HOME   महत्वाच्या घडामोडी

गड किल्ले भाड्याने मिळणार, मनपा अडचणीत, अजित पाटलांचे ग्रामीण दौरे, एमआयएम नाराज, महाजनादेश १३ पासून, अमित शाह लोकप्रिय.....०६ सप्टेंबर २०१९


गड किल्ले भाड्याने मिळणार, मनपा अडचणीत, अजित पाटलांचे ग्रामीण दौरे, एमआयएम नाराज, महाजनादेश १३ पासून, अमित शाह लोकप्रिय.....०६ सप्टेंबर २०१९

* लग्न समारंभ, हॉटेलिंगसाठी महाराष्ट्रातील गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय
* मंत्री बबनराव लोणीकरांच्या उपस्थितीत लातुरच्या विशामगृहावर भाजपाच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती
* औसा मार्गावरील नंदकिशोर ढगे यांच्या घरातील लक्ष्म्यांच्या अंगावरील २५ तोळे सोने आणि दोन कंबरपट्ट्यांची चोरी
* तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानीची नवी मूर्ती बसवणार
* रेल्वेनं ११ कोटी रुपयांचं पाण्याचं बिल पाठवल्यानं लातूर महानगरपालिका अडचणीत
* मनपा असमर्थ, पुन्हा रेल्वेचे पाणी आणायचे तर करायचे काय? प्रश्न अनुत्तरीत
* अजित पाटील कव्हेकरांचे ग्रामीण भागांचे दौरे अचानक सुरु, भाजपाने हिरवा कंदिल दाखवल्याची चर्चा
* लातुरच्या डालडा फक्टरीच्या १८ गुंटे जागेवर अखेर मालकी हक्काचा बोर्ड लागला
* अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी 7776977767 या क्रमांकावर माहिती दयावी, जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन
* आर्थिक संकटात सापडलेली बीएसएनएलकडून ७० हजार कर्मचार्‍यांना सक्तीची सुटी देण्याची तयारी
* बीएसएनएलची यंत्रणा अंबानीच्या ताब्यात देण्याचा घाट असल्याचा कर्मचार्‍यांचा आरोप
* वीज कर्मचार्‍यांच्या वेतनात ३२ टक्क्यांची वाढ
* युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ५०-५० टक्क्यांचाच- खा. संजय राऊत
* शरद पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आज राष्ट्रवादीची बैठक
* वंचित आघाडीकडून एमआयएएमला केवळ आठ जागा, मागितल्या होता ७४
* आम्ही जागा कमी करण्यास तयार पण आठ जागा अमान्य- खा. इम्तियाज जलील
* आ. अवधूत तटकरे यांचा राजीनामा, घेतली आदित्य ठाकरे यांची भेट
* उद्धव ठाकरे आज कोल्हापुरच्या दौर्‍यावर
* मुंबईतील नियोजित कार्यक्रमास एकाच मंचावर येणे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी टाळले
* सोनिया गांधी यांनी घेतली काँग्रेस नेत्यांची बैठक
* चित्रा वाघ यांची भाजप मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
* रिपब्लिकन पक्ष विधानसभा निवडणूक स्वतंत्र चिन्हांवर लढणार
* महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी स्विकारला पदभार
* ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली विधानसभा उमेदवार छाननी समितीची बैठक
* महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा १३ सप्टेंबरपासून, नगरमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो
* अमित शाह ठरले केंद्रातले सर्वात लोकप्रिय मंत्री
* सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रणिती शिंदे यांना जामीन मंजूर
* विनयभंग प्रकरणात नाना पाटेकर यांची पुन्हा चौकशी करण्याची तनुश्री दत्ता यांची मागणी
* आरेतील जंगलतोडीस विरोध करण्यासाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे अभियान
* चांद्रयान आज मध्यरात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार
* ज्येष्ठ नाटककार किरण नगरकर यांचे निधन
* मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, सातारा परिसरात अतिवृष्टीची शक्यता, रेड अलर्ट जारी
* कोल्हापुरच्या राधानगरी धरणाचे पाचही दरवाजे उघडले, पूरस्थितीची शक्यता
* बेस्ट कर्मचार्‍यांच्या वेतनात होणार पाच ते बारा हजारांची वाढ
* मुंबईत विजेवर चालणार्‍या बसचे लोकार्पण, दादर ते पुणे धावणार
* माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांना १९ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी, तिहार कारागृहात रवानगी
* पेट्रोल व डिझेजवर चालणाऱ्या गाड्या बंद होणार नाहीत- नितीन गडकरी
* अतिवृष्टीच्या शक्यतेमुळं डबेवाल्यांनी ठेवली सेवा बंद
* कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना इडीचे समन्स


Comments

Top