* आज लातुरच्या बाजारात; सोयाबीन ३७३१, तूर ५७६१ तर हरभरा पोचला ४४५१ रुपयावर
* डॉ. जगदीश अग्रोया यांचे आज सकाळी निधन, देहदानाचा केला होता संकल्प, अजिंक्य सिटीतील निवासस्थानी अंत्यदर्शन
* लातूर महानगरपालिकेची आज सर्वसाधारण सभा, कदाचित निवडणुकीपूर्वीची शेवटची सभा
* लातुरात मोकळा श्वास घेण्यासाठी मोजावे लागतात पैसे, हे अजबच- आ. अमित देशमुख
* लातुरच्या विलास साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापनाचा पुरस्कार नवी दिल्लीत प्रदान
* लातूर जिल्ह्यातील गणेश मुर्तींचे विसर्जन न करता मनपाला दान करणार, जिल्हाधिकार्यांच्या बैठकीत निर्णय
* सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आ. प्रणिती शिंदे यांना अटक वॉरंट जारी
* मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणार पहिली खाजगी रेल्वे
* विरोधी पक्षातील १७ आमदार आपल्या संपर्कात- रावसाहेब दानवे
* युतीबद्दल राज्यभर शंका, पण नेते आश्वस्त
* आमच्यातून गेलेले भाजपात राज्य करीत आहेत: जयंत पाटील
* शिवसेना आणि भाजपात जागा वाटप निश्चित झाले आहे, उद्धव ठाकरे यांची माहिती
* युतीची चर्चा जोरात पण दोन्ही पक्षांकडून स्वबळाची चाचपणी
* साठे महामंडळ घोटाळ्यातील आ. रमेश कदम राष्ट्रवादीला करणार रामराम, सेनेत जाण्याची शक्यता
* राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
* राष्ट्रवादी केव्हाही भाजपासोबत जाऊ शकतो, हा पक्ष आघाडीत असेल तर आम्ही आघाडीत जाणार नाही- प्रकाश आंबेडकर
* साखर निर्यातीसाठी सरकार देणार अनुदान
* ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत-पाकिस्तान युद्ध होणार, पाकिस्तानी रेल्वेमंत्र्यांचा दावा
* भिकेला लागलेल्या पाकिस्तानकडे स्वत:च्या गरजा भागवण्याचीही क्षमता नाही
* देशात सुरु होणार नवी ७५ वैद्यकीय महाविद्यालये, जागाही वाढणार
* मोटार वाहन कायद्यातील बदल ०१ सप्टेंबरपासून लागू होणार
* चंद्रयान ०२ ने चंद्राच्या तिसर्या कक्षेत केला प्रवेश, महत्वाचा टप्पा
* बिहारमध्ये एकाच कुटुंबातील १६ जणांवर अॅसिड हल्ला
* यूपीएस मदान होणार राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त
* हवामान खात्याचे डॉप्लर रडार अचूक काम करीत नाही, पावसाचा योग्य अंदाज मिळत नसल्याची तक्रार
* पाकिस्तानने काश्मीर प्रश्नात नाक खुपसू नये, राहूल गांधी यांचा इशारा
* आज आंतरराष्ट्रीय खेळ दिन, पंतप्रधानांकडून 'फिट इंडिया' या नव्या अभियानाची घोषणा, सर्वांसाठी आरोग्य
* भिवंडीत बनावट खवा तयार करणार्या कारखान्यावर धाड
* कलम ३७० रद्द करण्यास विरोध; याचिकांवर ऑक्टोबरमध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी
* चर्चा असफल, मुंबईत बेस्ट कामगारांचे उपोषण सुरुच
* डिजिटल मीडियामध्ये २६ टक्के थेट परकीय गुंतवणूक, केंद्राची मंजुरी
* राजकारणात राहुल गांधी अद्याप लहान; काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा दावा
* राज्य सरकार ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ करणार
* 'मिशन मंगल' चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त
* देशात मोदी नावाचा आजार: जिग्नेश मेवानी
* सभागृहे नीट चालावीत यासाठी देशातील सर्व आमदारांसाठी आचारसंहिता
* छोट्या घरांसाठी जीएसटीत सवलत देण्याचा निर्णय
* रक्तदान करताना नोंदवावे लागणार आधार कार्ड
* घाण होत असल्यानं लखनौ रेल्वे स्थानकावर केळी विक्रीला बंदी
Comments