* आम्ही निर्णय केलाय शरद पवार माढ्यातूनच लढणार- विजयसिंह मोहिते पाटील
* उत्तरप्रदेश, उत्तराखंडात विषारी दारुने घेतले ९२ बळी
* तीन दिवसात रॉबर्ट वाड्राची २४ तास चौकशी
* राजस्थानात गुजर समाजाचं आरक्षणासाठी आंदोलकांचा रेल्वे मार्गावर ठिय्या
* अर्जून खोतकरांच्या मध्यस्थीने पुणतांब्यातील शेतकरी कन्यांचं उपोषण स्थगित
* युती झाल्यास किरीट सोमय्या नको- शिवसैनिक
* आघाडीचं सरकार आल्यास जातीयवाद वाढेल- अमित शाह
* मुंबईत भाषण करताना ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकरांना रोखले, पालेकर बोलत होते सरकारवर
* यंदाचा विश्वचषक इंग्लंडमध्ये
* मनसेला सोबत घेणार नाही- राष्ट्रवादी
* महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४५ जागा बारामतीसह जिंकणे हे भाजपचे लक्ष्य- अमित शाह
* अण्णा हजारे यांचे आजपासून मौन व्रत
* पुणतांब्याच्या मुलींचं उपोषण सरकारने दडपले- खा. राजू शेट्टी
* हैद्राबादच्या निजाम रुग्णालयात शस्त्रक्रिया करताना महिलेच्या पोटात राहिली कात्री, पुन्हा शस्त्रक्रिया
* वय झाल्याने मी माढातून निवडणूक लढवू नये असे सुचवू पाहणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करु नये - शरद पवार
* राज ठाकरे निवडणुकीत सोबत रहातील असे वाटत नाही-शरद पवार
* नितीन गडकरींचे पंतप्रधानपदासाठी नाव येत असल्याने मला त्यांची चिंता वाटते- शरद पवार
* अण्णा हजारेंच्या उपोषण या विषयावर बोलणे, काही पाहणे, बातम्या वाचणे मी गेली दोन वर्षे सोडून दिलं आहे- शरद पवार
* बेरोजगारीच्या मुद्द्यावरून एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी अमित शहांना पुण्यात दाखवले काळे झेंडे
* शिवाजी पार्कवरील जिमखाना हटवून नवीन महापौर बंगला उभारण्याचा प्रयत्न झाल्यास विरोध करणार- मनसे
* वेगळ्या विदर्भ आंदोलनास 'आप'चे पूर्ण समर्थन- दिल्ली 'आप'चे समाजकल्याण मंत्री राजेंद्रपाल गौतम
* आदिवासी समाजाने समृ्द्ध परंपरा व संस्कृती जोपासण्याचे काम केले, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आदिवासी महोत्सवाचा समारोप
* महाराष्ट्र धूम्रपानाचे सर्वात कमी प्रमाण असणारे राज्य, ०२ हजार ७५५ शाळा तंबाखूमुक्त- ग्लोबल अॅडल्ट टोबॅकोची पाहणी
* मनसेने लावले पालघर जिल्ह्यात ५०० आदिवासी जोडप्यांचे लग्न, अमितच्या लग्नाइतकाच आदिवासी तरुण-तरुणींच्या लग्नाने आनंद – राज ठाकरे
* नगर जिल्ह्यात गोठ्यावर विजेची तार कोसळून ०९ गायींचा मृत्यू
* प्रयागराज कुंभमेळ्यातील आज तिसरं शाहीस्नान
* पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित विश्वास यांची गोळ्या झाडून हत्या
* काँग्रेसप्रणित महाआघाडी जिंकल्यास देशात पुन्हा जातीयवाद वाढेल- अमित शहा
* संसदीय समितीसमोर उपस्थित राहण्यास ट्वीटरच्या सीईओंचा नकार
* केंद्रीय मंत्री अरुण जेटली उपचारानंतर परतले भारतात
* जयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या आयोगाला रोखण्यासाठी अपोलो रुग्णालयाची मद्रास हायकोर्टात धाव
* नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाचा निषेध म्हणून आसाममध्ये नरेंद्र मोदींना दाखविले काळे झेंडे
* कर्नाटक सरकार अस्थिर करण्यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा हात- काँग्रेस
* गोवा सरकारने लागू केले सौर ऊर्जा धोरण, सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना आणि ग्राहकांना मिळणार ५० टक्के सबसिडी
* सामान्य प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याची हिमाचल प्रदेश सरकारची घोषणा
* लष्कर ए तोयबाच्या अमेरिकेन तरुणाला पाकिस्तानात निघताना अटक
* उत्तर कोरिया प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांच्यात व्हिएतनाममध्ये शिखर परिषद
Comments