* भाजपाध्यक्ष अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची जागावाटपावर चर्चा, ९५ च्या फॉर्म्युल्याचा शिवसेनेचा आग्रह
* पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीकडून पुरवणी दोषारोपपत्र दाखल
* प्रियंका गांधी दिवसभर ट्वीटरवर कार्यरत
* रॉबर्ट वाड्रा यांची आज चौथ्यांदा चौकशी
* १६ फेब्रुवारी रोजी यवतमाळमधील पांढरकवडा येथे पंतप्रधानांची सभा
* हजारिका कुटुंबाचा भारतरत्न स्विकारण्यास नकार
* भाजप सरकार योजनांची नावे बदलणार
* कोल्हापुरात आज वंचित विकास आघाडीची सभा, ओवेसींना सेनेचा विरोध
* राजू शेट्टी स्वबळावर नऊ जागा लढवणार
* जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने राजू शेट्टी नाराज
* दिल्लीतील अर्पित पॅलेस हॉटेलला आग, नऊ जणांचा मृत्यू, २७ गाड्यांचा आग विझवण्याचा प्रयत्न
* मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या वाढली
* मोदी पाकिस्तानच्या पंतप्रधानांसारखे वागतात- अरविंद केजरीवाल
* शिवसेनेच्या युतीसाठी चार अटी- पुढचा मुख्यमंत्री सेनेचा, दोन्ही निवडणुका एकत्र, लोकसभेसाठी २५ तर विधानसभेसाठी १५० जागा
* २४ हजार शिक्षक भरतीची झाली घोषणा मात्र भरती होणार १० हजार ८०० जागांवरच, २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान येणार जाहिरात
* काही सोंगाड्यांमुळे देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात मतभेद झाले असले तरी आमची मैत्री कायम- संजय काकडे
* एका भावाने लाथ मारल्यास दुसरे घर शोधावेच लागते, निवडणूक राष्ट्रीय पक्षाकडूनच लढविणार- संजय काकडे
* धुरकट हवामानामुळे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९० टक्के विमाने उडाली विलंबाने
* सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतून मुंबई, पुणे व नाशिक शहरांसाठी उडान योजना
* १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान भिलार गावात जत्रा असल्याने 'पुस्तकांचं गाव' प्रकल्प तात्पुरता बंद
* पंढरपूर विठ्ठल मंदिराकडे असणाऱ्या अतिरिक्त सोने-चांदीच्या विटा बनविण्यासाठी समिती
* लोकशाही वाचवायची असेल तर सामूहिकपणे गांधीत्व सिद्ध करावे लागेल- सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र.
* नागपूर मेट्रो रेल्वे धावण्यासाठी सज्ज, १४ फेब्रुवारी रोजी होणार ट्रायल रन
* राम मंदिरासाठी १७ फेब्रुवारीला अयोध्येला जाण्याची शंकराचार्य सरस्वतींची घोषणा
* उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार- राहुल गांधी
* गुजरात दंगलींप्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना दिलेल्या क्लीन चीटविरोधातील याचिकेवर जुलैमध्ये सुनावणी
* जीडीपीमधील प्राप्तिकराचे प्रमाण वाढले, मोदी सरकारच्या कार्यकाळात करदहशत संपुष्टात आली- केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
* विदेशातील कंपन्या आणि जमीन-जुमल्यात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय श्रीमंतांची 'प्राप्तिकर विभाग' करणार चौकशी
* संसदीय समितीचे ट्वीटरच्या सीईओंना समन्स, २५ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश
* जवळच्या व्यक्तीला आलिंगन देण्यात जितके प्रेम असते, तितकेच आरोग्यदायी- संशोधनातून सिद्ध
* संगीत क्षेत्रातील ग्रॅमी पुरस्कार पटकावले लेडी गागा, चाइल्डिश गॅम्बिनो, ब्रँडी चार्ली या कलाकारांनी
Comments