HOME   महत्वाच्या घडामोडी

वंचितमधली फूट फायनल, पवार भेटले सोनियाना, एकादशीचे चांद्रयान यशस्वी, दारु दुकानात कॅमेरे, आचारसंहिता केव्हाही .....१० सप्टेंबर १९


वंचितमधली फूट फायनल, पवार भेटले सोनियाना, एकादशीचे चांद्रयान यशस्वी, दारु दुकानात कॅमेरे, आचारसंहिता केव्हाही .....१० सप्टेंबर १९

* वंचित बहुजन आघाडीत फूट, एमआयएम सरकले बाजुला, ओवेसींनी केले शिक्कामोर्तब
* शरद पवार यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ४० मिनिटे चर्चा
* विक्रम लॅंडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरुच, अद्याप यश नाही
* औसा शहराला माकणीहून पाणीपुरवठा, योजना मंजूर केल्याबद्दल झाल्याबद्दल अभिमन्यू पवार यांचा सत्कार
* लातूर-उस्मानाबादसाठी वॉटर ग्रीड, उभारणीसाठी राज्य सरकार काढणार निविदा
* लातूर बाजार समितीने पूरग्रस्तांना दिले ११ लाख रुपये
* ग्राहकांच्या हिताला बाधा आणणार्‍या निर्णयांच्या विरोधात लातुरात बॅंक कर्मचार्‍यांनी केली निदर्शने
* लातुरच्या औसा हनुमान गणेश मंडळाने बीबी ठोंबरे यांना प्रदान केला दक्षिणेश्वर पुरस्कार
* औशाला माकणीचे पाणी मिळेपर्यंत सत्कार घेणार नाही- अभिमन्यू पवार
* उस्मानाबाद भाजपाकडे, राणा जगजितसिंहांना तुळजापूरशिवाय पर्याय नाही
* मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत घेतले ३७ निर्णय
* दारु दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक अन्यथा पन्नास हजारांचा दंड
* दारु दुकानांचे फुटेज एक महिना ठेवावे, मोठ्या प्रमाणावरील विक्री येणार अडचणीत
* निवडणूक काळातील पार्ट्यांची पूर्व सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाला देणे बंधनकारक
* राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर, अविनाश महातेकर यांच्या मंत्रीपदांचे आज ठरणार भवितव्य
* कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते, १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान होईल मतदान
* कुठल्याही क्षणी होऊ शकते भाजपा शिवसेनेच्या युतीची घोषणा- उद्धव ठाकरे
* आदित्य ठाकरेंचा राहूल गांधी होईल, प्रकाश आंबेडकरांचा इशारा
* शिवसेनेला उप मुख्यमंत्रीपद मिळू शकते, मुख्यमंत्री भाजपचाच होईल- रामदास आठवले
* अवधूत तटकरे, अनिल तटकरेंचा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
* चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन व सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत जागा-वाटपावर भाजप-शिवसेनेची बैठक
* भाजपाने केली २८८ जागांची चाचपणी पण युती होणारच- चंद्रकांत पाटील
* उदयनराजे यांचा भाजपा प्रवेश रखडला, भाजपात जाऊ नका, कार्यकर्त्यांचा सल्ला
* चांद्रयान-२: 'विक्रम' लॅंडर पुर्णपणे सुरक्षित, कोणतेही नुकसान नाही; इस्रोची माहिती
* अमेरिकेने एकादशीच्या दिवशी अंतराळात यान सोडलं म्हणून अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली: संभाजी भिडे गुरुजींचा शोध
* नव्या धोरणामुळं स्टेट बॅंक ऑफ इंडिया बॅंकेचे गृहकर्ज होणार माफ
* मसूद अजहरची कारागृहातून मुक्तता, मसूदने केली अतिरेक्यांसाठी नियमावली जाहीर
* ब्रिटीश एअरवेजच्या वैमानिकांचा पगारवाढीच्या मागणीसाठी मंगळवारपासून संप
* पुणे शहर आणि जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी चारही धरणे पुन्हा पूर्ण क्षमतेने भरली
* देशात ३० लाख ड्रायव्हिंग लायसन्स बोगस; पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांची माहिती
* वंचित विकास आघाडीला आरएसएस चालवतं का? खा. इम्तियाज जलील यांचा प्रश्न
* 'एमआयएम'सोबत युती कायम; प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टीकरण
* कॉंग्रेससोबत आघाडी नाही; पण येतील त्यांना घेऊन चालणार: प्रकाश आंबेडकर
* सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली, नदीकाठच्या परिसरातील लोकांचे स्थलांतर
* माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकासाठी उप समिती नेमणार


Comments

Top