* चंद्रशेखर आझाद यांच्या लातुरच्या सभेला पोलिसांनी नाकारली परवानगी
* काहीही झाले तरी सभा घेणारच लातुरच्या युवा भीम सेनेचा निर्धार
* ऑगस्टा प्रकरणी सोनियांचं नाव आल्यानं राफेल घोटाळा विसरणार नाही- शिवसेना
* घटनात्मक पद्धतीनेच राम मंदिराचा निर्णय होईल- पंतप्रधान
* हिंमत असेल तर शरद पवार आणि स्वतंत्र लढून दाखवावए- चंद्रकांत पाटील
* ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबई पोलिसांनी केली १० हजार जणांची तपासणी, ४५० जणांवर कारवाई
* इतरांना भाजप-सेनेशी एकतर येऊन लढावं लागतं, यातच आमचे यश- चंद्रकांत पाटील
* विमान इंधना १४.७ रुपयांनी कपात
* विदेशी दारुच्या किमतीत वाढ
* बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार मश्रफे शेख हसिना यांच्या पक्षातून झाला विजयी
* लघु आणि मध्यम उद्योगांना रिझर्व बॅंकेकडून सवलती
* भैय्युजी महाराज यांना फोनवरुन त्रास देणार्या तरुणीची चौकशी, रहस्य उलगडणार
* कर्ज बुडवून पळून जाणार्यांना भारताता परत आणणारच- पंतप्रधान मोदी
* अहमदनगरच्या लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेसचा दावा, युती न झाल्यास शिवसेनाही स्वतंत्रपणे लढणार
* महाराष्ट्रातील भाजपा खासदारांची आज अमित शाह यांनी बोलावली बैठक
* एफआरपी न देणारे कारखाने जप्त करावेत- खा. राजू शेट्टी
* मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी कळंबोली आणि कामोठ्यातील मराठा समाजातील नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या- शरद पवार
* नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी
* सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना २०१९ आधी घेरण्याचा हा प्रकार- शिवसेना
* सत्ता सोडल्यास राष्ट्रवादी जागा घेईल म्हणून शिवसेना सत्तेतून बाहेर पडत नाही, नगरमधील महापौर निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब - रामदास कदम
* राम मंदिरासाठी कायदा करावा- संघाची ठाम भूमिका
* शबरीमलात महिला प्रवेश समर्थनार्थ मुंबईत महिलांचे मानवी साखळी आंदोलन
* मोबाईलवर चॅट करते म्हणून मुंबईत विरारमध्ये पित्याने जाळले १६ वर्षांच्या मुलीला
* राम मंदिर आश्वासनामुळेच सत्तेवर आलात, जाहीरनाम्यात होते मंदिरासाठी संविधानाच्या चौकटीत राहून प्रयत्न करु - संघाने दिली मोदींना आठवण
* कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर अलाहाबादचं नामांतर प्रयागराज करण्यावर केंद्राचे शिक्कामोर्तब
* फोडाफोडीचे राजकारण करणे बुद्धीला पटणारे नसल्यामुळे आम्ही विरोधात बसणे पसंत केले- मध्यप्रदेशचे शिवराजसिंह चौहान
* पाच राज्यातील अपयशावर आमचे चिंतन सुरु, भाजप लोकशाही मानणारा पक्ष - पंतप्रधान
* नोटाबंदी जनतेसाठी 'झटका' नव्हता, आम्ही लोकांना आधीच सावध केले होते- पंतप्रधान
* उर्जित पटेल यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला, त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव नव्हता- पंतप्रधान
* ०३ जानेवारीला पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ०२ सभा
* सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शाह यांना अडकवण्यात काँग्रेसचा हात- स्मृती इराणी
* झारखंडमध्ये नरेंद्र मोदी यांची शनिवारी जाहीर सभा, सभेत काळे कपडे आणि काळ्या वस्तुला बंदी
* मध्य प्रदेशमध्ये ‘वंदे मातरम’ काँग्रेसने केले बंद, भाजपच्या काळात दर महिन्याला पहिल्या दिवशी सरकारी कार्यालयांत वंदे मातरम म्हणणे होते बंधकारक
* जीएसटीच्या महसुलात डिसेंबरमध्ये घट, मिळाले ९४ हजार ७२६ कोटी, नोव्हेंबरच्या तुलनेत ०३ हजार कोटीची * घट
* 'नासा'च्या 'न्यू होरायझन' यानाची सूर्यमालेला गवसणी
Comments