* पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आज लातूर दौर्यावर
* नळाला तोटी नसल्यास लातूर मनपा लावणार हजाराचा दंड
* खरोसा पाटीवर बसमध्ये सुट्य पैशांच्या वादातून महिला आवाहक आणि महिलेत हाणामारी गुन्हा दाखल
* लातूर लोकसभा मतदारसंघातील पराभवाचा बदला घेणार- पक्षनिरीक्षक जयप्रकाश छाजेड
* लातूर लोकसभा निवडणुकीसाठी कॉग्रेसकडे ५७ जणांने दिल्या मुलाखती, अहवाल जाणार प्रदेशकडे
* लातुरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी वाढीव मानधनासाठी केले आंदोलन
* गोव्यातील साहित्य संमेलनाचे प्रा. बडे करणार उदघाटन
* महाराष्ट्र क्रांती सेना ठाणे, पालघरसह अनेक ठिकाणच्या निवडणुका लढणार
* शाहीद कपूरला कर्करोग झाल्याची चर्चा, कुटुंबियांनी वृत्त फेटाळले
* बाटलीबंद दुधामुळे भाव वाढणार नाहीत- रामदास कदम
* शिक्षण सेवकांचा कालावधी पाच वर्षांऐवजी केला तीन वर्षांचा
* पालघर जिल्ह्याला भुकंपाचे धक्के
* येवला बाजारात भाव नसल्याने अनेक शेतकर्यांनी कांदा ओतला रस्त्यावर
* सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाला मिळणार वरिष्ठता दर्जा
* सातार्यातील ‘आय लव्ह पाचगणी’ महोत्सवाला सुरुवात
* इशा अंबानीच्या लग्नाआधी उदयपूर येथे पाच दिवस जेवणावळ, रोज तीन वेळा जेवण
* दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडे राज्याचा ०७ हजार ९६२ कोटींचा प्रस्ताव- चंद्रकांत पाटील
* मराठवाड्यातील ३३ लाख ७१ हजार हेक्टरवरील पिकांना दुष्काळामुळे झळ, ३६ लाख शेतकऱ्यांपैकी ३२ लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचा फटका
* दूध पिशवी प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सरकारने तातडीने बैठक बोलवावी- राज्य दूध उत्पादक कृती समिती
* प्लास्टिक पिशव्यांच्या तुटवड्याची दूध वितरकांची तक्रार खोटी- रामदास कदम
* पिशव्यांच्या तुटवड्याची सबब सांगून वितरकांनी दूधदरवाढीच्या धमक्या देऊ नयेत, आम्ही घाबरत नाही- रामदास कदम
* आपला खराखुरा बाप शेतकरी, तोच आपला खरा घटक, त्याच्याच मदतीने पुढे जाऊया- शरद पवार
* नाशिकमधील माजी मंत्री प्रशांत हिरेंसह हजारो समर्थकांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
* रोहित्र मिळत नसल्याने औंढा नागनाथ तालुक्यातील ०५ शेतकर्यांचा जिल्हाधिकार्यांच्या कक्षेत आत्मदहनाचा प्रयत्न
* देवेंद्र फडणवीस आणि तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर आत्महत्या करू- धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील
* धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली होती
* कार्यक्रमातील विशिष्ट कपड्यामुळे ऑक्सिजन कमी मिळाल्याने शारीरिक त्रास झाला- नितीन गडकरी
* जास्तीचे काम करता आहात, कष्ट कमी करा- शरद पवारांचा नितीन गडकरींना सल्ला, आरोग्य चांगले राहण्यासाठी दिल्या शुभेच्छा
* राज्यात पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचा- संजय राऊत
* नारायण राणे घेणार भाजप पासून फारकत, आगामी लोकसभा निवडणुकीत करणार राष्ट्रवादीशी हातमिळवणी, काँग्रेसचा विरोध
* सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यात काजूच्या बोंडांपासून इथेनॉल आणि सीएनजी उत्पादन प्रकल्प राबविण्याचा सरकारचा मानस
* सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा, कैद्यांना मोबाईल उपलब्ध करुन देणारे कळंबा कारागृहातील १४ कर्मचारी निलंबीत
* निर्मिती मूल्यांची प्रेरणा देणार्या राजांपैकी रावण एक, त्यामुळेच हजारो वर्षांपासून त्याचे दहन केले तरीही तो जिवंत- शरद तांदळे
* विकासाच्या नावाखाली भाजपने साई मंदिर तिजोरीतून ७०० कोटी पळविले, ती लूट - धनंजय मुंढे
* नगर महानगर पालिका निवडणूक- भाजप नगरसेवकांनी जनतेला उत्तरदायी राहावे, टक्केवारीची भाषा केली तर कारवाई - मुख्यमंत्री
* नगरमधील नेत्यांचे वेगळेच उद्योग असल्यामुळे येथे बाहेरचे उद्योग येत नाहीत- मुख्यमंत्री
* पानसरे हत्येतील संशयित वासुदेव सूर्यवंशी व भरत कुरणेच्या पोलीस कोठडीत ०८ दिवसांची वाढ
* बुलंदशहर हिंसाचारादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या ०५ जणांना अटक
* पाच राज्याच्या निवडणुकीचा निकाल ११ डिसेंबर रोजी
* तेलंगणात टीआरएसला ८५ जागा, काँग्रेसला २७ जागा, भाजपला ०२ तर अन्य पक्षाला ०५ जागा - अॅक्सिस माय इंडियाचा अंदाज
* मिझोराममध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत नाही- सी व्होटरचा अंदाज
* छत्तीसगडमध्ये काँग्रेसला १२५ जागा, भाजपला १०३ जागा मिळण्याची शक्यता- टूडेज चाणक्यचा अंदाज
* आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, पश्चिम बंगालमध्ये रथयात्रा काढणारच, ममता बॅनर्जी लोकशाहीची गळचेपी करत आहेत- अमित शहा
* वरिष्ठ अधिकाऱ्यांनी १४ डिसेंबरपर्यंत भाजपशी चर्चा करुन निर्णय घ्यावा- कोलकाता खंडपीठ
* दिल्लीत २२ डिसेंबरला जीएसटी परिषदेची बैठक
* शबरीमला प्रकरणाशी संबंधित २३ खटल्याच्या तातडीच्या सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार
* आणखी दहा वर्षे सूर्याच्या तापमानात फारसा फरक पडणार नसल्याचा भारतीय संशोधकांचा निष्कर्ष
* सोहराबुद्दीन कथित बनावट चकमकीचा निकाल २१ डिसेंबरला लागण्याची शक्यता
* विजय मल्ल्याविरोधातील विशेष न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीस स्थगिती नाही- सर्वोच्च न्यायालय
* जीएसटीत कपात होण्याची शक्यता असल्याने दुचाकीस्वारांना भरावा लागणार कमी विमा
* राष्ट्रीय पेन्शन योजनेत राज्य सरकारचे योगदान झाले १४ टक्के
* ब्राझीलमध्ये बँकेत दरोडा, गोळीबारात ०६ पोलिसांसह १२ जण ठार
Comments