांनाही आरक्षण कायदा, उद्योगांना सवलती देताना, कराराचे नूतनीकरण करताना आरक्षण लागू करण्याची अट घालण्याची तरतूद
* आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला एसटीत नोकरी – दिवाकर रावते
* लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती झाली नाही तर ३० जानेवारी पासून राळेगणसिद्धीत पुन्हा आंदोलन- अण्णा हजारे
* वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पंढरपूरमध्ये कॉन्स्टेबल राहुल जगताप यांचा अत्महत्येचा प्रयत्न
* पानसरे हत्या प्रकरणी शार्पशूटर भरत कुरणेला सात दिवसांची पोलीस कोठडी
* फोरेन्सिक प्रयोगशाळेच्या रिक्त जागा भरण्यास केंद्राला सहकार्य न केल्याने महाराष्ट्रासह सात राज्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये दंड
* 'मुंबई २.० कॉन्क्लेव्ह'च्या निमित्ताने शाहरुखने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली
* तुम्ही कामावर प्रेम करू लागता तेव्हा साचेबद्ध जगणे आपोआपच बदलते, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत मला तोच अनुभव आला- शाहरुखखान
* मुख्यमंत्री पहाटे तीन वाजता मेसेज केला तरी उत्तर पाठवतात- शाहरुखने सांगितला अनुभव
* घटनातज्ञ सांगतात न्यायालयात आरक्षण टिकणार नाही, पण सरकारच्या दस्तावेजनुसार आरक्षण न्यायालयात टिकेल-सदाभाऊ खोत
* दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू
* पुण्यात साडी नेसत नाही म्हणून सासरी जाच, विवाहितेची कोर्टात धाव, काही कार्यक्रमांना साडी नेसण्याच्या मुद्द्यावर समुपदेशकाच्या मदतीने समझोता
* नगर जिल्ह्यात पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार, रुग्णालयात दाखल करण्याआधीच मुलीचा मृत्यू
* जेजे रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागात जानेवारी २०१७ ते ३१ जुलै २०१८ कालावधीतील ७०४ बालमृत्यू- माहिती अधिकारात मिळाली माहिती
* औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाचा परवाना झाला रद्द, महापालिका करणार अपिल
* कर्जबुडव्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठी भारताने जी-२० देशांच्या परिषदेत सादर केला नऊ कलमी कार्यक्रम
* माझी यापूर्वीच रावणाशी तुलना झाली, प्रतिकात्मक पुतळाही जाळला, भारतात परतलो तर माझा झुंडबळी होईल- नीरव मोदीचा दावा
* अमेरिकेने 'एच १ बी' व्हिसात केला बदल, कंपन्यांना अर्जांची करावी लागणार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी
* २०१४ पासून २० हजारांहून अधिक भारतीयांनी अमेरिकेत मागितला राजकीय आश्रय
* २०१६ मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा वापर पंतप्रधानांनी राजकीय लाभासाठी करून घेतला- राहुल गांधी
* सध्याचे सरकार तरुणांसाठी नव्या रोजगारसंधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले- राहुल गांधी
* मणिपूर भाजप सरकारवर टीका करणारा व्हिडिओ अपलोड केल्याप्रकरणी पत्रकार किशोरचंद वांगखेम यांना रासुकाखाली अटक
* दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरील रामफोसा प्रजासत्ताक दिनासाठी येणार भारतात
Comments