HOME   महत्वाच्या घडामोडी

बारावीचा निकाल, राजीनाम्यावर गांधी ठाम, सनीच्या रोड शो मध्ये महिला खिसेकापू, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, नागपूर ४६.७ डिग्री, आदित्य विधानसभा लढणार?.......२८ मे २०१९


बारावीचा निकाल, राजीनाम्यावर गांधी ठाम, सनीच्या रोड शो मध्ये महिला खिसेकापू, राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, नागपूर ४६.७ डिग्री, आदित्य विधानसभा लढणार?.......२८ मे २०१९

* आज दुपारी एक वाजता बारावीचा निकाल होणार ऑनलाईन जाहीर
* दुष्काळी उपाय योजनांसाठी निलंग्यात कॉंग्रेसने काढला शेतकर्‍यांचा रुमणे मोर्चा
* लातूर जिल्हा परिषदेतील ११४ कर्मचार्‍यांच्या बदल्या
* लातूर मनपाचे नवे स्थायी समिती सभापती दीपक मठपती यांनी स्विकारला पदभार
* लातूर माहेश्वरी महिला संघटनेने गंगापूर घेतले दत्तक, महिलांसाठी काम, पाणीही देणार
* मांजरा धरणावरील वीज पुरवठ्यात बिघाड, पाणी वितरणाचा खोळंबा
* लातूर जिल्ह्यातील ६२ स्कूल बसचालकांना आरटीओच्या नोटिसा
* ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु
* आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढवावी, युवा सेनेची मागणी
* डॉ. अरुण गद्रे यांनी पहाटे फिरताना टोळक्याने अडवले, धर्माची चौकशी केली, जय श्रीराम म्हणताच सोडून दिले
* राधाकृष्ण विखे पाटलांसोबत चार आमदार भाजपात जाणार असल्याची चर्चा
* राहूल गांधी पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम
* वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाची सरकारला नोटीस
* पेट्रोल तीन रुपयांनी महागण्याची शक्यता
* उदयनराजे भोसले आणि सुप्रिया सुळे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत खासदार
* मुंबई मनपा देवनार येथे कचर्‍यापासून वीज निर्मिती करणार, जागतिक पातळीवर टेंडरही निघाले
* पुण्यातील पिसोळात मैत्रिणीला जबरीने दारु पाजून दोघांनी केला बलात्कार
* वाराणसीत दर्शनानंतर नरेंद्र मोदी यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद
* कोणत्याही भाषेत शपथ घेण्यास तयार- खा. इम्तियाज जलील
* सनी देओलच्या रोड शो दरम्यान खिसे कापणार्‍या सहा महिलांना अटक
* तृणमूल सोडून भाजपात आलेल्या संतू घोष यांची गोळ्या घालून हत्या
* मालेगावात दारु नेणारा ट्रक उलटला, तळीरामांनी लांबवले खोकेच्या खोके
* विश्वचषकासाठी आज भारत बांगलादेशात सरावाचा सामना
* गमावलेल्या जागांबाबत राष्ट्रवादी आत्मपरिक्षण करणार- सुप्रिया सुळे
* विधानसभा निवडणुकीसाठी उद्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत बैठक
* शपथविधी सोहळ्यासाठी ‘बीमस्टेक’ सदस्यांना निमंत्रण
* रामाचं काम सगळ्यांनी मिळून करायचं- मोहन भागवत
* नागपुरात ४६.७ डिग्री सेल्सियस तापमान
* वंचित विकासच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळला नाही- खा. इम्तियाज जलील
* उर्मिला मातोंडकरांवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍याला अटक
* आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती


Comments

Top