HOME   महत्वाच्या घडामोडी

बाळासाहेब ठाकरे दिघेंच्या मृत्यूला जबाबदार, सोनू निगमलाही मारायचे होते- निलेश राणे, मराठा आरक्षणावर २३ रोजी सुनावणी......१५ जानेवारी २०१९


बाळासाहेब ठाकरे दिघेंच्या मृत्यूला जबाबदार, सोनू निगमलाही मारायचे होते- निलेश राणे, मराठा आरक्षणावर २३ रोजी सुनावणी......१५ जानेवारी २०१९

* कर्नाटकातलं कॉंग्रेस सरकार अडचणीत, भाजपाकडून घोडेबाजार, सत्तापलटाची शक्यता
* बेस्ट संपप्रकरणी आज पुन्हा हायकोर्टात सुनावणी
* नामविस्तार दिनानिमित्त औरंगाबादेत आयोजित रामदास आठवलेंच्या सभेत गोंधळ
* मराठा आरक्षण याचिकेवर सुनावणी २३ जानेवारी रोजी, याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारला १८ जानेवारीपर्यंत मुदतवाढ
* नागपुरात माजी पोलिस महासंचालक प्रबीरकुमार यांच्या घरी चोरी
* विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
* कुंभमेळ्याचं पहिलं शाही स्नान आज
* आनंद दिघेंच्या मृत्यूला बाळासाहेब ठाकरे जबाबदार- निलेश राणे
* सोनू निगमच्याही हत्येचा कट बाळासाहेबांनी रचला होता- निलेश राणे
* जेएनयू प्रकरणी कन्हैय्याकुमार याच्यासह १० जणांविरुद्ध १००० पानी आरोपपत्र दाखल
* अमित शहांचा कोल्हापूर दौरा रोखणार, दौऱ्यात शहांची करंगळी धरून या, म्हणजे ब्रेकिंग न्यूज काय असते ते दाखवतो- राजू शेट्टी
* शेतकऱ्यांना 'एफआरपी' मिळाला नाही, तर सरकारी पैसे देईल असे अमित शहांचे आश्वासन होते- राजू शेट्टी
* दुष्काळ निवारणासंदर्भात आज मंत्रिमंडळ उपमितीची बैठक
* केंद्राच्या निधीची वाट न पाहता राज्याच्या तिजोरीतून दुष्काळग्रस्तांना मदत देण्याची राज्य सरकारची तयारी सुरू
* महात्मा फुले जनआरोग्य योजनेत डॉक्टरांकडून जास्तीत जास्त शस्त्रक्रिया व उपचार व्हावे यासाठी डॉक्टरांना मिळणार ३० टक्के प्रोत्साहन भत्ता
* पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी नसून, फक्त धनदांडग्यांसाठी- पी. साईनाथ
* सुशिक्षित बेरोजगारी हाच आगामी निवडणुकांमधील मुद्दा- खासदार सुप्रिया सुळे
* तीर्थक्षेत्रांच्या सहली, होम मिनिस्टर पाठोपाठ मतदारराजाला खूश करण्यासाठी पुण्यात इच्छूक उमेदवारांची सिनेमा दाखविण्याची मोहीम
* पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणारा भोंदूबाबा निफ़ाडमध्ये गजाआड
* राज्यात २०१८ च्या पावसाळ्यात लागली ०२ हजार १७७ मुलींच्या जन्मानंतर २१ हजार ७७० झाडे
* शेतकरी कुटुंबात मुलगी जन्माला आली तर तिच्या नावाने अंगणात १० वृक्षांची लागवड अशी वन विभागाची 'कन्या वन समृद्धी योजना’
* मुंबई २६/११ हल्ल्याचा कट रचणारा तहव्वूर हुसेन राणा भारताच्या ताब्यात येण्याची शक्यता ,सध्या तो अमेरिकेच्या तुरुंगात
* आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ
* मोदी सरकारच्या पावणेपाच वर्षांच्या कार्यकाळात तीन स्पेक्ट्रम वाटपातून ६९ हजार ३८१ कोटींचा घोटाळा- काँग्रेसचा आरोप


Comments

Top