HOME   महत्वाच्या घडामोडी

सोलापूरचे अभियंता मोहसीन खान यांच्या खुनाची चौकशी करा

निदर्शने, खान कुटुंबियाला नोकरी देण्याची मागणी, राज्यभरातून प्रतिसाद


सोलापूरचे अभियंता मोहसीन खान यांच्या खुनाची चौकशी करा

सोलापूर: सोलापूरच्या मोहसीन शेख या अभियंता असलेल्या तरुणाचा पुण्यात २ जून २०१४ रोजी खून करण्यात आला. या गोष्टीला आज पाच वर्षे झाली, तरी मोहसीन शेख याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. त्यासाठी आता तरी न्याय द्यावा, अशी मागणी करत राज्यभरातून जमलेल्या तरुणांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. चळवळीतील तरुण कार्यकर्ते दुपारी दोनच्या सुमारास पुनम गेटजवळ जमले, अनेक युवकांच्या हातात विविध प्रकारचे फलक होते. दंडाला काळ्या फिती लावल्या होत्या. धरणे आंदोलन केल्यानंतर सर्वांनी मोहसीनसाठी प्रार्थना केली. घटना घडून पाच वर्षे उलटली तरी आरोपीविरुध्द गुन्हा निश्चित नाही, आरोपीविरुध्द खटला सुरू नाही, मुख्य आरोपीला जामीन मंजूर होतोय, अशा पध्दतीने एकंदरीत या खटल्याबद्दल दिरंगाई, अनास्था पाहायला मिळत आहे. गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे, एका निरपराध तरुणाची धर्माच्या आधारावर हत्या करणे म्हणजे एक प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे. घटना घडल्या नंतर तत्कालीन शासनाने पीडिताच्या भावाला सरकारी नोकरी आणि पीडिताच्या परिवाराला आर्थिक सहाय्य देण्याचे अाश्वासन दिले होते. मात्र आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. मुख्य आरोपीचा सन्मान करून भारतीय संस्कृतीला मारक आणि सोलापूरच्या मोहसीन शेख याची पुण्यात हत्या करण्यात आली. या गोष्टीला पाच वर्षे उलटली तरी अद्याप न्याय मिळाला नाही. न्याय मिळण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील तरुणांनी सोलापुरात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. अशोभनीय कृत्य केले जात आहे, अशा प्रतिक्रिया या वेळी व्यक्त करण्यात आल्या. याप्रसंगी मोहसिनचे बंधू मुबीन शेख व कुटुंबातील व्यक्तींसह राज्यभरातून ईरफान शेख, सुफीयान मनियार, जुनेद आतार, अख्तर हमीद, शौकत शेख, एन.आय.पठाण, अमीन शेख, अबरार खान,डॉ अन्सार शेख, अय्युब शेख, नसीर शेख, जकी भाई, शेख तय्यब, अकबर आतार, शादाब शेख, जलील आतार या तरुणांसह सोलापुरातील हसीब नदाफ, अॅड. महिबुक कोथंबिरे, शौकत पटेल, सरफराज शेख, अॅड. गोविंद पाटील, राम गायकवाड, पोपट भोसले, खालिक मन्सुर, आकिब दफेदार, शफी कॅप्टन आदी उपस्थित होते. मोहसीन खून खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पीडित मोहसीन शेख यांचे बंधू मुबीन शेख यांना तात्काळ शासकीय सेवेत घ्यावे, पीडिताच्या परिवाराला उर्वरित आर्थिक सहाय्य लवकरच देण्यात यावे, हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, खटल्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, आरोपीविरुध्द कडक कारवाई करावी, काही अटी घालून मुख्य आरोपीला जामीन दिला आहे. मात्र आरोपी त्या अटी पाळत नाही म्हणून त्याचा जामीन रद्द करण्यात यावा. या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


Comments

Top