HOME   महत्वाच्या घडामोडी

मुख्यमंत्री आज लातुरात, राणेंचा भाजपा प्रवेश लांबणीवर, नातलग नेत्यांचे पक्षांतर; पवार खवळले, भुजबळांना आठवलेंचे निमंत्रण, आजच भरा आयकर.....३१ ऑगस्ट १९


मुख्यमंत्री आज लातुरात, राणेंचा भाजपा प्रवेश लांबणीवर, नातलग नेत्यांचे पक्षांतर; पवार खवळले, भुजबळांना आठवलेंचे निमंत्रण, आजच भरा आयकर.....३१ ऑगस्ट १९

* महाजनादेश यात्रा आज लातूर जिल्ह्यात, लातुरात संध्याकाळी सात वाजता सभा
* शिवसेनेला विश्वासात घेतल्यानंतरच राणे यांचा भाजपा प्रवेश, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
* नारायण राणे यांचा भाजपा प्रवेश पडला लांबणीवर
* उद्या एक सप्टेंबरला अमित शाह यांच्या उपस्थितीत सोलापुरात तीन बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
* राष्ट्रवादीतील नातलग नेत्यांच्या पक्षांतराबाबत प्रश्न विचारल्यानं शरद पवार पत्रकारांवर खवळले
* एक तर मला बोलवा नाही तर या पत्रकारांना बोलवा शरद पवारांची संतप्त सूचना
* जालना सामूहिक बलात्कार प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी घेतली पोलिस महासंचालकांची भेट
* आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार, सेना नेत्यांची घोषणा
* संभाजी भिडे यांनी घेतली खा. उदयनराजे यांची भेट
* राजकारणापासून आलिप्त व्हावं वाटतंय, उदयनराजे यांची प्रतिक्रिया
* राज्यातील चारा छावण्यांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
* पुण्यातील गणेशोत्सवात सहा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवण्यास परवानगी
* छगन भुजबळांनी शिवसेनेत जाण्यापेक्षा आपल्या रिपब्लीकन पक्षात यावे, रामदास आठवले यांचे आमंत्रण
* रामदास आठवले यांचा मराठारत्न पुरस्काराने गौरव, सर्वात आधी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याचा आठवले यांचा दावा
* मुंबईतील नव्या मेट्रोचं लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन
* दहावी पुरवणी परीक्षेत राज्यात २२.८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
* ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी राहूल गांधींना गिरगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
* देशभरात १२,५०० आयुष केंद्रे उभारणार, पंतप्रधानांची घोषणा
* १० बॅंकांचं विलीनीकरण, अर्थमंत्र्यांची घोषणा
* १० बँकांचे विलिनीकरण करून ०४ बँका बनवल्या जाणार, अर्थमंत्र्यांची घोषणा
* विकासदर ५.८ वरु आला ०५ टक्क्यांवर
* एअर इंडीयाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया लवकरच होणार सुरु
* शंभर रुपयांची नवी नोट लवकरच, होणार रंगी बेरंगी, चकचकीत, वार्नीशचा लेप
* डिजिटल पेमेंटचा बोलबाला असला तरी रोख व्यवहार वाढले, पाचशेच्या नोटांचा मोठा वापर
* जलतंटे मिटवण्यासाठी कर्नाटकात समिती स्थापन
* पी. चिदंबरम यांची सीबीआय कोठडी ०२ सप्टेंबरपर्यंत वाढली
* महानायक अमिताभ बच्चन यांचा वेब सिरीज क्षेत्रात प्रवेश
* ‘प्रस्थानम’ या संजय दत्तच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
* आयकर भरण्याची आज शेवटची तारीख, तारिख वाढल्याच्या वृत्ताचा आयटीकडून इन्कार
* राम मंदीर होईपर्यंत आपल्याला काहीच होणार नाही, प्रज्ञासिंह ठाकूर यांचा विश्वास
* बिहारमध्ये सरकारी कर्मचार्‍यांना जीन्स वापरण्यावर बंदी
* लष्करप्रमुख बिपिन रावत यांचा श्रीनगर दौरा, कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीरचा पहिला दौरा


Comments

Top