* कोर्टाचा निर्णय होईपर्यंत मेगा भरती केली जाणार नाही, सरकारची न्यालयाला ग्वाही
* राहूल गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत, जानेवारीत मुंबईत महाआघाडीची पहिली सभा
* पाकिस्तानातून सुटलेला हमीद अन्सारी आणि त्याच्या आईने घेतली सुषमा स्वराज यांची भेट
* युतीबाबत अमित शाह आग्रह, मुख्यमंत्र्यांचं मत्र एकला चलो रे
* नाशिकच्या कांदे उत्पादकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट
* नाशिकचे आयुक्त असताना तुकराम मुंडे यांनी घेतलेले अनेक निर्णय मागे
* गिरणी कामगारांनी काढला मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा
* महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला जलनात सुरुवात
* आपत्ती व्यवस्थापनासाठी राज्य सरकारकडे निधीच नाही
* लातुरात थंडीचा पहिला बळी, मध्यवर्ती बस्थानकात सापडला पोतदार नामक व्य्क्तीचा मृतदेह
* मराठवाड्यात महिन्याभरात ११४ शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या, सर्वाधिक २६ आत्महत्या बीड जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात १३
* मराठा आरक्षणाबाबत २३ जानेवारीला सुनावणी
* राज्य सरकारला ११ जानेवारी पर्यंत तर याचिकादारांना १७ जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
* मराठा आरक्षण अहवाल सार्वजनिक केला तर सामाजिक स्तरावर अशांतता निर्माण होऊ शकते - राज्य सरकार
* मेगाभरती प्रक्रिया होईल पण २३ जानेवारीपर्यंत उमेदवारांना नेमणूक पत्र देता येणार नाही- राज्यसरकार
* राज्यात शिवसेनेला सोबत घ्यावे, शिवसेनेशी चर्चा करून युतीचा निर्णय घ्यावा- राज्यातील भाजप नेते
* विरोधकांची महाआघाडी हा मोठा भ्रम, सेनेने युतीचा निर्णय घेतला नसला तरी युती राहील- अमित शहा
* मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने फसवी घोषणा केल्याचे न्यायालयात उघड- धनंजय मुंडे
* मुलींनी स्वसंरक्षणार्थ प्रसंगी दुर्गावतार घेतला पाहिजे, कुटुंबानेही मुलींवर दोषारोप करण्यापेक्षा मुलींना आत्मनिर्भर बनण्यास पाठबळ द्यावे- आदित्य ठाकरे
* कोल्हापूर येथे आदित्य ठाकरे यांच्या शाळेतील कार्यक्रमात उडाला मंडप, कार्यकर्त्यांच्या प्रसंगावधानाने टळली मोठी दुर्घटना
* अण्णा हजारे यांचे लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीत आंदोलन
* प्रचाराच्या व्हिडिओ क्लीपमध्ये नरेंद्र मोदींच्या जुन्या भाषणांवर अण्णांची टीका
* काँग्रेस आणि राष्ट्रवादीत राज्यातील लोकसभेच्या ४० जागांवर एकमत, ०८ जागांचा तिढा कायम
* पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने लुटणाऱ्या दोघांना मुंबईत अटक
* मुंबईत भाजप युवा मोर्चाने टिळक भवनात राहुल गांधीच्या पोस्टर्सला फासलं काळं
* आयआयटी मुंबईच्या ०१ हजार २७० विद्यार्थ्यांना नोकरी
* मंत्री तुमचं ऐकत नसतील, तुमच्या मागण्या मान्य करत नसतील तर त्यांना कांदे फेकून मारा- राज ठाकरे
* मुंबईत ट्रायडंट हॉटेलच्या बेसमेंटमध्ये आग
* राफेल विमान खरेदी आशियातील सर्वांत मोठा घोटाळा, खोटी माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल करणारे 'मिस्टर गुमराह मोदी' - काँग्रेस
* शनिवारी होणाऱ्या जीएसटीच्या बैठकीनंतर एअर कंडिशनर, डिजिटल कॅमेरा, डिश वॉशर वस्तू स्वस्त होण्याची शक्यता
* फेसबुकने ग्राहकांची खाजगी माहिती दिली मायक्रोसॉफ्ट, खाजगी संदेश, मित्रांच्या संपर्काची माहितीही दिली
* पुढील ०३ दिवस पंजाब, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि विदर्भात थंडीची लाट
* राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचं ०२ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज गेहलोत सरकार करणार माफ, राज्याच्या तिजोरीवर पडणार १८ हजार कोटींचा बोजा
* लोकशाहीचे बलस्थान असलेल्या सर्वच सस्थांना काँग्रेसने वेळोवेळी अपमानित केले- नरेंद्र मोदी
* इस्रोचे जीएसएलव्ही-एफ ११/ जीसॅट -७ए दळणवळण उपग्रह झेपावले अवकाशात
* कमलनाथ यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारींबाबत केलेल्या विधानाविरुद्ध बिहारमध्ये कोर्टात तक्रार दाखल
* यूपी-बिहारमधून येणाऱ्या लोकांमुळे मध्य प्रदेशात स्थानिकांना नोकऱ्या मिळत नाहीत- कमलनाथ यांचे वक्तव्य
* सरोगसी विधेयक लोकसभेत मंजूर, राज्य सरोसगी मंडळाची होणार स्थापना, सरोगसी व्यापारावर बसणार प्रतिबंध
* मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा- उत्तर प्रदेशातील ८३ माजी अधिकाऱ्यांची मागणी
* इन्सपेक्टर सुबोध कुमार सिंहांसह दोन जणांच्या हत्येचा तपास चुकीच्या दिशेने- अधिकार्यांचा आरोप
* अनिल यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि मुकेश यांच्या जिओ इन्फोकॉममध्ये झालेल्या कराराला मंजुरी देण्यास दूरसंचार खात्याचा नकार
* दाऊद इब्राहिमचा भाचा सोहिल कासकरला सुपूर्द करण्याची भारत सरकारची अमेरिकेला मागणी
Comments