* कांदा निर्यातीला दुप्पट अनुदान, पाच टक्क्यांवरुन गेले दहा टक्क्यांवर
* ज्येष्ठ अभिनेते कादरखान यांची प्रकृती गंभीर, कॅनडातील रुग्णालयात उपचार, व्हेंटीलेटरवर
* खंडणी प्रकरणी पोलिसांनी केली लातूर कॉंग्रेसचे नगरसेवक सचिन मस्के या नगरसेवकाला अटक
* खाजगी शिकवणीचालकाचे खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण केल्याचा आरोप, आणखी सहाजण फरार
* फरारांमध्ये विनोद खटके यांचाही समावेश
* शिकवणीचालकाकडे केली होती २५ लाखांची मागणी, त्यापैकी सहा लाख मिळाले होते
* सचिन मस्केला ३१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी
* भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी विनाय दुधाळे या सेवकास अटक
* महाराजांच्या मृत्यूनंतर विनायक दुधाळे झला होता गायब
* दुष्काळी भागासाठी एसटीने काढल्या ४०४२ वाहक-चालकाच्या जागा
* औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे एस.टी महामंडळ कंत्राटीपद्धतीने भरणार
* ३३०७ एसटी चालकांना मिळाली हवी त्या ठिकाणी नियुक्ती
* राज ठाकरे यांनी काढले बाबा रामदेव यांच्यावर व्यंगचित्र, बाबांना नेत्रासन करण्याचा सल्ला
* लहान मुलांचे लैंगिक शोषण करणार्याला मृत्यूदंडाची शिक्षा
* इस्त्रोच्या दहा हजार कोटींच्या मिशन गगनयानला केंद्र सरकारचा हिरवा कंदिल, ०३ अंतराळवीर अवकाशात राहणार सात दिवस
* भीम आर्मीच्या १५ जणांना अटक
* भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर मुंबईच्या मनाली हॉटेलात नजरकैदेत
* मुंबईच्या किनारपट्टीचा विकास करुन पर्यटन वाढवणार
* नव्या वर्षात जिओचे गिफ्ट, ३९९ च्या रिचार्जवर संपूर्ण कॅशबॅंक
* इतर भागात गोठवणारा गारठा तर मुंबईत सुखद गारवा, औरंगाबादचा पारा ८.२ अंशांवर
* माझी मुलं इंग्रजी माध्यमात शिकली पण घरात मराठीपण जपले आहे, मराठी टिकली पाहिजे, मराठी माध्यमाच्या शाळा वाढल्या पाहिजेत- उद्धव ठाकरे
* जागावाटपाच्या चर्चेत स्वाभिमानाने जागा मिळाल्या तरच कॉंग्रेससोबत राहू, अन्यथा राजकारण काही आमचा धंदा नाही- राजू शेट्टी
* मुंबईच्या आकाशात तीन विमानांची टक्कर टळली, अॅटोमॅटीक वॉर्निंगमुळे धोका टळला
* शिवसेनेचे लोक कुठेही डोकं लावतात- भाजपचे रावसाहेब दानवे, सरकारने कर्जमाफीची फसवी घोषणा केली असे शिवसेनेने दिले निवेदन
* बहुजन समाजाची ताकद खूप मोठी, राज्याचा मुख्यमंत्री याच समाजाचा होईल- चंद्रशेखर आझाद
* नगरमध्ये महपौर निवडीच्या वेळी छिंदम यांना मारहाण, शिवसेनेच्या ०८ नगरसेवकांवर गुन्हा
* भिमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या जागी स्मारक उभारण्याचा प्राथमिक विकास आराखडा तयार
* ३३ कोटी देव असताना शबरीमलाचा आग्रह का?- आयआयटी विद्यार्थ्यांसमोर स्मृती इराणी
* तृतीयपंथीय सुद्धा बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकतात- दिल्ली उच्च न्यायालय
* केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात, 'डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर'चे तेलंगण मॉडेल लागू करण्याच्या विचारात
* शेतीची दुरवस्था, बेरोजगारी आणि राफेल मुद्दे ठरणार २०१९च्या लोकसभा निवडणुकीत कळीचे मुद्दे- योगेंद्र यादव
* तिरुपतीमध्ये खाजगी शाळेत गृहपाठ केला नाही म्हणून तिसरीतल्या तीन मुलांना दिली विवस्त्र करून उन्हात उभे राहण्याची शिक्षा
* जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी लोकसभेत ठराव, कृती घटनाबाह्य, विरोधी पक्षांची टीका
* 'राम देव नव्हते, सामान्य माणसांसारख्याच त्यांच्यात अनेक उणिवा होत्या- के. एस. भगवान यांचे विधान, त्यांच्याविरोधात बेंगळुरूमध्ये निदर्शने
* आपले पुस्तक वाल्मिकी रामायणावर आधारित असल्याचा भगवान यांचा दावा, भगवान यांना अटक करण्याची कर्नाटक भाजपची मागणी
* 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या सिनेमावर मध्यप्रदेश काँग्रेस सरकारची बंदी नाही
* इस्रोच्या अहमदाबाद केंद्राला आग, कोणतीही जीवितहानी नाही
* बलात्कार आणि हत्येप्रकरणी तामिळनाडुत डीएमकेचे माजी आमदार राजकुमार यांना १० वर्षांचा तुरुंगवास
* आम्ही काहीही करू शकतो असं सत्तेत असणाऱ्यांना वाटतंय, पण कर्नाटकातील नागरिक त्यांना नक्कीच धडा शिकवतील- नरेंद्र मोदी
* विनिता नंदा बलात्कार प्रकरण: आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर ३१ डिसेंबरला निर्णय
* काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा झाला केक कापून
Comments