* संवाद एसएमएस वृत्तसेवा आणि आजलातूरचा उद्या नववा वर्धापनदिन कार्यक्रम पत्रकार भवनात
* मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास कोर्टाचा तूर्तास नकार
* राजकारणात जिवंत राहण्यासाठी आमच्यावर काहीही आरोप करा- ओवेसींचे राज ठाकरे यांना सल्ला
* हनुमान जैन होते, जैन मुनींचा दावा
* दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आज पासून तीन दिवस १० अधिकाऱ्यांचे केंद्राचे पथक मराठवाडय़ाच्या दौऱ्यावर
* पथकाने केला जालना आणि औरंगाबाद जिल्ह्याची पाहणी
* बोंडअळी मदत निधीचा परतावा कापूस उत्पादन अधिक झाल्याने केंद्र शासनाने नाकारला, आर्थिक भार राज्य शासनावर
* कांदा विक्रीचे पैसे पंतप्रधान सहाय्यता निधीला देणार्या मनिऑर्डरची नरेंद्र मोदींनी घेतली दखल, मागवला नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल
* २४ डिसेंबरला शिवसेनेची पंढरपूरमध्ये जाहीर सभा, दुष्काळग्रस्तांना करणार मदत
* राज्य सरकारी नोकऱ्यांमधील ७२ हजार पदांसाठी होणार फेब्रुवारीत परीक्षा
* एक कुटुंब, एक कार्ड धर्तीवर एसटी महामंडळाचे येणार मार्च पासून स्मार्ट कार्ड, कार्डाला आधार क्रमांक नसणार
* एसटीच्या सवलत आणि प्रवासी स्मार्ट कार्डमध्ये तांत्रिक बदल करण्यात येत असल्याने ही योजना लांबणीवर पडली
* दक्षिण कर्नाटकात चक्राकार वारे, पुढील दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण, थंडी ओसरणार, तापमान वाढणार- हवामान विभाग
* आरक्षणाची घोषणा तरी संघर्ष अजून संपलेला नाही, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या- मराठा क्रांती मोर्चा
* प्रकाश आंबेडकर यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध न्यायालयातच सिद्ध होतील- सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे
* ओवेसींचे भाषण भाजपने लिहून दिलेले असते, हिंदू-मुस्लिम वातावरण दूषित करण्याचा त्यामागे उद्देश, दोघांच्यात नुरा कुस्ती- अबू आझमी
* हिंदू राष्ट्र उभारणीत आड येणाऱ्या हेमंत करकरेंची हत्या हिंदुत्ववाद्यांनी केली- माजी विशेष पोलीस महासंचालक एस. एम. मुश्रीफ
* मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्याची माहिती रॉ ला होती, 'रॉ'ने गुप्तचर विभागाला माहिती दिली पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले- मुश्रीफ
* नाशिकच्या महापालिका आयुक्तपदी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती
* सुप्रिया सुळे या उत्कृष्ट खासदार नाहीत, उत्तम सेल्फीपटू- विजय शिवतारे
* कमला मिल आग प्रकरणी युग तुलीला हंगामी जामीन
* सांगली आणि नंदुरबार या मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडे सक्षम उमेदवारांची वानवा, दोन्ही खासदारांची पुन्हा निवडणूक लढण्याची तयारी नाही
* ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर व्यवहारातील मध्यस्थ ख्रिस्तियन मायकल भारताच्या ताब्यात, कंपनीकडून २२५ कोटींची लाच स्वीकारल्याचा आरोप
* शबरीमला मंदिर परिसरातील जमावबंदी ०८ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत वाढवली
* प्रियांका चोप्रा-निक जोनसच्या रिसेप्शनला नरेंद्र मोदी यांची उपस्थिती
* २०१९ ची निवडणूक लढविणार नाही- उमा भारती
* संसद व राज्य विधानसभांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण द्या- ओदिशाचे मुख्यमंत्री
* काँग्रेसनं केलेल्या चुका निस्तरण्याचं काम माझ्या नशिबात - नरेंद्र मोदी
* टि्वटरवर सर्वाधिक लोकप्रिय १० व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी अव्वल स्थानावर त्या खालोखाल राहुल गांधी
* नाशिकच्या रमेश रासकरांनी अमेरिकेत बनविला अल्ट्रा फास्ट इमेजिंग कॅमेरा, बारीकसारीक गोष्टी दिसणार, पुस्तक न उघडताच येणार वाचता
* देशातील सर्वात अवजड उपग्रहाचे प्रक्षेपण, देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास होणार मदत
Comments