HOME   महत्वाच्या घडामोडी

पाकिस्तान पराभूत, आजपासून शाळा, मंत्रीपदात रस नाही, डॉक्टरांचा देशव्यापी बंद, एव्हरेस्टवर योगा, समुद्र रक्षक ड्रोन......१७ जून २०१९


पाकिस्तान पराभूत, आजपासून शाळा, मंत्रीपदात रस नाही, डॉक्टरांचा देशव्यापी बंद, एव्हरेस्टवर योगा, समुद्र रक्षक ड्रोन......१७ जून २०१९

* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३७१५, तूर ५७७१ तर हरभरा पोचला ३९११ रुपयांवर
* चोर आले रे चोर आले, विरोधकांच्या घोषणांनी विधानसभेचे अधिवेशन सुरु
* डॉक्टरांचा देशव्यापी बंद सुरु, लातुरच्या भालचंद्र रक्तपेढीत निषेध सभा आणि पत्रकार परिषद
* सुटी संपली, आज शाळांना सुरुवात
* भारताची ८९ धावांनी पाकिस्तानवर मात, रोहित शर्मा सामनावीर
* कर्णधार विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा ओलांडला
* राज्यातील नव्या तेरा मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, विखे पाटलांक्डे गृहनिर्माण
* चंद्रकांत पाटील, विनोद तावडे यांच्या खात्यात कपात
* नव्या चेहर्‍यांना संधी द्यायची म्हणून काही मंत्रांची खाती काढून घेतली- मुख्यमंत्री
* कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आमदार थांबायला तयार नाहीत- फडणवीस
* आता मंत्रीपदात रस उरला नाही- एकनाथ खडसे
* पंतप्रधानांनी घेतली सर्वपक्षीय बैठक, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा
* आजपासून संसदेचे अधिवेशन
* राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून
* आज डॉक्टरांचा देशव्यापी बंद
* मुजफ्फरनगरात मेंदूज्वराने मरण पावलेल्यांची संख्या ९३
* आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माऊंट एव्हरेस्टवर योगाचे आयोजन
* दिल्लीः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतली माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट
* जनतेच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, आता सरकारची जबाबदारी वाढली आहे- मोहन भागवत
* ३० जून रोजी पंतप्रधानांची ‘मन की बात’
* राजस्थानात एका सुनावणीसाठी गायीला आणले कोर्टात
* राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा ही आमची इच्छा: उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
* भारत अमेरिकेकडून खरेदी करणार ३० सशस्त्र समुद्र रक्षक ड्रोन
* शिवसेना गो बॅक, ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍यावेळी मुस्लीम लीगची निदर्शने
* बिहारमध्ये २४ तासात ४५ जणांचा उष्माघाताने मृत्यू
* फादर्स डे निमित्त शहरुख खानने सुरु केली वेबसाईट, गरजू महिलांना मदत
* अभिनेता ऋषी कपूरवर परदेशात कर्करोगाचे उपचार
* राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील ३६०० जागा वाढणार
* स्वीस बॅंकात काळा पैसा लपविणार्‍या ५० जणांची नावे उघड
* तीन दिवसात मान्सून येणार कोकणात
* पोर्टलवर माहिती न देणार्‍या रक्तपेढ्यांचे परवाने रद्द होणार


Comments

Top