HOME   महत्वाच्या घडामोडी

लातूर मनपाला वार्षिक साठ कोटी रुपयांचे अनुदान द्या

आमदार अमित देशमुख यांची विधानसभेत आग्रही मागणी


लातूर मनपाला वार्षिक साठ कोटी रुपयांचे अनुदान द्या

मुंबई: लातूर महानगरपालिकेला राज्य शासनाकडून जीएसटी पोटी वार्षिक केवळ १० कोटी रुपये अनुदान दिले जाते. यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची कुवतही महापालिकेकडे राहिली नाही. हे लक्षात घेता लातूर महानगरपालिकेला वार्षिक ६० कोटी रुपयांचे अनुदान दिले पाहिजे अशी आग्रही मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी विधानसभेत अर्थसंकल्पीय अनुदानावरील चर्चेत केली.
महसूल, कृषी, वने आणि नगरविकास विभागाच्या मागण्यांबाबत सरकारचे लक्ष वेधताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, राज्यात महसूल यंत्रणा अपुरी असून मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे काम कमालीचे रेंगाळले आहे. लातूर विभागीय आयुक्तालयाचा निर्णयही प्रलंबित ठेवण्यात आला आहे. राज्यातील वाळू उपशातून त्याचप्रमाणे गौण खनिजांच्या रॉयल्टीमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरप्रकार होत आहेत. जनतेला आवश्यक असणारी प्रमाणपत्रे वेळीच मिळत नाहीत याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.


Comments

Top