HOME   महत्वाच्या घडामोडी

आयएनएस विराट भंगारात, धरण फुटले २२ वाहून गेले, ५२ उड्डाणे रद्द, विमानतळावर मासे, ५२ उड्डाणे रद्द, राहूल गांधींसाठी आत्महत्येचा प्रयत्न, सैन्यदलात हजारो पदे रिक्त.....०३ जुलै २०१९


आयएनएस विराट भंगारात, धरण फुटले २२ वाहून गेले, ५२ उड्डाणे रद्द, विमानतळावर मासे, ५२ उड्डाणे रद्द, राहूल गांधींसाठी आत्महत्येचा प्रयत्न, सैन्यदलात हजारो पदे रिक्त.....०३ जुलै २०१९

* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ३७२१, तूर ५६३९ तर हरभरा पोचला ४३३५ रुपयांवर
* चिपळूणमधील तिवरे धरण फुटले, २२ जण गेले वाहून
* राज्यात पावसाने घेतले ३६ बळी
* येरवडा कारागृहात हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यावर खुनी हल्ला
* सीबीआयचे देशभरात ५० ठिकाणी छापे, फसवणुकीच्या १४ गुन्ह्यांची नोंद
* कोंढवा भिंत कोसळल्या प्रकरणी तीन बिल्डर आरोपींना जामीन नाकारला
* भारतीय सैन्यदलात ७८ हजारांवर पदे रिक्त
* विश्वचषक: भारताने केली बांगलादेशवर २८ धावांनी मात, बांगलाची चिवट झुंज
* मुंबई विमानतळावर साचलेल्या पाण्यात मासे
* कमी वेळात मुंबईत अभूतपूर्व पाऊसः फडणवीस- मुख्यमंत्री
* मुंबई: ५२ उड्डाणे रद्द, १०० विमानांचे वेळापत्रक बदलले
* 'बिग बॉस'फेम अभिजित बिचुकले जामिनासाठी मुंबई हायकोर्टात
* दाऊद इब्राहिमचा हस्तक रियाज भाटी याला अटक
* अंधेरीच्या मॅन्होलमध्ये एबीपी माझाचा कर्मचारी आशिष घोरपडे पडला, स्वत:च वर आला
* विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासंदर्भातील सुनावणीला लंडनमध्ये सुरुवात
* आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक
* पायल तडवी प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर ०९ जुलैला सुनावणी
* राहूल गांधींनी राजीनामा मागे घ्यावा, काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याचा आत्महत्येचा प्रयत्न
* मुंबईतील नाल्यांलगतच्या झोपड्या हटवणार: मुख्यमंत्री फडणवीस
* मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन
* आयएनएस विराट हे विमानवाहू जहाज भंगारात काढण्याचा केंद्राचा विचार
‘* मुद्रा’ योजनेत २३१३ घोटाळे, केंद्राची कबुली
* मुंबईत एक हजार असुरक्षित नागरिकांना नौदलाने हलवले
* मंत्रालय परिसरात बांधणार भुयारी मार्ग, ४०० कोटी रुपयांचा खर्च
* गैरवर्तन करणार्‍यांना पक्षातून काढून टाकले जाईल, गय केली जाणार नाही- नरेंद्र मोदी
* नीरव मोदीची बहिण आणि मेहुण्याची सिंगापुरमधील खाती गोठवली
* गोंदियातील एका शाळेत पतीने केला विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापक पत्नीचा कुर्‍हाडीने खून


Comments

Top