HOME   महत्वाच्या घडामोडी

रत्नापूर चौकात क्रांती स्तंभ, मांजरा सहकार भूषण, जागतिक बॅंक कोल्हापुरात, सोने पन्नाशीत? कॉंग्रेसच्या मित्रपक्षांना ४१ जागा.....११ सप्टेंबर २०१९


रत्नापूर चौकात क्रांती स्तंभ, मांजरा सहकार भूषण, जागतिक बॅंक कोल्हापुरात, सोने पन्नाशीत? कॉंग्रेसच्या मित्रपक्षांना ४१ जागा.....११ सप्टेंबर २०१९

* लातुरच्या रत्नापूर चौकात नगरसेविका जान्हवी सूर्यवंशी यांनी उभारला क्रांती स्तंभ, शिलालेख, सिंह आणि हत्तींचा शिल्प समूह
* लातुरातील जलाशयात गणेश मूर्तींचे विसर्जन करु नये, दान कराव्यात, प्रशासनाचे आवाहन
* विसर्जन सोहळा सुलभपणे व्हावा यासाठी लातुरात पर्यायी मार्गांचा अवलंब केला जाणार
* नाशिक येथे मांजरा साखर कारखाना सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित
* दुष्काळ, पाणी टंचाई, बेरोजगारीच्या प्रश्नांवर लातुरच्या कॉंग्रेसने जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन
* सोने लवकरच जाणार पन्नाशीत, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे भाकित
* शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले, क्रांती सेनेचे सुरेश पाटील यांचा आरोप
* राफेल विमाने आठ ऑक्टोबरला होणार सेवारत
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं भारत - नेपाळ पाईपलाईनचं
* जागतिक बॅंकेंचं पथक आज पूरग्रस्त कोल्हापुच्या पूरग्रस्त भागाची करणार
* पुराचे वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा प्रस्ताव
* कोल्हापूर परिसरातील पुराचे पाणी ओसरु लागले
* सचिन तेंडुल्करांनी बीड नगरपरिषदेला पाठवलेल्या एक कोटी खासदार फंडाचा हिशोब मिळेना
* अशोक लेलॅंडनेही कमी केले कामाचे दिवस
* कॉंग्रेस, राष्ट्रवादी मित्रपक्षांना देणार ४१ जागा
* विधानसभेच्या तीन जागांसाठी एमआयएमची पहिली यादी जाहीर
* एमआयएमसोबत दलित मराठा आणि ओबीसी समाज- इम्तियाज जलील
* दलित समाज किंवा अन्य कोणत्याही समाजावर एका पक्षाचे वर्चस्व आहे हे कोणी समजू नये- इम्तियाज जलील
* काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा
* एमआयएम ७४ पेक्षा जास्त जागांवर निवडूक स्वतंत्र लढणार- इम्तियाज जलील
* कृपाशंकरसिंह, हर्षवर्धन पाटील आज भाजपात दाखल होणार
* अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी केला कॉंग्रेसला रामराम
* शिवसेना इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सेनाभवनात आजपासून
* कॉंग्रेसच्या विधानसभा उमेदवारांच्या छाननी समितीची आज बैठक
* कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते, १५ ते २० ऑक्टोबरदरम्यान मतदान शक्य
* ओला आणि उवेरमुळे वाहन क्षेत्रीत मंदी, अर्थमंत्र्यांचा आरोप
* नागपुरात शालेय विद्यार्थिनीवर स्मशानभूमीत सामूहिक बलात्कार
* १३ तारखेपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसर्‍या टप्प्याची सुरुवात
* अमेरिकेत उपचार घेऊन अभिनेते ऋषी कपूर एका वर्षाने भारतात परतले
* वाहतूक नियम मोडल्यास होणार्‍या प्रस्तावित दंडाच्या रकमेत गुजरात सरकारने केली कपात
* भाजपाला १६० तर शिवसेनेला ११५ जागा मिळणार, ०५ जागात अदलाबदलाची शक्यता
* आता तर कंपन्याच बंद पडताहेत, ७२ हजारच्या मेगाभरतीचे काय झाले? खा. अमोल कोल्हे यांचा प्रश्न
* मुंबईत सप्टेंबरमध्ये झाला २५ वर्षातील सर्वाधिक पाऊस
* मोदी सरकारच्या पाच वर्षात बँकांमध्ये ७१ हजार ५४३ कोटींचे घोटाळे- पृथीराज चव्हाण


Comments

Top