मुंबई: राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने दोन दिवस मुंबईतील टिळक भवनात राज्य निवड मंडळाची बैठक आयोजित करण्यात केली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जुन खरगे, प्रांताध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, काँग्रेस वर्किंग कमिटीचे विशेष निमंत्रित सुशिलकुमार शिंदे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस रजनीताई पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख, सचिव चेल्ला वामशी रेड्डी, संपतकुमार, जयवंत आवळे, आमदार बसवराज पाटील, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, आमदार भाई जगताप, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी उपस्थित आहेत. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक उमेदवार निवडून यावेत यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघाचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार असून जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गटनेते, महापौर, उपमहापौर आणि महापालिकेतील गट नेते, आदी उपस्थित आहेत.
Comments