HOME   महत्वाच्या घडामोडी

होय मी बगावतखोर आहे, जेलमध्ये कळ-निवडणुकीत बळ, उद्धव म्हणतात पुढचे पीएम मोदी, चौकीदाराला मुंबईचे बळ, सिंचन घोटाळ्यात कारवाई का नाही?, नारायण साई दोषी......२७ एप्रिल २०१९


होय मी बगावतखोर आहे, जेलमध्ये कळ-निवडणुकीत बळ, उद्धव म्हणतात पुढचे पीएम मोदी, चौकीदाराला मुंबईचे बळ, सिंचन घोटाळ्यात कारवाई का नाही?, नारायण साई दोषी......२७ एप्रिल २०१९

* राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेच्या मंचावर मोदींची स्तुती
* आज मुख्यमंत्र्यांची नाशिकमध्ये सभा
* आज विखे पाटील घेणार पत्रकार परिषद, पक्षांतर करण्याची शक्यता
* लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस
* सिंचन घोटाळा प्रकरणी अद्याप कारवाई का नाही? की फक्त निवडणुकीचा मुद्दा? राज ठाकरेंचा सवाल
* कोणत्या मुद्द्यांवर या सरकारला मते द्यायची?- राज ठाकरे
* या निवडणुकीत कॉंग्रेसची अवस्था २०१४ पेक्षा अधिक वाईट होणार- पंतप्रधान
* बलात्कार प्रकरणी आसारामांचा मुलगा नारायण साई दोषी, ३० एप्रिलला शिक्षा सुनावणार
* साध्वी प्रज्ञासिंहला जेलमध्ये कळ, निवडणुकीत येतं बळ....नवं स्लोगन
* चालता येत नाही म्हणून व्हील चेवरवर फिरणार्‍या प्रज्ञासिंह काल प्रचार सभेत चक्क नाचल्या
* भाजपाला लोकसभा निवडणुकीत २८२ पेक्षा अधिक जागा मिळतील- पंतप्रधान
* चौकीदाराला मुंबईकर ताकद देतील- पंतप्रधान
* एरवी मोदींना नावे ठेवणारे उद्धव ठाकरे म्हणतात, पुढचे पीएम मोदीच!
* मोदींनी शक्ती प्रदर्शनांसह वाराणसीत भरला उमेदवारी अर्ज
* अकोल्यात नोंदले गेले ४६.४ अंश सेल्सियस तापमान
* सरन्याधिशांविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या महिला कर्मचार्‍याने मांडली बाजू
* बालका एकदा तरी निवडणूक लढवून दाखव, शरद पवारांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला
* कॉंग्रेसचा जाहिरनामा काल्पनिक कथा- मुख्यमंत्री
* बेरोजगारीचा दर ०८.१ टक्के, तीन वर्षात सर्वाधिक
* नोटाबंदीची कल्पना अर्थमंत्र्यांनाही नव्हती- शत्रूघ्न सिन्हा
* जीएसटी त्रासदायक, सरकार म्हणते असं बोलणं बगावत आहे, होय मी बगावतखोर आहे- शत्रूघ्न सिन्हा
* लष्करात महिलांची ऑनलाईन नोंदणी सुरु
* राहूल गांधी यांच्या विविध ठिकाणी सभा
* पंतप्रधान अयोध्येच्या दौर्‍यावर जाण्याची शक्यता
* मुलांना एक वर्षाच्या आधी टीवी, मोबाईल दाखवू नका- जागतिक आरोग्य संघटना
* चौकीदार आणि थापाबाई यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मिडीयावर
* मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबईत सिनेमांच्या तिकिटांवरही मतदान करण्याचं आवाहन
* मुंबईत मतदान वाढावं यासाठी डबेवाल्यांचाही करणार वापर
* मोदींकडे हात दाखवणार्‍यांची बोटे कापू- हिमाचल प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष सतपाल सिंग सत्ती
* पंतप्रधानपदासाठी कोणी लायक नसल्यास इंग्रजांना बोलवावे लागेल- प्रकाश आंबेडकर
* आघाडी झाली असली तरी राहूल गांधी आणि शरद पवार यांची एकत्र सभा नाही
* अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंतयात्रेच्या व्हिडीओचा भाजपाकडून गैरवापर- राज ठाकरे
* श्रीलंकेतील बॉंबस्फोटातील मृतांचा आकडा गेला २५३ वर
* माजी खासदार गजानन बाबर शिवसेनेत दाखल
* दक्षिण आशियातील मान्सून साधारण राहण्याचा अंदाज
* योजना कॉंग्रेसच्याच पण मोदींनी नावं बदलली- राज ठाकरे
* अमित शहा यांच्या विरोधात नाशकात टाळ मृदंग वाजवत प्रचार


Comments

Top