HOME   महत्वाच्या घडामोडी

अमित देशमुख यांचे आव्हान, प्रकाश आंबेडकर लातुरात, आदित्य नवा पप्पू? वाईन शॉपमध्ये कॅमेरे, राजा भाजपात प्रजा राष्ट्रवादीत.....१५ सप्टेंबर २०१९


अमित देशमुख यांचे आव्हान, प्रकाश आंबेडकर लातुरात, आदित्य नवा पप्पू? वाईन शॉपमध्ये कॅमेरे, राजा भाजपात प्रजा राष्ट्रवादीत.....१५ सप्टेंबर २०१९

* मूळचा भाजपाचा असलेला उमेदवार रिंगणात उतरवून दाखवावा, आ. अमित देशमुख यांचे आव्हान
* आ. अमित देशमुख यांच्या उपस्थितीत शेकडो भाजप कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी केला कॉंग्रेसमध्ये प्रवेश
* वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आज लातुरात आयोजन
* राज्यातील जनतेने वंचितपासून सावध रहावे, शरद पवार यांचे आवाहन
* सोनिया गांधी, अमित शाह, नितीन गडकरी, शरद पवार यांच्या गुप्त बैठकीचा तपशील जाहीर करा, प्रकाश आंबेडकरांची मागणी
* आदित्य ठाकरे म्हणजे नवा पप्पू- प्रिती मेनन, आम आदमी पार्टी
* १८ सप्टेंबरनंतर राज्यातील बहुतांश भागात पाऊस येण्याची शक्यता
* मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी अद्याप पोषक वातावरण नाही
* विधानसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेणार नाही, मुंबईचे कॉंग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी केले स्पष्ट
* भाजप आणि शिवसेना दोघांकडून २८८ जागांची चाचपणी
* शिवसेनेचे आमदार, खासदार, जिल्हा प्रमुखांची आज मातोश्रीवर बैठक
* वाईन शॉपमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश
* निवडणुकीतील दारुचा महापूर-घाऊक खरेदी रोखण्याचा प्रयत्न
* सीसीटीव्हीचे फुटेज संबंधित कार्यालयात होणार जमा
* उदयनराजे भाजपात गेले, राजा गेला, प्रजा आमच्यासोबत आहे- छगन भुजबळ
* शरद पवार यांनी उदयनराजे यांना मुलासारखे सांभाळले- जितेंद्र आव्हाड
* छत्रपती शिवरायांच्या जमिनी विकण्यासाठीच उदयनराजे भाजपात गेले- नवाब मलिक
* १७ सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
* शरद पवार १७ सप्टेंबरपासून महाराष्ट्राच्या दौर्‍यावर, सोलापुरातून सुरुवात
* पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण लढण्याची शक्यता
* भारतीय जनता पक्ष शिवरायांच्या विचारांनी चालतो, उदयनराजे यांच्याकडून प्रशंसा
* विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा विक्रम, आजवर स्विकारले २६ आमदारांचे राजीनामे
* पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटलो, राजकारणात जाणार नाही- निवृत्ती महाराज इंदुरीकर
* मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज सातार्‍यात
* सांगोल्यात विसर्जन मिरवणुकीत नाचवल्या गेल्या बारबाला
* पितृपक्षामुळे अनेक राजकीय मुहूर्त पुढे ढकलले
* सौदी अरेबियातील तेलाच्या खाणीवर अतिरेकी ड्रोन हल्ला, प्रचंड आगलोळ
* पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सुरु
* अर्थमंत्री सीतारामन म्हणतात, महागाई आटोक्यात आली!
* अल कायद्याचा प्रमुख हामजा बिन लादेन ठार झाल्याचा दावा, हामजा लादेनचा मुलगा
* विलीनीकरणाच्या विरोधात बॅंक कर्मचारी २५ पासून २७ तारखेपर्यंत करणार आंदोलन
* परदेशातील माध्यमांना मोहन भागवत ‘संघ’ सांगणार समजावून
* संघाकडे, एके ४७, तलवारी, रॉकेट लॉंचर, बंदुका, कोयते- सुजात आंबेडकर
* भारत आणि दक्षिण अफ्रिकेत आजपासून टी २० मालिका


Comments

Top