* बिहारच्या हाजीपूरजवळ पहाटे सीमांचल एक्स्प्रेसचे नऊ डबे घसरले ०६ प्रवाशांचा मृत्यू
* अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, प्रकृती ढासळली, राळेगणमध्ये गावकर्यांचा मोर्चा
* पोपटराव पवार यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट
* काही बरं वाईट झाल्यास नरेंद्र मोदी जबाबदार- अण्णा हजारे
* राज्य सरकारी कर्मचार्यांना ०९ टक्के महागाई भत्ता
* डॉ. आनंद तेलतुंबडे यांची अटक अवैध न्यायालयाचा शेरा
* नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात, शरद पवारांनी घेतला उखाणा
* आधी घर सांभाळा, मग समाजाचं बघा, नितीन गडकरी यांचा अभाविप कार्यकर्त्यांना सल्ला
* पतियाळा कोर्टाने रॉबर्ट वाड्रा यांना १६ फेब्रुवारीपर्यंत दिला अंतरिम जामीन
* बीडमध्ये लाच प्रकरणी अपर जिल्हाधिकार्यांना अटक
* ऋषी शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती
* राम मंदीर हवं की नाही हे राहूल गांधी यांनी स्पष्ट करावं- अमित शाह
* चंद्रपुरात व्यसनमुक्ती साहित्य संमेलन
* भुकंपाच्या सहा धक्क्यानंतर एनडीआरएफचे पथक पालघरमध्ये हजर
* परभणी जिल्ह्यातील सेलू शहरातील जिल्हा बॅंकेच्या शाखेवर दरोडा, १९ लाखांची चोरी
* दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचे मानधन थेट खात्यात होणार जमा
* पत्रकारांच्या आर्थिक साह्यासाठी आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेला राज्य सरकारची मान्यता
* वैद्यकीय पदव्युत्तर पदवी शिक्षणात महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
* लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सिंटाने आलोक नाथ यांचे सदस्यत्व केले रद्द
* अण्णा हजारे यांच्या आंदोलनाकडे सरकारचे दुर्लक्ष, आक्रमक आंदोलन करण्याचा राळेगणसिद्धीच्या ग्रामसभेत निर्णय
* राजकारणातील गुन्हेगारी आणि भ्रष्टाचारविरोधात लढा दिला तरीही माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मी काय गुन्हा केला?- एकनाथ खडसे
* पंढरपूर बस स्थानकावर यवतमाळच्या ०४ अल्पवयीन मुला-मुलींना पोलिसांनी घेतले ताब्यात
* जीएसटीची कर प्रणाली असल्याने राज्यातील व्यवसाय कर रद्द करा- दि पूना मर्चंट्स चेंबर
* पंढरपूर सोलापूर रस्त्यावर मारुती आणि एसटीची धडक, ०५ जण जागीच ठार तर ०२ मुले गंभीर जखमी
* मुंबई परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या पोहोचली ०१ लाख २१ हजारांवर
* मुंबईत प्रयोगिक तत्वावर सुरू होणार सायकल अॅम्ब्युलन्स सेवा, अंधेरी, विलेपार्ले, शिवाजी पार्क परिसरात २० सायकल अॅम्ब्युलन्स उपलब्ध
* ममता सरकार गरिबांच्या स्वप्नांचा चुराडा करत आहे, प. बंगालमध्ये परिवर्तन होणारच- नरेंद्र मोदी
* पश्चिम बंगाल आणि आसामजवळील बांगलादेशाच्या सीमा बंद करण्यासाठी होणार तंत्रज्ञानाचा वापर- राजनाथसिंह
* शेवटच्या अधिवेशनात ऐनवेळी विधेयक रेटण्याचा प्रयत्न केल्यास संसदेचे कामकाज चालू देणार नाही- विरोधी पक्ष
* चेन्नईच्या अण्णा विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडला बिबळ्याचा बछडा, प्रवासी थायलंडहून आला भारतात
Comments