HOME   महत्वाच्या घडामोडी

नितेशचा चिखल-राणेंची माफी, खेकड्यांमुळे धरण फुटले, वंचितमध्ये फूट, मोदींचा अर्थसंकल्प, दाऊद पाकिस्तानातच, आदित्य नवे महापौर?.....०५ जुलै २०१९


नितेशचा चिखल-राणेंची माफी, खेकड्यांमुळे धरण फुटले, वंचितमध्ये फूट, मोदींचा अर्थसंकल्प, दाऊद पाकिस्तानातच, आदित्य नवे महापौर?.....०५ जुलै २०१९

* अधिकार्‍यावर चिखल फेकल्या प्रकरणी नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात
* नितेश प्रकरणी नारायण राणे यांनी मागितली माफी
* वंचित विकास आघाडीत फूट, लक्ष्मण माने यांनी केली प्रकाश आंबेडकरांच्या राजीनाम्याची मागणी
* मोदी सरकार आज सादर करणार अर्थसंकल्प
* विश्वचषक: वेस्ट इंडीजने केली अफगाणिस्तानवर २३ धावांनी मात
* अफगाणिस्तानचा सलग नववा पराभव
* पाकिस्तानला विश्वचषकाबाहेर काढण्यासाठी भारताने इंग्लंडसोबत पराभव स्विकारला- सिकंदर बख्त
* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्धची लढाई सुरुच राहील- राहूल गांधी
* आंतरराष्ट्रीय न्यायालयात १७ जुलै रोजी कुलभूषण जाधव प्रकरणाचा निकाल
* दाऊद पाकिस्तानातच, पण नाकारले जाते- परराष्ट्र मंत्रालय
* पुण्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका शाळात सातवा वेतन आयोग
* दाभोलकर-पानसरे प्रकरणात सीबीआयची मुंबई हायकोर्टाकडून कानउघाडणी
* बँकांच्या परीक्षा आता मराठी भाषेसह १३ भाषांमध्ये होणार
* दुबईतील विमानतळावर भारतीय चलन खरेदीसाठी वापरता येणार
* खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटलं- जलसंधारण मंत्री तानाजी सावंत
* तिवरे धरण दुर्घटना प्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल नाही, २० मृतदेह हाती
* राजू शेट्टी दुसर्‍यांदा भेटले राज ठाकरे यांना
* नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ
* आदित्य ठाकरे यांचा मुंबई मनपाच्या कामात हस्तक्षेप वाढला
* आदित्य ठाकरे मुंबईचे भावी महापौर? महानगरपालिकेत जोरदार चर्चा
* थकित कर्जासाठी रिझर्व बॅंक आणि तत्कालीन सत्ताधारी कारणीभूत- उर्जित पटेल
* खा. प्रीतम मुंडे यांनी शपथपत्रात दिली खोटी माहिती, उच्च न्यायालयात याचिका
* औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्समधून मॅनेजरनेच केली ५८ किलो सोन्याची चोरी
* हाफीज सैदला भारताच्या हवाली करा, परराष्ट्र विभागाची मागणी
* हाफिज सईदसह १२ दहशतवाद्यांवर पाकिस्तानात खटला दाखल
* कॉंग्रेसचा हंगामी अध्यक्ष पुढच्या महिन्यात ठरणार
* अकरावी प्रवेशाची सर्वसाधारण यादी आज होणार जाहीर
* यंदा पॉलिटेक्निकच्या ४७ हजार जागा राहणार रिकाम्या


Comments

Top