HOME   महत्वाच्या घडामोडी

मान्सून अरबी समुद्रात, ममता राक्षस वंशाच्या? तडवीला १० लाखांची मदत, गिरीश बापटांचा आज राजीनामा, प्रज्ञा ठाकुरांची हजेरी, बसपात करणार बदल......०४ जून २१०९


मान्सून अरबी समुद्रात, ममता राक्षस वंशाच्या? तडवीला १० लाखांची मदत, गिरीश बापटांचा आज राजीनामा, प्रज्ञा ठाकुरांची हजेरी, बसपात करणार बदल......०४ जून २१०९

* लातुरात रात्री विजांच्या कडकडाटासह दहा मिनिटे पाऊस, नंतर बराच काळ रिमझिम
* मान्सूनचा दक्षिण अरबी समुद्रात प्रवेश, सहा जूनला केरळमध्ये होणार दाखल
* मराठवाड्यात अनेक ठिकाणी झाला पाऊस, परभणीत जोरदार
* दहावीचा निकाल ०८ जूनला जाहीर होणार
* पायल तडवीच्या कुटुंबाला शासनाची १० लाखांची मदत
* दिल्लीत महिलांना मेट्रो आणि सिटी बसचा प्रवास मोफत
* मुदतपूर्व निवडणुकांच्या शक्यतेमुळं केजरीवालांची घोषणा
* जेजुरीतल्या खंडेरायाला टॅंकरच्या पाण्याने अभिषेक
* विहिंपकडून पिंपरीत तरुण मुलींना बंदुका आणि तलवारी चालवण्याचे प्रशिक्षण
* महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्‍या मुंबई मनपाच्या अपायुक्त निधी चौधरींची उचलबांगडी
* इदसाठी एसटीतील मुस्लीम कर्मचार्‍यांच्या पगारी लवकर करा- दिवाकर रावते
* गिरीश बापट आज देणार मंत्रीपदाचा राजीनामा
* ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईतील ३४ धोकादायक पूल बंद
* गोदावरीत पाणी आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु- मुख्यमंत्री
* रामदास आठवले यांनी स्विकारला मंत्रीपदाचा कार्यभार
* पाणी आणि चारा उपलब्ध होईपर्यंत छावण्या, टॅंकर सुरु ठेवणार- महसूल मंत्री
* २०२४ पर्यंत राम मंदिराचे काम पूर्ण करु- वेदांती
* ममता बॅनर्जी राक्षस कुटुंबातील, साक्षी महाराज बोलले!
* बेपत्ता हवाई दलाच्या विमानाचे अवशेष सापडले
* विश्वचषक: पाकिस्तानने १४ धावांनी हरवले इंग्लंडला
* 'हिंदी'ची सक्ती मुळीच नाही, केंद्र सरकारची अखेर माघार
* इंजीनिअरिंग आणि फार्मसीच्या सीईटी परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाइन
* पुणे मनपा कर्मचार्‍यांना लवकरच सातवा आयोग, समिती नियुक्त
* औरंगाबादेत कुलगुरू चोपडे यांच्या चौकशीचा अहवाल जाहीर करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न
* रयत क्रांती संघटना ही 'कमळ' चिन्हावर विधानसभा लढवणार- सदाभाऊ खोत
* खा. प्रज्ञा सिंह ठाकूरला आठवड्यात एकदा हजेरी लावण्याचे विशेष कोर्टाचे निर्देश
* रॉबर्ट वाड्रा यांना उपचारासाठी परदेशात जाण्याची दिल्ली कोर्टाची परवानगी
* लोकसभेतील पराभव, मायावती बसपात बदल करणार


Comments

Top