HOME   महत्वाच्या घडामोडी

आज केंद्राचं बजेट, कल्पना चावलाचा स्मतिदिन, अण्णाचं उपोषण पैशासाठी- मलिक, १० टक्के आरक्षण आजपासून, निवडा हव्या वाहिन्या, जीएसटी सरकारला पावला.......०१ फेब्रुवारी २०१९


आज केंद्राचं बजेट, कल्पना चावलाचा स्मतिदिन, अण्णाचं उपोषण पैशासाठी- मलिक, १० टक्के आरक्षण आजपासून, निवडा हव्या वाहिन्या, जीएसटी सरकारला पावला.......०१ फेब्रुवारी २०१९

* अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट नाकारली
* अण्णा पैशासाठी उपोषण करतात असा नवाब मलिक यांनी केला होता आरोप
* नांदेड पोलिसांच्या कोठडीत आरोपीचा मृत्यू
* हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल्याने अनेकांची अडचणी वाढतील- मोहन भागवत
* पियुष गोयल आज केंद्राचा अर्थसंकल्प मांडणार, लोकप्रिय घोषणांची शक्यता शक्य
* आयकराची मर्यादा वाढण्याची शक्यता
* सहारा प्रकरणी सहारा प्रकरणी सुनावणी
* घरगुती गॅस १.४६ रुपयांनी स्वस्त
* अमित शाह ०९ फेब्रुवारीला पुण्यात, लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार
* प्लास्टीक बंदीनंतर आता रासायनिक खतांवर बंदी, सेंद्रीय खत स्वस्तात देणार
* आजपासून ३१ मार्चपर्यंत कसलीही सरकारी खरेदीला बंदी
* एफआरपी देऊ न शकलेल्या साखर कारखान्यातील साखर विकून शेतकर्‍यांना पैसे
* हैद्राबाद-नाशिक-अहमदाबाद विमानसेवा आजपासून
* नीरव मोदीच्या घराच्या जप्तीत आढळले निजामकालीन पडदे
* नोटबंदीनंतर बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ
* १० टक्के आरक्षण आजपासून लागू
* ट्रायच्या नव्या नियमाची आजपासून अमलबजावणी, हव्या त्या टीव्ही वाहिन्या निवडण्याची सुविधा
* भारतीय वंशाची अमेरिकन महिला अंतराळ वीर कल्पना चावला यांचा आज स्मृतीदिन
* अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथून अटक
* पेंग्विन पक्ष्यांमुळे राणीच्या बागेचे मागील दोन वर्षांत महापालिकेला मिळाले १५ कोटी उत्पन्न
* बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स बँकांवरील आर्थिक निर्बंध मागे, देता येणार कर्ज
* शहिदांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० लाख, शौर्य तसेच सेवापदक विजेत्यांच्या अनुदानात दुप्पटीने वाढ- देवेंद्र फडणवीस
* नागपुरात पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवून ०७ लाखांची फसवणूक करणार्‍या भोंदूबाबाला अटक, रोकड केली जप्त
* गोपीनाथ मुंडे यांचा अपघात झाला की घातपात हे स्पष्ट व्हायला हवे - धनंजय मुंडे
* राष्ट्रवादीची ०२ आणि ०३ फेब्रुवारीला पुण्यात परिवर्तन यात्रा
* साखर जप्तीसाठी स्वाभिमानीची कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासह साखर सहसंचालक कार्यालयावर धडक
* नोकरदारांना प्राप्तिकरात वाढीव सवलत, शेतकरी, लघु उद्योगांना आधार देण्याचा सरकार करणार प्रयत्न
* नरेंद्र मोदी आज सकाळी घेणार केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक
* गृहरक्षक दलाच्या महासंचालकपद नियुक्तीचा आदेश न स्विकारल्याने सीबीआय माजी संचालक आलोक वर्मांवर होणार कारवाई
* विम्याच्या पैशासाठी नोकराची हत्या करून स्वत:च्या हत्येचा बनाव करणारा रतलाममधील संघाचा कार्यकर्ता गजाआड
* जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर अंत्यसंस्कार, जॉर्ज साहेब अमर रहे...', 'जब तक सूरज चांद रहेगा, जॉर्ज तेरा नाम रहेगा' च्या निनादल्या घोषणा
* जानेवारीमध्ये जीएसटीतून मिळाले ०१ लाख कोटीपेक्षा अधिक उत्पन्न
* हिंसक वृत्ती, चीडचीड, गुंडगिरी वाढण्यास प्रोत्साहन देणार्‍या 'पबजी गेम' गेमवर बंदी घाला- ११ वर्षाच्या मुलाची जनहित याचिका
* भाजपचा सबका विकास संकल्पनेवर विश्वास, यात अल्पसंख्यांक समाजही येतो - अमित शहा
* इतकी वर्ष सत्ता उपभोगणाऱ्यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी काय केलं, ते जाहीर करावं - अमित शहा
* शबरीमला प्रकरणाची ०६ फेब्रुवारी रोजी घटनापीठासमोर सुनावणी


Comments

Top