HOME   महत्वाच्या घडामोडी

करिनाला द्या लोकसभेची उमेदवारी, आप-भाजपने केला एव्हीएमचा गैरवापर, १८ हजार शिक्षकांची भरती, मुंडेंचा घात? राहूल गांधी नांदेडमधून?.......२२ जानेवारी २०१९


करिनाला द्या लोकसभेची उमेदवारी, आप-भाजपने केला एव्हीएमचा गैरवापर, १८ हजार शिक्षकांची भरती, मुंडेंचा घात? राहूल गांधी नांदेडमधून?.......२२ जानेवारी २०१९

* करिना कपूरला भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची कॉंग्रेसकडे मागणी
* आप आणि भाजपने एव्हीएम मशीनचा गैरवापर केला, हॅकर सय्यद शुजाचा दावा
* केंद्राचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला
* मृत पोलिस अधिकारी अश्विनी बिंद्रेची बदली!
* गोपीनाथ मुंडे यांनी अपल्याशी संपर्क साधला, त्यांचा घात झाला- सायबर तज्ञ हॅकर सय्यद शुजा
* महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीतही ईव्हीएममध्ये फेरफार केले गेले- सय्यद शुजा
* नारायण राणे यांना कॉंग्रेसमध्ये आणण्याच्या हालचाली सुरु
* अमित शाह यांचा आज पश्चिम बंगालचा दौरा
* राहूल गांधी नांदेडची लोकसभा लढण्याची शक्यता
* गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची रॉ मार्फत चौकशी करा- धनंजय मुंडे
* लोकसभा निवडणुकीपूर्वी १८ हजार शिक्षकांची भरती होणार
* डीएसके प्रकरणातून महाराष्ट्र बँकेचे रवींद्र मराठेंसह तीन अधिकार्‍यांना वगळले
* लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता
* नारायण राणेंना पक्षात घेण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही, बाळासाहेब थोरातांनी असे काही सूचित केले नाही- अशोक चव्हाण
* सावंतवाडीत काँग्रेस संघर्षयात्रेचा प्रारंभ
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पाकिस्तान पुरवतो पैसा – बीजी कोळसे पाटील
* बहुतेक न्यायमूर्ती घरात गोळवलकरांचा फोटो लावून न्यायमूर्ती होतात, तर आयबीचा अधिकारी संघ प्रमुखाचा भाऊ असतो- कोळसे पाटील
* दिल्लीत अभाविपने दिल्या कोळसे-पाटील मुर्दाबादच्या घोषणा
* लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचा ठराव राष्ट्रीय कार्यकारणीत झाला- सेना राज्यमंत्री अर्जुन खोतकर
* विरोध डान्सला नाही तर त्याआडून होणाऱ्या अश्लीलतेला आणि मद्यसेवनाला- डान्स बार विरोधी मंच
* राज्यातील सर्व नागरी सहकारी बँकांमध्ये नोकरभरती प्रक्रिया होणार ऑनलाइन
* मुंबईतील मानखुर्द परिसरात हार-फुलांची विक्री करणाऱ्या विधवेवर सामूहिक बलात्कार, ०५ जणांना अटक
* कार मेकॅनिकला धमकावल्याने अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात तक्रार दाखल
* नऊ दिवस चाललेल्या संपामुळं बेस्टचे १९ कोटींचे नुकसान
* भाजपा, काँग्रेससह १२ पक्षांना इव्हीएम घोळ ठाऊक- लंडनच्या सायबर एक्स्पर्टचा दावा
* डझनभर पक्षांना इव्हीएममध्ये घोळ कसा करायचा हे माहीत होतं- सायबर एक्स्पर्ट सय्यद शुजा
* २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांचे निकाल नियोजित होते याची कल्पना गोपीनाथ मुंडे यांना होती- सय्यद शुजा
* हॅकिंगबाबत माहीत असल्यानेच बभ्रा होऊ नये म्हणून गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली- सय्यद शुजा सायबर एक्स्पर्ट
* २०१८ मधील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवेळी आमचे पथक भारतात होते- लंडनमधील हॅकर्सचा दावा
* नरेंद्र मोदी जाहीर सभेत चरितार्थासाठी चहा विकल्याचे सांगतात पण त्यांनी कधी चहा विकलाच नाही, मोदींबरोबर ४३ वर्ष मैत्री होती - प्रवीण तोगडिया
* काँग्रेसमध्ये तर नव्हतीच पण मोदींच्या राज्यातही नोकऱ्या निर्मितीची परिस्थिती खूपच वाईट – अमर्त्य सेन
* भाजपचे वर्चस्व ममता बॅनर्जींना बघवत नसल्यामुळे रॅली आणि विकासकामांमध्ये अडचणी- भाजपची टीका
* मायावतींबद्दल अपमानास्पद टिका, भाजप आमदार साधना सिंह यांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस
* साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५० लाखांचं बक्षीस- बसप नेत्याची घोषणा
* मायावती भाजप पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाल्या, दलितांच्या विकासासाठी मोदींना साथ द्यावी, त्यांच्या आघाडीला मतदार नाकारणार- रामदास आठवले
* पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीने सोडले भारतीय नागरिकत्व
* सवर्ण आरक्षण निर्णयाला आव्हान देणारी द्रमुकची याचिका मद्रास हायकोर्टात दाखल, केंद्राला नोटीस, उत्तरासाठी १८ फेब्रुवारीपर्यंत मुदत
* नरेंद्र मोदी ०३ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील सांबा दौऱ्यावर
* राहुल गांधी २३ आणि २४ रोजी अमेठी दौऱ्यावर, राहुल गांधी दोन जागांवर लढवणार निवडणूक
* कर्नाटकमध्ये काळी नदीत बोट बुडून ०८ जणांना जलसमाधी, १७ जण सुखरुप, ०१ बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू
* झांशीची राणी २३ व्या वर्षी धारातिर्थी पडल्या मणिकर्णिकात ३० वय दाखविले, तपशील चुकीचे दाखवणार म्हणून चित्रपट विरोधात याचिका
* उत्तर प्रदेशात निराधार व्यक्तींच्या ५०० रुपये पेन्शनचा जास्तीत जास्त लाभ साधू-संतांना मिळायला हवा- योगी सरकारचे निर्देश
* भारतीय खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबतचा 'द्वेषपूर्ण आणि बोगस' मजकूर आणि व्हिडिओ हटवा- केंद्राची फेसबुक आणि गुगलला नोटीस


Comments

Top