* राष्ट्रवादी मनसेला लोकसभेच्या दोन जागा देण्याची शक्यता
* कॉंग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची नावे आज निश्चित होणार, आज पुन्हा बैठक ठरलेली नवे श्रेष्ठींकडे पाठवणार
* मराठा म्हणजे कुणबी, हा समाज आरक्षणाला पात्र- राज्य मागासवर्ग आयोग
* राम मंदिराच्या उभारणीत कॉंग्रेसकडूनच अडथळे- प्रकाश जावडेकर
* सत्तेत आल्यास गरिबांना निश्चित असे मासिक मानधन देऊ- राहूल गांधी
* अयोध्येत वादात नसलेली जमीन बाकीची मूळ मालकांना द्या- कॉंग्रेस
* आघाडीच्या नेत्यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट
* दानवेंच्या विरोधात उभारणार, त्यांची वागणूक वाईट- अर्जून खोतकर
* शाळातून म्हटल्या जाणार्या दोन संस्कृत श्लोकांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका
* अण्णा हजारे राळेगण सिध्दीतील मंदिरात आज उपोषणाला सुरुवात करणार
* देशातील प्रत्येकाला वागण्या-बोलण्याचं स्वातंत्र्य हवे- नयनतारा सहगल
* सध्याचा काळ कठीण आहे, गप्प राहून चालणार नाही, गप्प बसणं धोकादायक ठरू शकतं- नयनतारा सहगल
* देशात अनेक जातीधर्माचे लोकं राहतात, फक्त हिंदू धर्माचे नाही त्यामुळे देशात राहणारी प्रत्येक व्यक्ती हिंदुस्थानी- नयनतारा सहगल
* नाना पाटेकरांच्या मातोश्री निर्मला यांचे निधन
* दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आजपासून ऑनलाइन हॉलतिकीट
* लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांची होणार इन कॅमेरा चौकशी
* लोकपाल कायदा आणून पाच वर्षे झाली तरीही मोदी सरकार बहाणे बनवत आहेत- अण्णा हजारे
* चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे कृषी महाविद्यालय स्थापण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
* लोकपाल विधेयकाच्या कक्षेत मुख्यमंत्र्याना आणले, पारदर्शकता आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी उचलले महत्त्वाचं पाऊल- गिरीश महाजन
* मराठा समाज हा स्वातंत्र्यापूर्वीपासूनच मागास प्रवर्गात, स्वातंत्र्यानंतर मागास समाजांच्या यादीतून वगळले- राज्य मागास प्रवर्ग आयोग
* नवजात बालकांच्या 'मुख्यमंत्री शिशू स्वागत किट' चे पंकजा मुंडेंनी केले उद्घाटन
* एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेत सूट देण्यासाठी शेतजमीन अधिनियमात सुधारणेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
* ३९ साखर कारखान्यांकडे १५२१ कोटीची थकबाकी, कारखान्यांची मालमत्ता जप्त करून वसूल केली जाणार एफआरपीची रक्कम
* शिवसेना आणि भाजपची युती झाली म्हणजे हिंदुत्वाचा विजय झाला असं म्हणणार का?- मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला संजय राऊत यांचं उत्तर
* भाजपची राम मंदिर निर्माणाची भूमिका कायम असून, कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार - प्रकाश जावडेकर
* राज्य सरकारने चारा छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने अहमदनगरमध्ये जनसेवा फाऊंडेशनचा मोर्चा स्थगित
* मराठवाड्यात बालविवाह होत असल्याची विभागीय आयुक्तांची कबुली
* अनिल कपूर खांदेदुखीने त्रस्त, उपचारासाठी जर्मनीला जाणार
* तलवारीने केक कापल्याने शिवसेनेच्या पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुखावर गुन्हा दाखल
* वसंत आबाजी डहाके यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान’पुरस्कार जाहीर
* अरुण गवळी यांची जनसेवा व वय लक्षात घेऊन उर्वरीत शिक्षा माफ करावी- अखिल भारतीय सेनेची मागणी
* लेखक एकटा पडतोय, त्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य गमावतोय- पुष्पा भावे
* ठाणे येथे महिलेची पतीने कार्यालयात भोसकून केली निर्घृण हत्या
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर
* कोलकत्त्यात अमित शहांच्या रॅलीनंतर हिंसाचार, तुमच्या नेत्यांना आणि पक्षाला नियंत्रणात ठेवा- राजनाथसिंगांना सुनावले ममतांनी
* राम मंदिर न्यास समितीला ६७ एकर वादग्रस्त नसलेली जमीन परत करण्याची मागणी
* यमुना नदी प्रदुषणाबाबत हरयाणा सरकारला नोटीस, ०४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्याचे आदेश
* २०१९ मध्ये सत्तेवर आल्यास पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक संमत करणार - राहुल गांधी
* मेरठ ते प्रयागराजपर्यंत गंगा एक्सप्रेस वे बांधणार- योगी आदित्यनाथ
* राहुल गांधी यांनी दिलेलं किमान उत्पन्नाच्या हमीचं आश्वासन फसवं - मायावती
* राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची घेतली भेट
* कारगिलच्या विजयाला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराची विशेष दिनदर्शिका
* जेट एअरवेजच्या भागभांडवलाच्या नव्या रचनेत स्टेट बँक ऑफ इंडियाचा १५ टक्के हिस्सा
* पाकिस्तानात सुमन कुमारी यांची न्यायाधीशपदी नियुक्ती
Comments