HOME   महत्वाच्या घडामोडी

वंचितची सत्ता संपादन रॅली, चांद्रयानाचा संपर्क तुटला, खोत अडकले कोंबडीत, बच्चन मराठी सिनेमात, मी राष्ट्रवादीतच कितीदा सांगायचे?.....०७ सप्टेंबर २०१९


वंचितची सत्ता संपादन रॅली, चांद्रयानाचा संपर्क तुटला, खोत अडकले कोंबडीत, बच्चन मराठी सिनेमात, मी राष्ट्रवादीतच कितीदा सांगायचे?.....०७ सप्टेंबर २०१९

* नागपूर ते कोल्हापूर; वंचित बहुजन आघाडीची आता सत्ता संपादन रॅली, जाहीरनामा सांगणार, लातुरात अण्णाराव पाटलांनी दिली माहिती
* कडकनाथ कोंबडी घोटाळा: ७२ शेतकऱ्यांची फसवणूक; राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाविरुद्ध साताऱ्यात गुन्हा दाखल
* कोंबडी प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी गाठले इडी कार्यालय
* मी राष्ट्रवादीतच आहे, याच पक्षात काम करीत राहणार, हे कितीदा सांगायचं? छगन भुजबळ यांचा सवाल
* चांद्रयान मोहीम: विक्रम लँडर चंद्रापासून २.१ किलोमीटरपर्यंत असताना संपर्क तुटला, पंतप्रधानांनी दिला शास्त्रज्ञांना धीर, इस्रोकडून अभ्यास सुरू
* आर्थिक संकटापासून देशाचं लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी चांद्रयान मोहिमेचा वापर, ममता बॅनर्जीं यांचा आरोप
* चांद्रयान मोहिमेबाबत पंतप्रधान देशाला करणार संबोधित
* ज्या किल्ल्यांच्या केवळ चार भिंती राहिल्यात, ज्याचा इतिहास नाही अशा ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने विकासकामाचा प्रयत्न, सरकारचा खुलासा
* अतिवृष्टीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विदर्भ दौरा पुढे ढकलला, पण मुंबईत येणार
* वंचित बहुजन आघाडीत फूट, एमआयएम स्वबळावर लढणार, खा. इम्तियाज जलील यांची घोषणा
* प्रकाश आंबेडकर म्हणतात, असदुद्दीन ओवेसी यांच्याशी बोलल्यानंतरच निर्णय घेतला जाणार
* नंदुरबार जिल्ह्यात गणेश विसर्जन करताना सहा तरुणांचा बुडून मृत्यू
* राष्ट्रवादीने केली राज्यातील २२० जागांवर चर्चा
* अमिताभ बच्चन मराठी सिनेमात, पहिले पोस्टरही प्रकाशित
* मिलींद देवरा यांचा राजीनामा सोनिया गांधी यांनी स्विकारला
* दुबई आणि मस्कतमध्ये मराठी बांधवांकडून गणेशोत्सव
* आयुष्यातील जोडीदार शोधण्यासाठी फेसबुकची मदत, लवकरच नवे फिचर
* संभाव्य पूरस्थिती आणि खबरदारी म्हणून एनडीआरएफची दोन पथके कोल्हापूरकडे रवाना
* आश्रमशाळेतील शिक्षकांना नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालायवर बिऱ्हाड मोर्चा
* कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे ०४ स्वयंचलित दरवाजे उघडे, पंचगंगा नदीच्या पाण्याचा विसर्ग सुरु
* डॉ. पानसरे हत्या प्रकरणी सचिन अंदुरे, गणेश मिस्किन आणि अमित बद्दी या आरोपींना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी
* महाराष्ट्रातील किल्ल्यांवर रिसॉर्ट व हेरिटेज हॉटेल्स उभारण्याच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची टीका
* नवे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
* उत्तराखंडात मुसळधार पाऊस, भूस्खलनामुळे चमोली परिसरातील रस्ते बंद
* राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक येत्या नऊ सप्टेंबरला भाजपात प्रवेश करणार
* उन्नाव बलात्कार प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी


Comments

Top