* ३१ डिसेंबरला मुंबईत रात्रभर हॉटेल, पब चालू राहणार
* नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात तरुणांची गर्दी
* खा. राजू शेट्टी काढणार साखर आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा
* वाढत्या थंडीमुळे द्राक्षबागा संकटात, विपरीत परिणाम
* गोंदियात पेट्रोलच्या टाकीत रॉकेल टाकताना पंपचालकाला अटक
* वरळीतील आग विझवताना अग्नीशामक दलाचे १६ जवान जखमी
* डोंबिवलीत गुप्तांग कापलेल्या तरुणाचा मृत्यू, छेड काढल्यानं मुलीच्या नातलगांनी कापले होते गुप्तांग
* मनमोहनसिंगावरील चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
* कोरेगाव भीमा येथे ०५ हजार ग्रामीण पोलिस, राज्य राखीवच्या १२ तुकड्या, १२०० होमगार्ड आणि ०२ हजार स्वयंसेवक तैनात
* ११ ड्रोन कॅमेरे, शेकडो व्हिडीओ कॅमेरे ठेवणार भिमा कोरेगावच्या शौर्यदिनावर लक्ष
* शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १२११ समाजकंटक पोलिसांच्या ताब्यात
* भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी पोलिसांनी हॉटेलबाहेर पडूच दिले नाही
* कॉंग्रेसकडून तिकीट मिळो अथवा ना मिळो सुजय विखे पाटील अहमदनगरमधून निवडणूक लढवणारच
* तिहेरी तलाक विधेयक उद्या राज्यसभेत सादर करणार
* राज्यातील चार मेडिकल कॉलेजांमधील निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन ०२ महिन्यांपासून रखडले, ठोस निर्णयाशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार
* सौरउर्जेवर चालणारी एसी लोकल जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईत होणार दाखल
* नवीन वर्षात २१ सार्वजनिक सुट्ट्या, ०३ सुट्ट्या येणार रविवारी
* नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत अवघे पोलिस दल ड्युटीवर, ४० हजार पोलिसांसह फोर्स वन, एसआरपीएफ, क्यूआरटीच्या पथक तैनात
* कोरेगाव भीमा येथे कडक सुरक्षाव्यवस्था, रस्त्या ते आकाश पोलिसांची करडी नजर
* पुण्यात शनिवारी सकाळी गेल्या दहा वर्षांतील सर्वांत कमी सेल्सिअस तापमानाची नोंद
* महाबळेश्वरपेक्षा कमी तापमान नोंदविले पुण्यात, पारा गेला ५.९ अंशावर, नागपुरात राज्यातील निचांकी ३.२ अंश तापमान
* कोकणात पाणी वाचविण्याची चळवळ उभारल्यास ‘नाम’ची मदत- नाना पाटेकर
* नदी-नाले, धरणातील गाळ काढून गाव समृद्ध करण्यासाठी गावानेच पुढाकार घ्यावा- नाना पाटेकर
* देशाच्या सर्वागीण विकासासाठी उत्पादनावर भर द्या, नवीन पिढीत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करा- शरद पवार
* आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणून संशोधन वृत्तीला चालना दिली तर ते यशस्वी वाटचाल करतील- शरद पवार
* औरंगाबादमध्ये इंग्रजी माध्यमात आठवीत शिकणार्या मुलाने मोबाइल चार्जरच्या सहाय्याने केली गळफास घेऊन आत्महत्या
* जेजे रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांच्या निःशुल्क चाचण्यांसाठी पॅथालॉजी दलालांचे बस्तान, शंभरपासून साडेतीन हजारापर्यंत दर
* धर्म ही आपली वैयक्तिक बाब, त्याचे राजकारण करणे चुकीचे- शरद पवार
* मुंबई बुलेट ट्रेन संदर्भात चुकीची माहिती दिल्या प्रकरणी माहिती अधिकारी निलंबित
* कोल्हापुरात २३ डिसेंबर रोजी ख्रिश्चन धर्मियांवर बिअरच्या बाटल्या आणि लोखंडी रॉडनं हल्ला, ०४ गंभीर तर ०५ जणांना अटक
* पुण्यात तहसीलदार सचिन डोंगरे यांना ०१ कोटीची लाच घेताना अटक, सातबारा उताऱ्यात फेरफार करण्यासाठी मागितली लाच
* 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटाचा काँग्रेससाठी कुठलाही स्पेशल शो नाही- अनुपम खेर
* उत्तर प्रदेशात दोन तरुणींनी बांधली लग्नगाठ मात्र समलैंगिक विवाह असल्याने उपनिबंधकांने नोंदणी करण्यास दिला नकार
* ऑगस्टा वेस्टलँड व्यवहार प्रकरणी मिशेलने सोनिया गांधी यांचे नाव घेतल्याची ईडीची माहिती
* कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी अॅक्सिडेंटल सीएम- भाजप
* राज्यात बहुतांश भागात दुष्काळ असताना कुमारस्वामी नववर्षाच्या स्वागतासाठी सिंगापूरला
* उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींच्या सभेनंतर झालेल्या दगडफेकीत पोलिसाचा मृत्यू, दोन नागरिक जखमी
* ३१ डिसेंबरला तिहेरी तलाक विधेयक मांडले जाणार राज्यसभेत
* पाटण्यात भाजप नेता सूरज नंदन कुशवाह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
* कर्तारपूर कॉरिडॉरमधील भारतीय शीख भाविकांना व्हिसाविना प्रवास करण्याची पाकिस्तानची शिफारस
Comments