HOME   महत्वाच्या घडामोडी

पबजीसाठी भावाचा खून, आंबोली धबधबा जोमात, सॅटेलाईटद्वारे पीक मोजणी, आमचं ठरलंय!, आज मन की बात, कॉंग्रेस-भाजपा सारखेच.....३० जून २०१९


पबजीसाठी भावाचा खून, आंबोली धबधबा जोमात, सॅटेलाईटद्वारे पीक मोजणी, आमचं ठरलंय!, आज मन की बात, कॉंग्रेस-भाजपा सारखेच.....३० जून २०१९

* भिवंडीत पबजी गेम खेळू न देणार्‍या मोठ्या भावाचा लहान भावाने केला खून
* पुणे: भिंत कोसळ्याप्रकरणी बिल्डर विपुल, विवेक अग्रवाल यांना पोलिसांनी केली अटक
* गिरीश बापट, सुप्रिया सुळे, चंद्रकांत पाटील यांनी दिली घटनास्थळाला भेट
* मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना २५ हजार रुपयांची मदत
* विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष मजबूत करा, राहूल गांधी यांचे आवाहन
* महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांची राहूल गांधी यांनी घेतली बैठक
* वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरु
* मत विभाजन टाळण्यासाठी वंचितला सोबत घेण्यास कॉंग्रेस तयार- अशोक चव्हाण
* युती-एनडीएच्या काळात मोठे घोटाळे, बदनामी कॉंग्रेसची- विजय वडेट्टीवार
* सामना सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानी प्रेक्षकांनी केली अफगाणी समर्थकांना मारहाण
* वैद्यकीय प्रवेशासाठी पडताळणी सुरु
* राज्य सरकार सॅटेलाईटद्वारे करणार पिकांची मोजणी
* २६५ नेत्यांना सरकारी घरे सोडण्याबद्दल नोटिसा, जेटली, स्वराज आधीच सोडली घरे
* आमचं ठरलंय, निवडणुकीनंतर समजेल- रावसाहेब दानवे
* आंबोलीतील मुख्य धबधबा ओसंडू लागला, पर्यटकांची गर्दी
* आज पंतप्रधानांची ‘मन की बात’
* विश्वचषक: अफगाणिस्तानची अखेरपर्यंत झुंजला पण पाकिस्तानने केली तीन विकेट्सनी मात
* आज भारताचा मुकाबला इंग्लंडशी
* ऑस्ट्रेलियाची न्यूझिलंडवर ८६ धावांनी मात
* कॉंग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा नाना पटोले यांचा राजीनामा
* मराठी क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
* मराठा आरक्षणाच्या आड कुणीही येऊ नये, उद्धव ठाकरे यांचा इशारा
* मराठा गौरव पुरस्काराने मुख्यमंत्र्यांना करणार सन्मानित
* घाटकोपर येथे भिंत कोसळल्याने सहा कार्सचा चुराडा
* नागपूरच्या वरोरा पोलीस ठाण्यात पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
* भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही पक्ष सारखेच- असदुद्दीन ओवेसी
* ठाणे न्यायालयात आरोपीने न्यायाधिशांना चप्पल फेकून मारली
* सुषमा स्वराज यांनी सरकारी निवासस्थान सोडले
* मुंबई: अवैध कार पार्किंगला दहा हजारांचा दंड, निर्णय मागे
* विद्यार्थी संख्या कमी, विद्यापिठाच्या जाचक अटी, हैद्राबादचे मराठी महाविद्यालय अडचणीत
* पेरण्या न झाल्यानं वारकर्‍यांच्या संख्येत २५ टक्क्यांनी घट
* पंढरपूरकडे निघालेल्या पाच लाख वारकर्‍यांना रेनकोटचे वाटप


Comments

Top