HOME   महत्वाच्या घडामोडी

मराठा आरक्षणाविरोधात याचिका, युपी बिहारच्या नेत्यांना महाराष्ट्रात बंदी, पवार राणेंच्या भेटीला, आणखी १४० पासपोर्ट कार्यालये, अमिताभ नागपुरात, चार दिवस बॅंका बंद......०३ डिसेंबर २०१८


मराठा आरक्षणाविरोधात याचिका, युपी बिहारच्या नेत्यांना महाराष्ट्रात बंदी, पवार राणेंच्या भेटीला, आणखी १४० पासपोर्ट कार्यालये, अमिताभ नागपुरात, चार दिवस बॅंका बंद......०३ डिसेंबर २०१८

* आजलातूर आणि संवाद वृत्तसेवेचा सहा डिसंएबर रोजी नववा वर्धापनदिन, पत्रकार भवनात सकाळी ११ वाजता कार्यक्रम, अवश्य यावे
* मराठा आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल
* नागपुरात धनगर समाजाने केली युतीच्या जाहिरनाम्याची होळी
* नारायण यांच्या भेटीसाठी शरद पवार कनकवलीत
* भंडार्‍यातील कोंढा गावात प्रेमी युगुलांची धिंड, युगुलातील महिला विवाहिता
* मुंबईतील डबेवाल्यांची सेवा उद्या बंद, सगळे जाणार पंढरपुरला
* उत्तरप्रदेश आणि बिहारमधील नेत्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी
* या नेत्यांनी आपापल्या राज्यात रोजगार निर्माण करावेत- राज ठाकरे
* ‘झुंड’ या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांचे नागपुरात आगमन
* ‘झुंड’ हा चित्रपट नागपुरच्याच एका कर्तबगार व्यक्तीवर आधारित, मुख्य भूमिका अमिताभ यांची
* उत्तर भारतीयांच्या नाकर्ते राज्यकर्त्यांमुळे प्रांतवाद, राज ठाकरे
* राज ठाकरे यांनी संपूर्ण भाषण केले हिंदीतून
* उत्तर भारतीयांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी आल्याचे सांगितले राज ठाकरेंनी
* राज्यातील थंडीचा पारा घसरला
* अभिनेत्री सोनाली बेंद्रे उपचार घेऊन भारतात परतली
* उत्तर प्रदेशात आणि बिहारमध्ये रोजगार उपलब्ध होत नाही म्हणूनच महाराष्ट्राकडे ओढा- राज ठाकरे
* दलीत आणि मुस्लीमांबाबत पोलिस अधिकारी भाग्यश्री नवटके यांचे वादग्रस्त विधान, तक्रार दाखल
* देशात आणखी १४० पासपोर्ट कार्यालये होणार, महाराष्ट्रात १६
* निळवंडे धरणासाठी साई संस्थान देणार पाचशे कोटी चार हप्त्यात
* पुलगाम शस्त्रसाठी स्फोट, कंत्राटदाराला अटक
* नाशिकातले दहावी नापास असणारे उद्योगपती प्यारे खान यांच्यावरील धडा पुस्तकात
* आयआयटी मुंबईच्या अनेक विद्यार्थ्यांना २५ लाखांपेक्षा मोठे पॅकेज
* त्रिपुरातून आलेल्या महिलेवर नागपुरात बलात्कार
* आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतीदिन
* अ‍ॅंबी व्हॅलीत सहारा तळ्याजवळ बिबट्याचा मृत्यू, त्याला मारल्याचा प्राणीजीव प्रेमींचा संशय
* विठ्ठलाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी नेसवले उबदार कपडे
* भाजपने गैरव्यवहार करणारे तीन मोदी दिले, कॉंग्रेसने देशाला वाचवणारे चार गांधी दिले- नवज्योत सिद्धू
* भाजपाची सत्ता आल्यास ओवेसींना निजामाप्रमाणे पळून जावे लागणार- योगीनाथ
* मराठा आरक्षण कायद्याविरोधात याचिका करण्याच्या तयारीत असलेले अॅड. गुणरतन सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांना धमक्यांचे फोन
* औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव तर अहमदनगरचे नाव अंबिकानगर करा- औरंगाबादच्या हुंकार सभेत मागणी
* रविवारी राज्यात घसरले तापमान, सर्वात कमी किमान तापमान होते औरंगाबादचे १०.८
* घरगुती गॅसचा ०५ किलो वजनाचा सिलिंडर होणार उपलब्ध, ओळखपत्र दाखवून मिळणार गॅस
* डिसेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात बँकांचे कामकाज चार दिवस बंद, बँक कर्मचारी संघटनेची २६ डिसेंबरला बंदची हाक
* एसटीची लाल रंगाची बसची बांधणी बंद, मेटल स्टील बॉडीच्या १२१ बस तयार
* उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनाची माहिती आरटीआय अंतर्गत देण्यास टाळाटाळ, मुंबई विद्यापीठाला २५ हजारचा दंड
* निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा ताण प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पडतो आहे- उद्धव ठाकरे
* शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विधानभवनाच्या परिसरात उभारा- भाजप सदस्य निलय नाईक यांची विधानपरिषदेत मागणी
* हिवाळी अधिवेशाच्या पार्श्वभूमीवर १० डिसेंबरला विरोधी पक्षांची संसदेत बैठक
* काँग्रेस पाकिटमार जमात- ओवेसी यांची काँग्रेसवर टीका
* पेपर फुटल्याने गुजरात पोलीस शिपाई भरती परीक्षा २०१८ स्थगित
* फरीदाबादमध्ये १३ वर्षांच्या मुलीला झोपेतून पळवून नेऊन बलात्कार, गुन्हा दाखल
* ०७ डिसेंबरला सजरा होतोय 'सशस्त्र सेना दिन', सेना दल फंडाला आर्थिक मदत करा- विरेंद्र सेहवागचं ट्वीटरवरुन आवाहन
* एव्हीएम, मतदार जनजागृती, मतदान प्रक्रियेवर भर देणार- सुनील अरोरा, अरोरांनी स्विकारली मुख्य निवडणूक आयुक्तपदाची सूत्र
* भारतीय रेल्वेची पहिली इंजिनविरहित ट्रेन धावली १८० किलोमीटर प्रति तासाहून अधिक वेगाने
* फ्रान्समध्ये इंधन दरवाढीवरून जनतेमध्ये भडका, २८८ आंदोलनकर्त्यांना अटक, १०० आंदोलक जखमी
* इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद यांचा अपमान केल्याप्रकरणी आसिया बीबीची पाक सर्वोच्च न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
* हिंसाचार करणाऱ्या आणि या निकालाचा जाहीर निषेध करणाऱ्या खादिम हुसैन रिझवींविरोधात दहशतवाद आणि देशद्रोहाचा गुन्हा


Comments

Top