HOME   महत्वाच्या घडामोडी

सावरकर, वाजपेयी आणि माफी? साहित्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप नको, उद्योगात ८० टक्के नोकर्‍या भूमीपुत्रांना, सीबीएसईत मराठी, शिक्षण अन शहाणपणाचा संबंध नाही......१४ जानेवारी २०१९


सावरकर, वाजपेयी आणि माफी? साहित्यात राजकारण्यांचा हस्तक्षेप नको, उद्योगात ८० टक्के नोकर्‍या भूमीपुत्रांना, सीबीएसईत मराठी, शिक्षण अन शहाणपणाचा संबंध नाही......१४ जानेवारी २०१९

* दहा टक्के आरक्षण कुणासाठी? ते टिकणार नाही- शरद पवार
* अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम थांबवावे- सर्वोच्च न्यायालय
* शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला यायचाय- उद्धव ठाकरे
* राम मंदीर कोर्टाचा विषय होता तर मग मंदिरासाच्या नावावर मते का मागितली?, उद्धव ठाकरे यांचा सवाल
* पाचवी आणि आठवीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांची पुन्हा घेणार परिक्षा
* बेस्ट नुकसानीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न, खाजगीकरण अखेरचा पर्याय नाही- उद्धव ठाकरे
* बेस्ट प्रकरणी राज्य सरकार आज कोर्टात भूमिका मांडणार
* मराठा आरक्षणावर आज हायकोर्टात सुनावणी
* सवर्ण आरक्षण तातडीनं महाराष्ट्रात लागू करण्याचे प्रयत्न
* १० टक्के आरक्षण लागू करण्यात गुजरात सर्वात पुढे
* बेस्टच्या एकाही कर्मचार्‍याची नोकरी जाणार नाही- उद्धव ठाकरे
* आठवडाभरात आघाडीच्या आठ जागांचा तिढा सुटेल- शरद पवार
* उद्योगात ८० टक्के नोकर्‍या भूमीपुत्रांना द्याव्यात अन्यथा, टॅक्सचा परतावा मिळणार नाही- उद्योगमंत्री
* सावरकर आणि वाजपेयी माफी तुरुंगातून बाहेर आले- उल्हास पवार
* पश्चिम महाराष्ट्रातल्या सहा साखर कारखान्यांच्या नोंदणी कार्यालयांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठोकले टाळे
* समाजाला दिशा दाखवण्यासाठी साहित्यिक, कलावंत, राजकारणी अशा सर्वच घटकांची गरज, प्रत्येकाला स्वायत्तता मिळायला हवी- नितीन गडकरी
* विषय साहित्याचा असेल तर राजकारण्यांनी त्यात हस्तक्षेप करू नये- नितीन गडकरी
* देशात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही मोठी समस्या, मीच शहाणा आहे अशी भावना समाजाचे नुकसान करू शकते- नितीन गडकरी
* यवतमाळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी शेतीपूरक पर्यायी उद्योग शोधले पाहिजेत- नितीन गडकरी
* मराठी साहित्य संमेलन ठराव:
* झुंडशाहीने अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा, उपद्रवी प्रवृत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा
* मराठीची गळचेपी थांबवण्यासाठी सीबीएसईसारख्या शाळांमधून बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा
* राज्यातील एकल महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र धोरण आखावे
* शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काडीमात्र संबंध नाही, आधुनिकता विचारांमधील आधुनिकीकरणातूनच मिळू शकते- डॉ. राणी बंग
* आमदार हसन मुश्रीफ यांचा लोकसभा उमेदवारीसाठी दावा, त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल- शरद पवार
* एफआरपीची सर्व रक्कम एकावेळी देता येते असे खासदार राजू शेट्टी म्हणतात, कशी देता येते हे त्यांच्याकडून समजून घेणार- शरद पवार
* गरीब सवर्णांना दिलेल्या १०% आरक्षणाचा लाभ ०८ लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्यांना होणार, त्यांना आयकर माफ करा- उद्धव ठाकरे
* काँग्रेस सत्तेत असताना शरद पवारांचा पंतप्रधानपदी नंबर लागला असता, पण आता यापुढे कधी नंबर लागेल असं वाटत नाही- रामदास आठवले
* शिवसेना-भाजप एकत्र आले नाहीत तरी आम्ही भाजपबरोबरच, जागा वाढतील- रामदास आठवले
* उदयनराजे भोसलेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही, तर त्यांना आरपीआयमध्ये तिकीट देऊ- रामदास आठवले
* विकासाचा मुद्दा बाजुला ठेवून भाजपा सरकार मंदिर- मशिद मुद्दा घेवून धनाचा धंदा करत आहेत- छगन भुजबळ
* भाजपाला मंदिर नाही बनवायचे तर सरकार बनवायचे आहे, मंदिर मुद्दा घेवून दंगा घडवायचा आहे- छगन भुजबळ
* तुळजाभवानी मंदिर समितीच्या संकेतस्थळावर नवरात्र उत्सवात नाटक, संगीत जलसांचे आयोजन केले जात असल्याची खोटी माहिती असल्याची तक्रार
* संकेतस्थळावरील चुकीची माहिती तत्काळ दुरूस्त केली जाईल- मंदीर विश्वस्त, चेतन गिरासे
* आमचे सरकार आल्यानंतर दोन लोक बेरोजगार होणार, त्यांना काम देण्यास प्रकाश आंबडेकरांना सांगणार- एमआयएम'चे इम्तियाज जलिल
* नाशिकच्या स्टेशनवर मोदी ... मित्रो चहा.. चहा करतांना आणि अमित शहा वडा विकतांना दिसतील- इम्तियाज जलिल
* ६६ शहरे आणि गावांतील नाले गंगेतच सोडले जात असल्याचे उघड
* इंजिनीअरिंग किंवा मेडिकल प्रवेश होणार ऑनलाइन, कागदपत्र छाननीपासून शुल्क भरण्यापर्यंत होणार सुलभ
* ब्रिटिश अभ्यासकांनी नामकरण केलेल्या राज्यातील फुलपाखरांना मिळणार मराठमोळी नावे
* 'पंतप्रधान मुद्रा योजने'तील थकीत कर्जांची रक्कम पोहोचली ११ हजार कोटीवर
* रामविलास पासवान यांच्याविरोधातच मुलीचे ठिय्या आंदोलन


Comments

Top