* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३७७७, तूर ६१११ तर हरभरा पोचला ४५०० रुपयांवर
* आज एसटीचा वाढदिवस, ७१ व्या वर्षात पदार्पण
* अनुदानित गॅस सिलींडरच्या दरात एक रुपया २३ पैशांनी वाढ
* विना अनुदानित गॅस सिलींडर २५ रुपयांनी महागले
* १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता
* यंदा १०० टक्के पाऊस होईल, मान्सूनचा दुसरा अंदाज
* राधाकृष्ण विखे पाटील भेटले मुख्यमंत्र्यांना, पावसाळी अधिवेशनापूर्वी जाणार भाजपात
* शहिदांच्या मुलांच्या शिष्यवत्तीत वाढ
* तिसर्यांदाही अवजड उद्योग खाते मिळाल्याने शिवसेनेत नाराजी
* देशातील शेतकर्यांना वर्षाला मिळणार सहा हजारांचं अनुदान
* राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज बैठक
* राष्ट्रवादी नव्या चेहर्यांना देणार संधी, पवारांचा निर्धार
* आयटीआयचा ऑनलाईन प्रवेश ०३ ते ३० जून
* कार्यकर्त्यांनी नीट रहावे, चुकीचे वागाल तर वाचवायला येणार नाही- खा. इम्तियाज जलील
* राहूल गांधींनी अद्याप राजीनामा दिलाच नाही, पक्षाचा खुलासा
* युतीचे पृथ्वीराज देशमुख विधान परिषदेवर बिनविरोध
* मागच्या पाच महिन्यात ३१३ शेतकर्यांनी कवटाळले मृत्यूला
* विकास दर घसरला ५.८ टक्क्यावर, बेरोजगारीचा दर गेला ६.१ वर
* मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प ०५ जुलै रोजी सादर होणार
* कोल्हापुरातील यशवंत बॅंकेत पिस्तुलाचा धाक दाखवून अज्ञाताकडून लूट
* मुंबई पोलिस दलातील ४४६ कर्मचारी निवृत्त
* राज्यात वैद्यकीय पदव्युत्तरच्या ५२० जागा वाढवण्याचा केंद्राकडे प्रस्ताव
* कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता राष्ट्रवादीने फेटाळली
* रशियाकडून क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केल्याने अमेरिकेचा भारताला इशारा
* पहिल्याच महिन्यात पंतप्रधान करणार तीन देशांचा दौरा, मालदीव, किर्गीस्तान आणि जपान
* अमेरिकेतील वर्जिनियात माथेफिरुकडून अंदाधुंद गोळीबार, ११ जण ठार.
* विश्वचषक: आज ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानात सामना
* नीरव मोदीने जामिनासाठी केला लंडन कोर्टाकडे अर्ज, ११ जूनला सुनावणी
Comments