HOME   महत्वाच्या घडामोडी

सभापतीपदी द्या महिलेला संधी, शेअर बाजार वधारला, अखिलेश यांचा कॉंग्रेसला पाठिंबा, मायावती बैठकीबाहेर, मराठवाड्यात सर्वाधिक टॅंकर, चंद्राबाबूंचा भेटींचा धडाका.....२० मे २०१९


सभापतीपदी द्या महिलेला संधी, शेअर बाजार वधारला, अखिलेश यांचा कॉंग्रेसला पाठिंबा, मायावती बैठकीबाहेर, मराठवाड्यात सर्वाधिक टॅंकर, चंद्राबाबूंचा भेटींचा धडाका.....२० मे २०१९

लातुरच्या बाजारात आज सोयाबीन ३७११, तूर ६६०० तर हरभरा पोचला ४६५१ रुपयांवर
लातूर मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदी महिलेला संधी देण्याची मागणी
लातुरच्या महाराष्ट्र बॅंकेने घेतला पीक कर्ज नूतनीकरण मेळावा
हजला पाठवतो म्हणून लातुरात २७ जणांना गंडा, शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल
लातुरच्या लोकसभा मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात झाले सरासरी ६० टक्के मतदान
भाजपप्रणित आघाडीला याही निवडणुकीत बहुमत मिळण्याचे मान्यवर संस्थांचे अंदाज
एक्झीट पोलच्या अंदाजामुळे शेअर बाजार वधारला
निवडणूक आयोगाने मोदी आणि त्यांच्या टोळीपुढे शरणागती पत्करली- राहूल गांधी
आज दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक, मायावती येणार नाहीत
केंद्रात कॉंग्रेसला पाठिंबा देण्याची सपा नेते अखिलेश यादव यांची तयारी
राष्ट्रवादी पुढच्या महिन्यापासून विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष तयारीला लागणार
मराठवाड्यात सर्वाधिक टॅंकर, पावसाशिवाय चित्र सुधारणार नाही
साक्रीचे आमदार डीएस अहिरे यांच्या कारने धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू
ओमानमधील ढगफुटीत माजलगावचे खैरुल्ला खान कुटुंबासह बेपत्ता
आज कॉंग्रेसची बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेता ठरण्याची शक्यता
चंद्राबाबू नायडू यांनी घेतली सोनिया गांधी, शरद पवार, सिताराम येचुरी यांची भेट
वैद्यकीय शिक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही करु नये, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची मागणी
महाराष्ट्रात शिवसेना-भाजपला प्रत्येकी १७ जागा मिळण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या जागा वाढण्याची शक्यता
मुंबईत भाजपा पदाधिकार्‍यांची बैठक सुरु, निवडणूक संचालन समिती घेणार निवडणुकीचा आढावा
लोकसभा निवडणुकीत हिंसाचार झालेल्या ठिकाणी फेरमतदान होण्याची शक्यता
राज्यात कॉंग्रेस आघाडीला लोकसभेच्या २५ जागा मिळतील- अशोक चव्हाण
मराठा मेडीकल आरक्षण: अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी


Comments

Top