* ३१ तारखेला मुख्यमंत्र्यांची महा जनादेश यात्रा लातुरात, संध्याकाळी साडेसात वाजता सभा
* जनादेश यात्रा अहमदपूर, शिरूर ताजबंद, हाळी हंडरगुळी, वाढवणा, उदगीर, लोहारा, आष्टामोड, ममदापुरात येणार जनादेश यात्रा
* राणेंचा स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन होणार, दोन्ही मुलांसह भाजपात येणार
* ऊस नाही तर भात शेती करा, केंद्रीय पथकाचा पूरग्रस्त कोल्हापुरात सल्ला
* सातजणांच्या केंद्रीय पथकाची पुण्यात झाली बैठक
* सांगलीत रात्री अंधारात पूरग्रस्त भागाची पाहणी, सांगलीकर संतप्त
* पूरग्रस्त भागातील ध्वस्त १०० शाळांची दुरुस्ती केली जाणार
* वॉटर ग्रीड: मराठवाड्यातली ११ मोठी धरणं पाईपलाईनने जोडणार, जायकवाडी, येलदरी, केसापुरी, निम्न तेरणा, विष्णुपुरी, सीना कोळेगावचा समावेश
* वॉटर ग्रीडसाठी श्रीलंका, इस्रायलचा अभ्यास दौरा
* भाजपाची मेगा भरती एक आणि पाच सप्टेंबरला अमित शाहांच्या उपस्थितीत
* मेगा भरतीत उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, हर्षवर्धन पाटील, सिद्धराम म्हेत्रे, राणा पाटील यांचा समावेश
* राणा जगजितसिंह यांनी ३१ तारखेला आयोजित केला कार्यकर्त्यांचा मेळावा, भाजपा प्रवेश नक्की
* भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदासाठी १० डिसेंबर रोजी निवडणूक
* भाजपा होतोय चोरांचा पक्ष- प्रकाश आंबेडकर
* मुख्यमंत्र्यांनी केला पदाचा दुरुपयोग, इडीकडून चौकशी करा, नाना पटोले यांची मागणी
* विधानसभा उमेदवार निवडीसाठी ज्योतिरादित्य शिंदे छाननी समितीची बैठक
* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आली जालन्यात
* राष्ट्रवादीच्या प्रेतयात्रेला कुणीच यायला तयार नाही- रावसाहेब दानवे
* अहमद पटेल यांच्या मुलाची इडीकडून चौकशी
* पी. चिदंबरम यांना आज सीबीआय कोर्टात हजर करणार
* १७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यांचा वाढदिवस, 'सेवा सप्ताह' म्हणून साजरा केला जाणार
* राज्य सरकारने तरुणांना रोजगार दिला नाही, दिवाकर रावते यांचा आरोप, एसटीनं ३६ हजार नोकर्या दिल्याचा दावा
* वाढत्या लोकसंख्येचा मुंबईला धोका, राजधानी हलवण्यावर विचार सुरु
* फ्लॅटधारकांना मिळणार जमिनीच्या मालकीचे हक्क
* दहावीच्या फेर परिक्षेचा निकाल होणार आज जाहीर
* मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी लवकर पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे निर्देश
* चांद्रयान आज चंद्राच्या चौथ्या कक्षेत करणार प्रवेश
* अमिताभ बच्चनही येणार वेब सिरीजमध्ये
* मुंबईतही होणार सवाई संगीत महोत्सव, भीमसेन जोशींच्या मुलाची घोषणा
* दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 'फिट इंडिया' कार्यक्रमाची पंतप्रधानांच्या हस्ते होणार सुरुवात
* अजय देवगणने घेतली सात कोटी रुपयांची कार
* हिंदुस्तान युनिलिव्हरनं आंघोळीच्या साबणांच्या किमती केल्या ३० टक्क्यांनी कमी
* पाकिस्तानने केली क्षेपणास्त्रांची चाचणी, २९० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता
* जम्मू-काश्मीरच्या पाच जिल्ह्यातील मोबाईल सेवा सुरु
* आजपासून भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील दुसऱ्या कसोटीला सुरुवात
* अफ्रिकेसोबतच्या टी २० सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Comments