* आज लातुरच्या बाजारात सोयाबीन ३७३८, तूर ५९६१ तर हरभरा गेला ४५५० रुपयांवर
* सप्टेंबरपासून लातूर शहराला केवळ दोनदा पाणीपुरवठा होणार
* लातुरात पुन्हा रेल्वेने पाणी आणण्याचा प्रस्ताव, जिल्हाधिकार्यांकडून चाचपणी
* लातूर शहरात पन्नास टक्के पाणी कपात करण्याच्या सूचना
* नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज सहा वर्षे पूर्ण, अजूनही तपासच सुरु
* दाभोलकर प्रकरणी लातुरच्या क्रीडा संकुलावर पार पडला निर्भय मॉर्निंग वॉक, खेद आणि घोषणा
* नाना पाटेकर भेटले अमित शाह यांना, पूरग्रस्तांसाठी भेटल्याचा दावा
* विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटेकरांच्या भेटीला महत्व, अर्धा तास चर्चा
* मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली अरुण जेटली यांची भेट
* ठाणे बंदची हाक देणार्या मनसे कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता
* २२ ऑगस्टला बंद पाळू नका, राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
* काम नसेल तर घराबाहेर पडू नका, मनसे कार्यकर्त्यांचे ठाणेकरांना आवाहन
* जे आवरत नाहीत त्यांना आत टाकायचं हे सरकारचं धोरण, राज ठाकरे यांचा दावा
* मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांची इडीने केली प्रदीर्घ चौकशी
* राज ठाकरे यांना इडीची नोटीस आल्याचे माहित नाही- मुख्यमंत्री
* तुम्हाला इडीची नोटीस आल्याचा त्रास सामान्य नागरिकांना कशाला? मुख्यमंत्र्यांचा प्रश्न
* राज ठाकरेंची चौकशी, ब्लॅकमेलींगचा प्रयत्न, आपण आधीच कल्पना दिली होती- प्रकाश आंबेडकर
* इडीच्या चौकशी प्रकरणी राष्ट्रवादी आणि विरोधकांचा राज ठाकरेंना पाठिंबा
* पूरग्रस्त भागातील एक हेक्टरपर्यंत शेती असणार्या शेतकर्यांचे कर्ज माफ करणार
* खोटे फोन करुन पूरग्रस्तांची ऑनलाईन लूट करण्याचा प्रयत्न उघड
* पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना बालभारतीकडून मोफत पुस्तके
* पूरग्रस्त भागातील बंद पडलेल्या दुचाकी बार्शीच्या मेकॅनिक्सनी केल्या दुरुस्त
* राज्यातील पूरस्थितीमुळे मुंबईतील अनेक दहीहंड्या रद्द, रक्कम देणार पूरग्रस्तांना
* पूरस्थिती लक्षात घेऊन आगामी निवडणुका पुढे ढकलाव्यात, कवीवर्य ना. धों महानोर यांची सूचना
* परिवहन विभागाविरोधात परभणीतील ऑटोरिक्षाचालकांनी केली संप पुकारण्याची घोषणा, काढला मोर्चा
* राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त सोनिया गांधी, राहूल, प्रियंका, मनमोहनसिंग यांनी अर्पण केली श्रद्धांजली
* चांद्रयान आज चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार, ३१ ऑगस्टपर्यंत चंद्राभोवती फिरणार
* ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण खय्याम यांचे निधन, ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
* त्रिशूल, कभी कभी, उमराव जान या चित्रपटातील संगितामुळे खय्याम यांची कारकिर्द बहरली होती
* १४४ जागा तुम्ही लढा, १४४ आम्ही लढतो प्रकाश आंबेडकरांचा कॉंग्रेसला प्रस्ताव
* वनखात्यावर गंभीर आरोप करणार्या अभिनेते सयाजी शिंदे यांचा नाशिकातील कार्यक्रम रद्द
* जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल
* नाशिकात इलेक्ट्रीक बसची चाचणी, लवकरच धावणार रस्त्यावर
* श्रीनगरातील १९० शाळा पुन्हा झाल्या सुरु, कडक बंदोबस्त
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत दूरध्वनीवरून केली अर्धा तास चर्चा
Comments