HOME   महत्वाच्या घडामोडी

मोदींचे चहास्थळ पर्यटनस्थळ, विसर्जानापूर्वी युतीचे जागावाटप, काश्मीरातील निर्बंध हटवले, मान्सून परतीवर, ट्रॅव्हल्सचे भाडे वाढले, सीएसएमटी सुंदर स्थानक.....०३ सप्टेंबर १९


मोदींचे चहास्थळ पर्यटनस्थळ, विसर्जानापूर्वी युतीचे जागावाटप, काश्मीरातील निर्बंध हटवले, मान्सून परतीवर, ट्रॅव्हल्सचे भाडे वाढले, सीएसएमटी सुंदर स्थानक.....०३ सप्टेंबर १९

* बॅंकांच्या विलीनीकरणाच्या विरोधात लातुरच्या बॅंक कर्मचार्‍यांनी घेतली निषेध सभा
* उरणच्या गॅस प्रकल्पाला भीषण आग, तिघे गंभीर जखमी
* सात सप्टेंबर रोजी पंतप्रधान मुंबईत, तीन सभांचं आयोजन
* परळीत दोन अल्पवयीनांकडून तरुणाचा ब्लेडने खून, प्रेत फेकले कब्रस्तानात
* सोलापूर मुक्कामी अमित शाह यांनी घेतली वरिष्ठ नेत्यांसोबत गुप्त बैठक
* केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
* अमोल कोल्हे यांनी केली उदयनराजेंची मनधरणी, शिष्टाई असफल
* मावळा छत्रपतींचे मन वळवू शकत नाही, अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया
* गणेश विसर्जनापूर्वी युतीचं जागावाटप होणार
* भाजपात एवढ्या संख्येनं येऊ नका, नाही तर आम्हालाच काढून टाकाल- रावसाहेब दानवे
* काँग्रेसचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार शिवसेनेत दाखल
* विरोधकांकडे उमेदवारच नाहीत, २८८ जागा जिंकू- चंद्रकांत पाटील
* वाईतून मदन भोसले, कोरेगावातून महेश शिंदे, कराडमधून अतुल भोसले, उत्तर कराडमधून मनोज घोरपडे यांची भाजपाकडून उमेदवारी घोषित
* पी चिदंबरम प्रकरणी होणार आज सुनावणी
* चांद्रयान मोहीम: ऑर्बिटरपासून विक्रम लॅंडर वेगळे, चंद्राभोवती स्वतंत्रपणे फिरणे सुरु
* काश्मीरातील नव्वद टक्के निर्बंध हटवले
* पेटीएमवरुन आता एसटी बसचे आरक्षण करता येणार
* आयकर भरणार्‍यांच्या संख्येत झाली चार टक्क्यांनी वाढ
* मोदींनी लहनपणी चहा विकला ते ठिकाण होणार पर्यटनस्थळ
* सहकार बॅंक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम
* पश्चिम महाराष्ट्रातील मोठी धरणे शंभर टक्के भरली
* मान्सूनचा परतीचा प्रवास पुढच्या आठवड्यापासून
* कर्नाटकचे मुख्यमंत्री येदीयुराप्पा गणेशोत्सवासाठी आज मुंबईत, पाणी वाटप-जलतंट्यावर होणार चर्चा
* गणेशोत्सवामुळे खाजगी ट्रॅव्हल चालकांनी वाढवले प्रवासाचे भाडे
* जगातील सुरक्षित शहरात दिल्ली ५३ वे, टोकियो प्रथम
* पहिल्यांदा अणुबॉंबचा वापर करणार नाही- इम्रान खान
* वाढीव दंडाबाबत परिवहन खाते गोंधळात, दोन दिवसात एकही कारवाई नाही
* दिल्लीत संसद भवन परिसरात चाकू घेऊन जाणाऱ्या युवकाला अटक
* हैदराबादच्या खैरताबादमध्ये गणेशाची ६१ फुटी उंच मूर्ती, सर्वात उंच मूर्ती असल्याचा दावा
* विश्वकोशाचे ०१ ते २० खंड आणि कुमार विश्वकोश डिजिटल स्वरुपात उपलब्ध
* प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांनी साकारले गणेशाचे वाळूशिल्प
* जगभरातील १० सुंदर स्थानकात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा समावेश


Comments

Top