HOME   महत्वाच्या घडामोडी

ठाकरेपुत्राचं लग्न, आता अक्षयचा केसरी, अर्धे कुष्ठरोगी भारतात, मल्ल्याचं स्वीस खातं तपासणार, मोदींच्या भेटवस्तुंचा लिलाव, ठाकरेची पायरसी........२७ जानेवारी २०१९


ठाकरेपुत्राचं लग्न, आता अक्षयचा केसरी, अर्धे कुष्ठरोगी भारतात, मल्ल्याचं स्वीस खातं तपासणार, मोदींच्या भेटवस्तुंचा लिलाव, ठाकरेची पायरसी........२७ जानेवारी २०१९

* उद्धव ठाकरे उद्या घेणार खासदारांची बैठक, युतीबाबत घेणार विचार
* रिलीज होताच दुसर्‍या दिवशी बाजारात आली ‘ठाकरे’ चित्रपटाची ‘पायरेटेड’ प्रत
* भारताचा न्यूझिलंडवर ९० धावांनी विजय
* २९ जानेवारीला राम मंदिर प्रकरणावर सुनावणी
* राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्ट निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर हे प्रकरण आमच्याकडे सोपवा, २४ तासांत प्रश्न सोडवू- योगी आदित्यनाथ
* राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा मिताली बोरुडे यांच्याशी आज विवाह, राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर निमंत्रित
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना दिले भोजनाचे निमंत्रण
* लडाख येथे १८ हजार फुटांवर तिरंगा फडकला
* अक्षयकुमारच्या ‘केसरी’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित
* ‘डोके शांत ठेवा’ उदयनराजेंना शरद पवारांचा सल्ला
* बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करून सरकारने शिवप्रेमींच्या भळभळत्या जखमेंवर मीठ चोळले- जितेंद्र आव्हाड
* जिजाऊ, छत्रपतींची बदनामी केली त्यांना का मोठं करताय? का पोसताय? जेम्स लेनला बाबासाहेब पुरंदरेंनीच माहिती पुरवली- आव्हाड
* महाराष्ट्र पेटवणार, परत एकदा घेणार शिवसन्मान- जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट
* बीफची वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनाची तक्रार करूनही पोलीसांनी दुर्लक्ष केल्याने रत्नागिरीत नागरिक उतरले रस्त्यावर
* ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची बहीण आणि प्रसिद्ध लेखिका गीता मेहता यांचा पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यास नकार
* आगामी निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठी हा पुरस्कार दिला जात असल्याचा मेहतांचा दावा
* प्रियांका गांधी यांचं सक्रीय राजकारणात स्वागत- अखिलेश यादव
* काँग्रेसकडे चेहराच नसल्यामुळे आता चॉकलेट चेहरे समोर आणले जात आहेत- भाजपा नेते कैलास विजयवर्गीय
* कधी सलमान, कधी करीना कपूरची चर्चा होते तर कधी प्रियंका गांधीना राजकारणात आणले जाते- विजयवर्गीय
* परदेशात पळून गेलेल्या आरोपींना पकडून आणण्यासाठी एअर इंडियाची नॉन स्टॉप फ्लाईट
* लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराज मतदारांचे मन वळवण्यासाठी फेब्रुवारीत लेखानुदानाऐवजी पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता
* जगभरातील अर्धे कुष्ठरोगी भारतात- जागतिक आरोग्य संघटना
* विजय मल्ल्याचे स्विस खाते सीबीआय तपासणार
* प्रणव मुखर्जी यांच्याआधी कांशीराम आणि बीजू पटनायक यांना भारतरत्न द्यायला पाहिजे होते- जेडीएस
* नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या ०१ हजार ९०० भेटवस्तुंचा आज आणि उद्या लिलाव
* भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आल्याबद्दल प्रणव मुखर्जी यांनी मानले देशवासीयांचे आभार
* लडाखच्या सीमेवर १८ हजार फुट उंचीवर उणे तीस तापमानात इंडो-तिबेटीयन बॉर्डर फोर्सच्या जवानांनी फ़डकवला तिरंगा
* चीनला रोखण्यासाठी अंदमान-निकोबार द्वीपसमुहांवर ०५ हजार ६५० कोटीच्या लष्करी पायाभूत विकास योजनेला मंजुरी
* मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम सेवा एकत्रित करण्याचा फेसबुकचा निर्णय, व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह


Comments

Top